अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि.०५ : अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नवीन रुग्णालयाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.
नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.