Tuesday, 18 January 2022

 उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत

- शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

·       गळतीचे प्रमाण कमी करण्यावर भर

 

            मुंबईदि. 18 :अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची १२ वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहेअशा शाळांमधील वर्गवाढीस मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजासंदर्भात शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधीशैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आदींसमवेत चर्चा करून याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रा.गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

            बैठकीस शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकीराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंगउपसचिव समीर सावंतशिक्षण संचालक महेश पालकरबालभारतीचे संचालक के.बी.पाटीलविवेक गोसावी आदी उपस्थित होते.

            मराठी प्रमाणेच उर्दू भा‍षिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होतीत्यानुसार पहिल्या इयत्तेत उर्दू आणि इंग्रजी अशी द्वैभाषिक पुस्तके प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावीतअसे निर्देश प्रा.गायकवाड यांनी दिले. अल्पसंख्याक संस्थांमधील मान्यताप्राप्त रिक्त पदांवर शिक्षक भरतीशिक्षकांचे समायोजन याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००००


 

वृत्त क्र. 171

राज्याच्या कलापरंपरेचा जागतिक स्तरावर गौरव

- मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

·       दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 18 : राज्याला विविध कलांची मोठी परंपरा लाभलेली आहे. चित्रकलाशिल्पकला आणि छायाचित्रकला अशा सर्व कलांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. या कलापरंपरेचा देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गौरव झालेला आहेअसे गौरवोद्गार मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            फोर्ट भागातील जहांगिर कलादालनात दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचा सदस्यांनी टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी भाषामंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार नृपेन माधवाणीफोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सुनील व्यासराजेंद्र वाघमारेसहसचिव शशांक नरसाळेपुरस्कार विजेतेछायाचित्रकार आणि कला रसिक उपस्थित होते.

            कलाकरांना  कलाकृतीचे प्रदर्शन करण्यासाठी जहांगिर कलादालनाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या कलादालनात कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या कलाकरांचे अभिनंदन करुन मराठी भाषा मंत्री श्री.देसाई म्हणाले,  प्रदर्शनातील छायाचित्र ही स्तब्ध करणारी आहेत. ही छायाचित्रे टिपण्याऱ्या छायाचित्रकारांचा दृष्टिकोन नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्ट कला एकाच ठिकाणी पहायला मिळते याचाही आनंद आहे. कलेची परंपरा आणि साधना पुढेही सुरु ठेवावीअसेही श्री.देसाई यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगिर कलादालनात झाले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शक्य नसले तरी छायाचित्रकार म्हणून ही छायाचित्रे पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असताअसे श्री.देसाई यांनी सांगितले.

            यावेळी श्री. देसाई यांनी छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी करतांना छायाचित्रांच्या वैशिष्ट्यांची माहितीही घेतली.

            या छायाचित्र प्रदर्शन कार्यक्रमात श्री. देसाई यांच्या हस्ते दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या 2019 ते 2021 या वर्षातील विजेते मिलिंद जोशीअमोद कुमारराजेंद्र वाघमारेमहेश आम्ब्रेशेखर मानगावंकरआशिष परब यांना छायाचित्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच भास्कर आठवले यांना लॅंडस्केप ट्रॅाफी तर गणेश उत्सवातील छायाचित्रांसाठी प्रोत्साहन बक्षीस श्रीमती सायली यांना देण्यात आला.

            फोर्ट येथील जहांगिर कलादालनात सुरू असलेले छायाचित्र प्रदर्शन दि. 24 जानेवारी 2022 पर्यंत सर्व कलारसिकांसाठी खुले आहे.

०००


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi