Monday, 9 March 2026

पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

 पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

 

मुंबईदि. : 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरापश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील 150 हून अधिक निराधार महिलादिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखलेज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले. 

या शिबिरात रिलायन्स फाउंडेशनलोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरातउपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व श्रीमती स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या शिबिरात विधवा महिलादिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेसंजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्रउत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शनज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.


“हर एक पल का शायर साहिर” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 हर एक पल का शायर साहिर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईदि. 7 कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा हर एक पल का शायर साहिर या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम शनिवार 7 मार्च, 2026 रोजी रात्री 8.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरबोरीवली येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गायक म्हणून श्रीकांत नारायणसरिता राजेशसौम्या वर्मा आणि मुख्यार शाह यांचा सहभाग आहे. संगीत संयोजन प्रवीण फाटक यांनी केलेले असून या कार्यक्रमाचे निवेदन आरती शेट्टी व ध्वनीव्यवस्था नितीश फणसे करीत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक लोकप्रिय गीतांचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्सस्त्रीरोग तज्ज्ञस्त्री शल्यचिकित्सकपरिचारिकाआरोग्य सेविकाआरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार येईल. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्वबाल आरोग्यकर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणस्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून महिलांच्या स्वप्नांना बळ देऊयाउद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया! या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतीलअसा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

 जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात

एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

 मुंबईदि.7 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य  संरक्षणासाठी राज्यभरात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य विषयी हक्कांना बळ देत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, 8 मार्च 2026 रोजी मुख्य सभागृहयशवंतराव चव्हाण सेंटरनरिमन पॅाईटमुंबई येथे दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

opening the integrated double-decker flyover in front of Savitribai Phule

 Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar said that opening the integrated double-decker flyover in front of Savitribai Phule Pune University for traffic is a significant moment for Pune city. Traffic congestion near the university main gate and along Ganeshkhind Road had been a major issue for residents for many years. This modern double-decker flyover has been constructed using advanced technology as a long-term solution to the problem.

Work is simultaneously underway on three levels

 Work is simultaneously underway on three levels—on the ground, in the air, and underground—to improve transportation in Pune. Two ring road projects are being implemented for Pune and its surrounding areas. The metro network is expanding rapidly, and public transport services such as Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) are being strengthened to make commuting more efficient, he said.

Highlighting Pune’s rapid growth

 Highlighting Pune’s rapid growth, Mr. Fadnavis said that the city is among the fastest-growing in the country. After major expansion in the Information Technology (IT) sector, Pune is now emerging as a key hub for Global Capability Centres (GCCs). In the past year, the largest GCC office space in the country has been developed in Pune, further enhancing the city’s economic and industrial significance. To support this growth, strong infrastructure development is essential, he said.

He noted that some major cities have experienced slowed growth due to inadequate infrastructure. Therefore, decongesting Pune is a priority for the government. Since the city has limited road space, the administration is modernising the transport system through flyovers, grade separators, underpasses, and expansion of public transport.

Featured post

Lakshvedhi