Monday, 2 May 2022


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते महा-उत्सव २०२२ चे उद्घाटन.

मुंबई दि.१ : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांच्या कलागुणदर्शनाचा रंगारंग महोत्सव महा-उत्सव २०२२ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

बांद्रा-कुर्ला काँम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे महा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री, आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार, आमदार लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित महा-उत्सव कार्यक्रम हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यापासून ते आपल्या शिपाई पर्यंतच्या सर्व कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे.

            शासनाच्या दर्शनिका विभाग, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी कोरोना योध्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमाचे एमएसआरडीए, सिडको आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस, आय ए एस आसोसिएशन आणि भारतीय वन सेवेतील अधिकारी यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या रंगारंग कार्यक्रमात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि राज्य शासकीय कर्मचारी व शासनाच्या विविध विभातील कलाकारांनी आप आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले.

0000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi