*घर खरचं कोणामुळे फुटते.....*
बहूतेकवेळा याचे खापर
स्त्रियांच्या माथी मारले जाते. कोणाचेही घर स्त्रीमुळे फुटत नाही तर
ते स्वार्थामुळे फुटत असते, मग तो कुटुंबातील स्त्री , पुरूष कोणातही निर्माण होऊ शकते.
मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते, मग पतीला समर्थन देणे हे पत्नीचे कर्तव्य असते आणि असे कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्रिया अति उत्साही बनते आणि सर्वांच्या डोळ्यावर येते. खरेतर हा फक्त धूर असतो, स्वार्थाची आग पुरूषाच्या हृदयात लागलेली असते.
माणसाला दूरून धूर दिसतो ,आग दिसत नाही .
स्त्रिने कितीही प्रयत्न केला आणि घरातील पुरूष निःस्वार्थी असला तर तिला घर कधीच फोडता येत नाही.
कैकयीच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला, पण
दशरथ निःस्वार्थी होते, त्यांनी जीवन संपवले, पण घर फुटू दिले नाही,
वडिलांच्या आज्ञेनुसार काहीच चुक आणि दोष नसताना श्रीराम यांनी वचनासाठी विनातक्रार आनंदाने वनवास स्वीकारला, पण
भरतानेही त्यांच्या पादूका सिंहासनावर ठेऊन सेवकाप्रमाणे राज्य सांभाळले, कारण हे सर्व पुरूष निःस्वार्थी होते.
कैकयीच्या स्वार्थाचा आणि प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही, उलट तिलाच घरात एकत्र रहावे लागले आणि आयुष्यभर निंदा सहन करावी लागली.
पुरूष निःस्वार्थी असेल तर
जगातील कोणत्याही स्त्रिला घर फोडता येत नाही. पण जर पुरूष स्वार्थी बनला तर
कोणत्याच स्त्रिला घर एकत्रित ठेवता येत नाही.
धृतराष्ट्राच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला, गांधारी आणि कुंती या दोघींनाही स्वार्थ नव्हता, या दोघींनीही घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत केला, पण त्यांनाच काय भगवान श्रीकृष्णांनी प्रयत्न केला तरी सुध्दा घर आणि कुळ वाचवता आले नाही.
पूरूषाच्या मनात स्वार्थ तयार झाला तर देवाला सुध्दा घर वाचवता येत नाही, यात
स्त्रीयांना दोष देऊ नका.
एक भाऊ दुसऱ्या भावाची जेवणासाठी वाट पहातोय
हा आईवडीलांसाठी सर्वात सुख आणि समाधानचा क्षण असतो आणि
आईवडील हयात असताना घरातील वाटणीचा दिवस
हा त्यांच्या जीवनातील सर्वात दुःखद क्षण असतो .
त्यांना काय द्यायचे हे आपल्या हातात असते.
आपल्या स्वार्थासाठी
उगीचच घरातील स्त्रीला बदनाम करू नका.
घर कधीच स्त्रीयांमुळे फुटत नाही, ते स्वार्थामुळे फुटते. आपल्या घराचे घरपण हे स्त्रीमुळे टिकून असते, ज्या घरातील पुरूष खंबीर व निस्वार्थी असेल तर त्याचे घर कधीही फुटू शकत नाही. 🙏
No comments:
Post a Comment