Monday, 23 March 2026

महिलांचे कौशल्य वाढविणे, त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंग करणे आणि त्यातून त्यांची उत्पादने परदेशात पाठविण्यासाठी

  महिलांचे कौशल्य वाढविणेत्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंग करणे आणि त्यातून त्यांची उत्पादने परदेशात पाठविण्यासाठी शासन काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 नवसखी उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे काम मंत्री बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात योजना आखून लाख रुपये महिला बचत समूहाना उपलब्ध करून दिले. आणि त्यातून खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम होत आहेअसे मत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले.

 यावेळी नागपूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दीदी की रसोई उपहारगृहप्रोजेक्ट ड्रीम 100 विलेज लायब्ररी, 14 आय सी टी लॅब झेड. पी. स्कूलए आय लॅब ऑन व्हील- ज्ञानरथसुपर 40 अंगणवाडीगुरुकुल ए आय लॅब 48 अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले. तसेच भविष्यात जिल्हा परिषदेमार्फत 100 पेक्षा अधिक वाचनालये उभारण्यात येणार असून या उपक्रमाचा देखील शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

महालक्ष्मी सरस 2026 मध्ये सुमारे 404 स्टॉल्स उभारण्यात

 महालक्ष्मी सरस 2026 मध्ये सुमारे 404 स्टॉल्स उभारण्यात आले असून आतापर्यंत 10 कोटी रुपयांची विक्री झाली आहे. ही विक्री पुढील काळात मोठया प्रमाणात वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील राहीलअशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात ठिकाणी महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरविण्यात येते आणि या माध्यमातून सुमारे 100 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. यामुळे महिलांच्या उद्योगाना मोठी चालना मिळत असून पुढे त्यांना अधिक संधी निर्माण करून देण्याचे काम शासन करणार आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून महिला अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटक बनल्या आहेतअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँ मुख्यमंत्री · महालक्ष्मी सरस मध्ये 10 कोटी रुपयाची विक्री·

 महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँ      मुख्यमंत्री            ·         महालक्ष्मी सरस मध्ये 10 कोटी रुपयाची विक्री·         एक कोटी लखपती दीदी करणार·         राज्यातील 36 जिल्ह्यात उमेद मॉल

 

नागपूरदि. 22 : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून महालक्ष्मी सरस हा प्रदर्शनाचा ब्रँड अधिक मजबूत होत आहे. राज्यात शंभर कोटी रुपयाचा व्यवहार बचत गटाच्या माध्यमातून होत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले .

या प्रसंगी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेअर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वालआमदार सर्वश्री  कृपाल तुमानेकृष्णा खोपडे,  चरणसिंग ठाकूर  आदी लोकप्रतिनिधी उपस्थिती होती.

भांडेवाडी पोलीस स्टेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन

 भांडेवाडी पोलीस स्टेशनचे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन

 

नागपूरदि. 22 : नागपूर शहरातील वाढती लोकसंख्याशहराच्या बाहेरील भागांमध्ये वेगाने होणारे शहरीकरण तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने भांडेवाडी येथील पोलीस स्टेशन सुरु झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यास जनतेनी सहकार्य करावेअसे आवाहन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सुसज्ज अशा भांडेवाडी पोलीस स्टेशनचे उद्धघाटन झाले. त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

 या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेआमदार कृष्णा खोपडेपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंघलपोलीस उपायुक्त निकेतन कदम तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या स्थापनेमुळे परिसरातील नागरिकांना जलद व प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध होणार असून गुन्हे प्रतिबंधकायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 या पोलीस ठाण्यात अत्याधुनिक सुविधातांत्रिक साधने तसेच नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलीसांची कार्यक्षमता वाढून प्रतिसाद वेळेत देण्यात सुधारणा होणार आहे.

 नागपूर पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असूननव्याने सुरू करण्यात आलेले भांडेवाडी पोलीस ठाणे हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

 प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी स्वागत करून पोलीस स्टेशन संदर्भात माहिती दिली.

 

000000

Sunday, 22 March 2026

विद्यार्थिनींसाठी मध्यान्ह भोजन योजना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश सायकल वाटप योजना बारावीपर्यंत मोफत शिक्षण

  विद्यार्थिनींसाठी मध्यान्ह भोजन योजना  मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश  सायकल वाटप योजना  बारावीपर्यंत मोफत शिक्षण यांसारख्या अनेक योजना आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणेमहिला शिक्षकांची नियुक्तीस्वतंत्र व स्वच्छ शौचालयांची व्यवस्था यावर शासन भर देत आहे. तसेच प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष (पिंक रूम) उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत शिक्षणावर किमान ५ टक्के खर्चाची तरतूद असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये १० ते १२ टक्क पर्यंत निधी शिक्षणासाठी खर्च केला जात असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.

0000

प्राथमिक शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढविणे आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी

    मंत्री दादाजी भुसे म्हणालेप्राथमिक शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढविणे आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी १९९२ पासून सुरू करण्यात आलेल्या उपस्थिती भत्ता’ योजनेला काळानुरूप पूरक अशा अनेक आधुनिक योजनांची जोड देण्यात आली आहे. इयत्ता  पहिली ते चौथी तील  आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीतील दारिद्र्यरेषेखालील मुलींना ७५ टक्के उपस्थितीच्या अटीवर दररोज एक रुपयाकमाल २२० रुपय वार्षिक उपस्थिती भत्ता देण्यात येत होता. सध्या ही योजना १३ मे २०२२ पासून जिल्हा नियोजन समितीकडे वर्ग करण्यात आली असून जिल्हास्तरावर अंमलबजावणी केली जात आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी शासनाचा सर्वांगीण प्रयत्न

 मुलींच्या शिक्षणासाठी शासनाचा सर्वांगीण प्रयत्न

-मंत्री दादाजी भुसे

  मुंबईदि. १८ : राज्यातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि ड्रॉपआऊटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वांगीण उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

            याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रेकिशोर दराडेअभिजीत वंजारीइद्रिस नाईकवाडी यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi