Wednesday, 17 November 2021

 पुणे म्हाडाच्या 4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

 

            मुंबईदि. 16 :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थातपुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडगृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकरपुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.

            पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणेसांगलीसोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचंपुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi