संक्रांतीच्या online हळदीकुंकवासाठी नवे उखाणे
*❇️ हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,*
*कोरोनाला हरवायला,*
*बसा आपापल्या घरात*
*❇️ मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,*
*सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,*
*❇️शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,*
*रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टंसिंग राखून*
*❇️शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,*
*रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा*
*❇️ ताजमहल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,*
*लक्षण दिसली कोरोना ची तर डॉक्टरना भेटा थेट*
*❇️ काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,*
*कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले*
*❇️चिमणीला म्हणतात चिऊ,*
*कावळ्याला म्हणतात काऊ*
*आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ,*
*❇️ चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,*
*डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप,*
🤒🤒
*काळजी घ्या, सुरक्षित राहा...*
🌹
No comments:
Post a Comment