Tuesday, 10 August 2021

 भविष्य निर्वाह निधी वार्षिक

विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर

 

           मुंबईदि. 10 :   विदर्भ व मराठवाडा विभागातील शासकीय वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे  वर्ष 2020-21 या वित्तीय वर्षाचे भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरण पत्र मुख्य महालेखाकार- 2 नागपूर कार्यालयाच्या  <https://agmaha.cag.gov.in/GPFNagv1.aspह्या लिंकवर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपले वार्षिक विवरणपत्र फक्त सेवार्थ पोर्टलमध्ये पाहण्यासाठी अथवा डाऊनलोड व प्रिन्ट काढण्यासाठी https://sevarth.mahakosh.gov.in/login.isp या लिंकवर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत पाहू शकतील.       

            शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा निधीची तसेच त्यांना दिलेल्या अग्रिम राशीची रक्कम एसएमएसद्वारे संदेश पाठवून कळविता येईल. ज्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक अद्यापही नोंदणीकृत झाला नसेल त्यांनी आपला मोबाईल क्रमांक fm.mh2.ae@cag.gov.in या ईमेल पत्त्यावर  किंवा 09423441755  या  मोबाईल  क्रमांकावर संदेश (एस.एम.एस.) पाठवून नोंदणी करुन घ्यावा.

            सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नावजन्म तारीखभविष्य निर्वाह निधी विवरणपत्र सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावे. तफावत असल्यास सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून दुरुस्ती करुन घ्यावी. महालेखाकार कार्यालयाच्या अभिलेख्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ-आयडी सह gpftakrarngp@gmail.comवर ईमेल पाठवावा किंवा 0712-2560484या फॅक्सवर सूचित करावे.

            कर्मचारी महालेखाकार कार्यालयाच्या <https:/agmaha.cag.gov.in/या लिंकवर नोंदणीकृत करुन भविष्य निर्वाह निधी लेख्याची सद्य:स्थिती पाहू शकतील. भविष्य निर्वाह निधी अनुसूचिमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांकविभागाशी संबंधित सिरीज व पूर्ण नाव असल्याची कर्मचाऱ्यांनी खात्री करावी. मासिक अधिदानाची राशी  किंवा घेतलेल्या अग्रिमची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत कोषागार प्रमाणक  व दिनांकअनुसूचित प्रमाणकाची राशीअनुसूचिबरोबर पाठवावी. जेणेकरुन नोंद न झालेले  क्रेडिट व  अग्रिमाची लेख्यामध्ये नोंद घेतली जाईल व सेवा निवृत्तीच्यावेळी भविष्य निर्वाह निधीची राशी प्राधिकृत करताना होणारा विलंब टाळता येईलअसे वरिष्ठ लेखाधिकारीमहालेखाकार-2  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi