Wednesday, 8 September 2021

 *आजाराशी लढावे कसे... ?*




*लेख संपूर्ण वाचा तुम्हाला कुठलाच व्हायरल आजार होणार नाही*

 

आजारपण प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात येतं. काहीवेळा ते किरकोळ प्रमाणात असतं काहीवेळा गंभीर ! 


आजाराची वैद्यकीय व्याख्या खुप व्यापक असली तरी, शरीराला नको असलेला घटक शरीरात शिरुन वाढायला लागला आणि शरीराला गरजेच्या असणा-या क्रियांमध्ये व्यत्यय आणायला लागला, शरीराला त्रास द्यायला लागला तर त्याला आजारपण म्हणावं असं आपण सर्वसामान्य लोक म्हणु शकतो. 


आजारपण कुणालाच नको असतं तरीही ते येतंच...! 


आजारपण येवुच नये, आलंच तर गंभीर रुप धारण करु नये, अगदी अॕडमिट वैगेरे होण्याची वेळ येवु नये यासाठी काही साधे उपाय सांगत आहे. 


*हे उपाय म्हणजे उपचार (Treatment) नव्हेत... Prevention is better than Cure हे जे म्हटलं जातं, त्यातला Prevention चा प्रकार आहे याची नोंद घ्यावी.*


कोणताही आजार टाळायचा असेल तर आपली प्रतिकारशक्ती म्हणजेच Immunity Power  वाढवणं हा त्यावरचा प्रमुख इलाज आहे. 


Immunity Power म्हणजेच प्रतिकारशक्ती प्रबळ असेल तर कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही. आलाच तरी जास्त हानी पोचवणार नाही. 


आपण हे ऐकत असतो, परंतु प्रतिकारशक्ती म्हणजे नेमकं काय...ती वाढवायची कशी हे मात्र कुणीच नीट सांगत नाही, सांगितलंच तर, सांगितलेलं आपल्याला पाळायला जमेलच असं नाही... 


म्हणुन सर्वसामान्यांना प्रतिकारशक्ती म्हणजे काय, ती वाढवण्यासाठी नेमकं काय करावं हे साध्यासोप्या भाषेत सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !   


*डाॕ. पी.पी. देवेन, प्रोफेसर, ए.जे.मेडिकल काॕलेज, केरळ यांच्या अभ्यासपुर्ण निष्कर्षांवर आधारीत हा लेख आहे...!* 


*आजारपण का येतं?* 


मघाशी सांगितल्याप्रमाणे शरीराला नको असलेला घटक म्हणजेच शत्रु आपल्या शरीरात शिरला तर सर्वप्रथम तो काय करतो तर आपल्या शरीरात  स्वतःचं सैन्य वाढवतो. 


ज्याचं सैन्य जास्त, तो जिंकणार हे आपल्याला सर्वसाधारणपणे टिव्ही आणि पिक्चरमधल्या लढाया पाहुन माहित आहे. 


शत्रुला उत्तर द्यायचं म्हणुन आपलं शरीरसुद्धा सैन्याची जमवाजमव करायला लागतं. (हां, बरोबर... सासु बोलली की सुन पदर खोचुन तयार व्हायला लागते तस्सं )


आपण बेसावध असतांना अचानक पणे शत्रु पुर्ण शक्तीनिशी शरीरात येतो... 


त्यामुळे आपल्या शरीराला शत्रुशी युद्ध करण्यापुरतं सैनिक जमवायला थोडा तरी वेळ लागणारच की राव... !


आपलं पुरेसं सैन्य जमण्याच्या आधीच शत्रुने जर शरीरावर जोरदार हल्ला केला तर... ? 😔


आपलं सैन्य कमी असल्यामुळे म्हणा बेसावध असल्यामुळे म्हणा किंवा सैन्य जमवण्यात आपला वेळ गेल्यामुळे म्हणा आपला पराभव होणार हे निश्चित ! म्हणजेच आजार होणार हे निश्चित ... साधं आहे ! 


शत्रु येण्याआधीच आपल्या शरीरानं, आपलं भरपुर सैन्य साठवुन ठेवलं असतं, हातात भाले घेवुन आधीच तयार करुन ठेवलं असतं तर... ? 


शत्रु नक्कीच हरला असता ! 


शत्रु शरीरात येण्याआधीच आपल्या शरीरानं आधीच भरपुर सैन्य साठवुन ठेवलेलं असणं म्हणजे आपली *प्रतिकारशक्ती* ! 


हि प्रतिकारशक्ती ज्याची जास्त, त्याची "जीत" होणार हे साधं गणित आता कळायला हरकत नाही !


💁‍♀️शत्रु शरीरात आल्याबरोबर पहिले 48 तास महत्वाचे. 


या 48 तासांत जो जास्त सैन्य निर्माण करेल तो भविष्यात जिंकणार... साधं आहे ना हो ! 


मग, या 48 तासांत आपण आपलं सैन्य शत्रुपेक्षा जास्त प्रमाणात तयार केलं तर ठिक; नाहीतर शत्रु आपलं सैन्य या 48 तासांत वाढवणार... आणि आपल्यावर हल्ला करणार...आणि आपण हरणार ... म्हणजेच आपल्याला आजार होणार ! 


पटलंय ना हितवर...व्हय तरी म्हणा कि राव !!!


*गनिमी कावा*


यावेळी आपण करायचं काय... ?तर आपल्या रक्तातच असलेला महाराजांचा "गनिमी कावा" आता खेळायचा !


आजाराचं कुठलंही लक्षण दिसायला लागलं आपल्याला उदा. घसा खवखवणे, शिंका, नाक गळणे, बारीक ताप येणे इ. कि लगेच सोसेल इतकं गरम पाण्याचे घोट (पाण्याचेच) घ्यायला सुरुवात करायची. 


सोसेल इतकंच बरं का... नायतर घसा घ्याल भाजुन...! 


लक्षण दिसायला लागल्यापासुन दर अर्ध्या तासाने सुरुवातीच्या 48 तासांपर्यंत हे गरम पाणी पीत रहायचं ... ! 


(कोई मिल गया मधल्या बालिश हृतिक रोशन प्रमाणे बालीश चेहरा करुन .... एकावेळेला एक गिलास पिवु का, आर्दा गिलास पिवु ?  हे विचारायला फोन करु नका... ज्यानं त्यानं आपल्याला "झेपतंय" तेव्हढं प्या ! पाणी हां.. इतकावेळ पाण्याचंच बोलतोय मी )


यानं होतं काय... कि आपल्या शरीराचं तापमान वाढायला लागतं.  


यामुळं होतं काय.... तर शरीरात आलेला शत्रु वातावरण बदलल्यामुळे बावचळतो... भांबावतो... मध्येच काय झालं ? असं समजुन स्वतःचं सैन्य निर्माण करायचं जरा वेळ थांबवतो... परिस्थिती बदलेल याची थोडी वाट पाहतो... बेसावध होतो...! *(पक्का कोल्हापुरकर इथं म्हणणार....कसा फशीवला...कसा गंडीवला...! )*


या गनिमी काव्यामुळं, शत्रुचा सैन्य जमवण्याचा वेग बघा मंदावला, पण आपण आपलं सैन्य निर्माण करायचं थांबवलंय का... ? तर नाही... ! (हुषार आहे आपण )


आलं लक्षात ? 


या गनिमी काव्यानं शत्रुला सैन्य वाढवण्यापासुन आपण थांबवलं... आपलं सैन्य मात्र सतत वाढवत गेलो... तर होईल काय... ? 


अर्थात् सुरुवातीच्या 48 तासांत आपल्याकडे शत्रुपेक्षा जास्त सैन्य साठलेलं असेल... आणि त्यामुळं भविष्यात "जीत" आपलीच !


आता आजार गंभीर होणार नाही हे निश्चित ! 


("जीत" हा शब्द सारखा मध्येमध्ये कडमडतो आहे, जिंकणं या अर्थाने तो आलेला आहे. लेखकाच्या नावातील शेवटची दोन अक्षरे घुसडण्याचा यात मुळीच हेतु नाही, कुणाला तसे वाटले तर तो निव्वळ योगायोग समजावा.)


*शस्त्रांची जमवाजमव ...*


चला आपल्याकडे सुरुवातीच्या 48 तासांत सैन्य तर वाढलं. पण नुसतंच सैन्य वाढुन काय कामाचं ? 


त्यांच्या हातात शत्रुबरोबर लढायला हत्यारं नकोत ? 


सैन्याकडे मशीनगन, स्टेनगन, तोफा, रणगाडे नसतील तर नुसतीच सैनिकांची संख्या वाढुन काय कामाचं ? (शाब्दिक भांडणात चार शिव्या दिल्या की झालं. शिवाय यांतुन त्या भांडणाची खुमारीही वाढते...हो... आपापल्या जबाबदारीवर करुन पहा ! )


पण हे शाब्दिक भांडण नव्हे, इथं युद्ध चालु आहे, शिव्या कामाच्या नाहीत... इथं शस्त्रंच लागतात.


आपल्याला सुद्धा आपल्या सैनिकांना ही शस्त्रं  पुरवावी लागतील, तरच आपलं सैन्य युद्ध करु शकेल शत्रुशी... ! 


आपण आता कोणती शस्त्रं द्यायची आपल्या सैन्याच्या हातात ? 


तशी बरीच आहेत... पण 100 टक्के युद्ध जिंकुन देणारी, भरवशाची प्रमुख चार ! 


*1. आयर्न - Iron*


*2. अमायनो अॕसीड - Amino Acid*


*3. क जीवनसत्व - Vitamin C* 


*4. जस्त - Zinc* 


*शस्त्रं मिळवायची कशी... ?*


 सोपं आहे. 


*1. आयर्न - Iron* - 


सफरचंदात हे असतं. परवडतंय त्यांनी रोज सफरचंद खा. इतरांनी मुठभर काळ्या मनुका खा. दोन्ही खाल्लं तर ऊत्तमच ! इकडं पाठवलं तर त्याहुन उत्तम ! 


*2. अमायनो अॕसीड - Amino Acid*


नाव ऐकुन दचकु नका ! फक्त मोड आलेली कडधान्य खा भरपुर ... ! 


*3. क जीवनसत्व - Vitamin C* 


एका लिंबाचा रस काढुन सरबत करुन प्या. संत्रा, मोसंबी पण चालेल. *(हि फळांची नावं आहेत याची नोंद घ्यावी)*🤦‍♂️


*4. जस्त - Zinc* 


ऐकुन गंमत वाटेल, पण पपईच्या बियांत सर्वात जास्त प्रमाणात जस्त असते. 


पपईच्या बिया खाणार नाही तुम्ही  मला माहित आहे (चांगलाच ओळखुन आहे मी तुम्हांला)


ओके ! 


मग इथुन पुढे कलींगड खातांना, तोंडाचा चंबु करुन त्याच्या बिया शिताफीनं थुंकुन टाकायचं बंद करा! त्या चावुन खा...! 


त्यांतही भरपुर जस्त आहे. 


हि चार शस्त्रं जर आपण आपल्या  सैन्याला दिलीत तर "हर हर महादेव" म्हणत आपलं सैन्य शत्रुवर तुटुन पडणार... आणि आपला झेंडा कायम डोलत राहणार... निरोगी !


तेव्हा नेहमीसारखं गाफील राहु नका... ( गाफील या शब्दाचा समानार्थी गोड शब्द म्हणजे धांदरट... ! बायकांचा हा  आवडता शब्द, जणु यांच्या माहेरचाच. 'आमचे हे किनई पयल्यापासुन धांदरटच' हे म्हणण्यात काय त्यांना आसुरी आनंद होतो कळत नाही )


तर, ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा, आपलं सैन्य आजपासुनच जमवायला सुरु करा...! 


हुश्श् ...! 


... तुमच्या घरापर्यंत, हि टेक्नीकल माहिती, खाटेवर  उताणं पडल्या पडल्या तुमाला समजावी, कळावी यासाठी   कष्टानं तुमच्यापर्यंत ती पोचवली आहे... !


➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

*(कॉपी पेस्ट)*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi