Friday, 10 September 2021

 भारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर

15 सप्टेंबर रोजी अधिसूचना4 ऑक्टोबर रोजी मतदान

 

            मुंबईदि. 9 : भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. स्व. राजीव शंकरराव सातव यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राज्यातील एका जागेचाही यात समावेश आहे. राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या या जागेच्या पोटनिवडणूकीसाठी बुधवार दि. 15 सप्टेंबर2021 रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.

            स्व. सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची मुदत दि. 2 एप्रिल2026 पर्यंत आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केल्याच्या दिनांकापासून बुधवार दि. 22 सप्टेंबर2021 पर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 सप्टेंबर रोजी केली जाणार असून उमेदवारांना सोमवार दि. 27 सप्टेंबर2021 पर्यंत नामनिर्देशन मागे घेता येईल. सोमवार दि. 4 ऑक्टोबर2021 रोजी सकाळी 9 वा. ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असून त्याच दिवशी सायं. 5 वा. मतमोजणी केली जाणार आहे.  या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या निवडणुकीप्रसंगी कोव्हीड-19 विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावेअसे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi