Tuesday, 10 August 2021

 इतर मागास वर्गाचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

·       महाज्योतीवसतिगृहशिष्यवृत्तीसाठी प्राधान्याने निधी

·       ओबीसी जनमोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

          मुंबईदि. 10 : इतर मागासवर्ग समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी राज्यशासन वचनबद्ध आहेअसे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत संबंधित सचिवांनी तात्काळ कार्यवाही करूनअहवाल देण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडील इम्पेरिकल डाटा राज्याला द्यावा अशी आग्रही मागणी केल्याचेही सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळइतर मागासबहूजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारउद्योगमंत्री सुभाष देसाईमुख्य सचिव सीताराम कुंटेवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक तसेच ग्रामविकास आणि सामान्य प्रशासन विभागाचे सचिव उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळशामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्यासाठी आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने निधी दिला जाईल. महाज्योती संस्थेची उपकेंद्रे राज्यातील विभागीय ठिकाणी सुरू करणेमहाज्योतीला स्वतंत्र कर्मचारी-अधिकारी नेमणे संदर्भात त्वरीत कार्यवाही करावीअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            या शिष्टमंडळाने राज्याची तमिळनाडू आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावीअशी मागणी केली. यासंदर्भात मंत्री श्री. भुजबळ यांनी इम्पेरिकल डाटाची मागणी केंद्राकडे करण्यात आली असूनसध्या सुरु असलेल्या संसद अधिवेशनाच्या माध्यमातून देखील या प्रश्नी राज्याची बाजू मांडण्यात येत आहे. तसेच आयोगाच्या माध्यमातून देखील आकडेवारी उपलब्ध करून देण्याचा पर्याय असल्याचे सांगितले.

            बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणालेओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला असूनलवकरच ती सुरु होतील.

            भटक्या आणि विमुक्त जातीचे पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावेतसेच ३१ ऑगस्टला विमुक्त दिन साजरा करण्यात यावाअशी मागणी लक्ष्मण गायकवाड यांनी केली. या मागणीवर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

            बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षणओबीसींना शैक्षणिक शुल्क व शिष्यवृत्तीजातपडताळणीतील बोगस दाखलेतांडा-वस्ती सुधार समिती या अनुषंगानेही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी संबंधित सचिवांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावीअशा सूचना दिल्या.

            शिष्टमंडळात चंद्रकांत बावकरज्ञानेश्वर गोरेजे. डी. तांडेललक्ष्मण गायकवाडहरिभाऊ शेळकेगणेश हाकेअँड. पल्लवी रेणके आदींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi