Saturday, 8 January 2022

 दात घासून झाल्यावर रोज किमान एकदा तरी म्हणा. 


Toung Twister फक्त या नव्या पिढीला च नाही तर खुद्द श्री समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या काळात लिहून ठेवले आहे. 

बघा पटापट न चुकता म्हणता येते आहे का ते....

*लाटनुप्रास*

ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे त्यांच्या साठी हा *भाषालंकार* अनुप्रास समुद्राच्या लाटां प्रमाणे येतो..

श्रीसमर्थरामदास कृत नृसिंहपंचक

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें

प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें

खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें

तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी

लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।

लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी

हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी

कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।


कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं

घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं

तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं

धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।

भरभरित भरारी भर्भराटे भरारी

थरथरित थरारी थर्रथराटे थरारी

तरतरित तरारी तर्तराटे तरारी

चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।

गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।

न धरित जन मानें लोक गेलें निदानें।

हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।

न अडखळता जोरात म्हणण्याचा प्रयत्न करून पहा... 

जीभेसाठी व्यायाम!

हा व्यायाम करा व उतारवयात ऊद्भवणा-या स्मृतीभ्रंश, विस्मरण वगैरे मेंदूच्या त्रासापासुन स्वतःचा बचाव देखील करता येईल. 

जय जय रघुवीर समर्थ!

🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi