Thursday, 29 January 2026

हतूर तूर खरेदी प्रक्रिया नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने

 हतूर तूर खरेदी प्रक्रिया नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने राबविण्यात येणार असूनत्यासाठी राज्यभरात 934 खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यावर्षी राज्यातील तूर उत्पादनाचा अंदाज 13.51 लाख मेट्रिक टन इतका आहे. तसेच मागील हंगामात राज्यातील 85 हजार शेतकऱ्यांकडून 13 लाख 33 हजार 128 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होतीअशी माहितीही मंत्री रावल यांनी दिली.

 

तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नयेयासाठी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व जलद गतीने राबवावीअशा स्पष्ट सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास राज्यातील 100 टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईलअसेही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

राज्यात 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता

 राज्यात 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता

-पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 27 : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असूनराज्यात 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा थेट लाभ राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

 

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले कीसन 2025-26 या हंगामासाठी महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तुरीची खरेदी आठ हजार रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावाने केली जाणार आहे. या खरेदीसाठी 20 जानेवारी 2026 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.

सार्वजनिक न्यासांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावे कळविण्याचे आवाहन

 सार्वजनिक न्यासांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी

15 फेब्रुवारीपर्यंत नावे कळविण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 27 : सार्वजनिक न्यासांवर अनेक वेळा प्रशासकसुयोग्य व्यक्तीकाळजीवाहू व्यक्ती यांची नेमणूक करावी लागते. यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीशसेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशसेवानिवृत्त धर्मादाय आयुक्तउपायुक्तसहायक आयुक्तधर्मादाय विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिक्षक किंवा निरीक्षक यांचे स्वतंत्र पॅनल तयार करण्यात येणार आहे. यासाठी अशाप्रकारे नमूद केलेल्या इच्छूक व्यक्तींनी आपली नावे 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत धर्मादाय आयुक्त कार्यालयदुसरा माळासस्मिरा इमारतसस्मिरा मार्गवरळीमुंबई येथे कळविण्यात यावीअसे आवाहन धमार्दाय आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये  केले आहे.

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन · 1 हजाराहून अधिक पशूंचे प्रदर्शन; पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजनास वेग

 परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

·         1 हजाराहून अधिक पशूंचे प्रदर्शनपशुसंवर्धन विभागामार्फत नियोजनास वेग

 

मुंबईदि. 27 : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचेआयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातीच्या एक हजाराहून अधिक पशू प्रदर्शन होणार असून प्रदर्शनाची तयारी वेगात सुरू आहे.

 

या प्रदर्शनात पशुपालकांना गायीम्हशीघोडेशेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळतील. केवळ महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालनआहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहेअशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन.  यांच्या मार्गदर्शनाखाली  या प्रदर्शनाचे नियोजन प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. "या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयीची संकीर्ण व अद्ययावत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. याचा फायदा पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी होईल," असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी व्यक्त केला.

 

नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अहिंसा, क्षमा, करुणा, दया, लोकसंग्रह, व्यवहार, समता आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील 10 हजार प्रबोधनकार

 अभियानांतर्गत पाच प्रमुख स्तंभांवर काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणाअंतर्गत ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार प्रशिक्षकांमार्फत राज्यातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येईल. मुलभूत सैनिकी प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेट्सच्या माध्यमातून संचलन (परेड)कवायत आणि मूलभूत सैनिकी शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रथमसंस्कारमूल्यप्रबोधनशिक्षणाचे महत्वएकाग्रतामनोबलअभ्यासशुद्धबुद्धीविवेकतारतम्यसंवादमृदुवचनशब्द सामर्थ्यअहिंसाक्षमाकरुणादयालोकसंग्रहव्यवहारसमता आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील 10 हजार प्रबोधनकार शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यामध्ये वारकरी शिक्षण संस्था व विविध क्षेत्रांतील विचारवंतांचाही सहभाग असेल. योग प्रशिक्षणाअंतर्गत 'आर्ट ऑफ लिव्हिंगआणि त्र्यंबकेश्वर येथील योग संस्थांच्या मदतीने 10 हजार योग प्रशिक्षक विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मनोबल वाढवण्यासाठी योग प्रशिक्षणाचे कार्य करतील. तर आरोग्य समुपदेशन (छत्रपती संभाजीनगर मॉडेल) करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करून संतुलित आहारपोषण मूल्य आहार सवयीचे महत्ववैयक्तिक स्वच्छतापरिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे महत्व सांगितले जाईल. विशेषतः मोबाईलसंगणक व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे डोळेमेंदूझोप व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजवून सांगण्यासह विद्यार्थ्यांसाठी राज्यभर विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सूचित केले.

राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम; शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर

 राष्ट्र प्रथमअभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम;

शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर

-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

मुंबईदि. 27 : 'राष्ट्र प्रथमया संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणमूलभूत सैनिकी  प्रशिक्षणप्रबोधनयोग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन हे पाच उपक्रम आनंददायी शनिवार’ मध्ये विविध तासिकांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

'राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्यमिशन संदर्भात मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला प्रधान सचिव रणजित सिंह देओलशिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंहएनसीसी राज्य समन्वयक अधिकारी संतोष धाम आणि भोसलेग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाजआर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी राहुल पाटीलसमाज प्रबोधनकार अक्षय महाराज भोसले आणि सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे उमेश महाराज बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

रजोनिवृत्ती हा आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा

 सेवांचा लाभ घेतलेल्या महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली असूनहा उपक्रम आवश्यकसन्मानजनक आणि महिलांना सक्षम करणारा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

विशेष बाब म्हणजेराज्यव्यापी व संघटित स्वरूपात रजोनिवृत्ती काळजी कार्यक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असूनत्यामुळे इतर राज्यांसाठी  हा एक राष्ट्रीय आदर्श निर्माण झाला आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असूनमहिलांसाठी ही एक अर्थपूर्ण व आरोग्यकेंद्रित भेट ठरली आहे.

राज्याच्या विविध भागांतील महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले असूनमहिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत शासनाची संवेदनशीलता व सर्वसमावेशक सार्वजनिक आरोग्यसेवेप्रती असलेली बांधिलकी याचे हे उत्तम उदाहरण आहे.

रजोनिवृत्ती हा आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला या टप्प्यात सन्मानपूर्वकयोग्य वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार मिळावेतयासाठीच रजोनिवृत्ती क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. महिलांचे आरोग्य सक्षम झालेतर कुटुंबसमाज आणि राज्य अधिक सक्षम होईल. असे राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी सांगितले.

हा उपक्रम सार्वजनिक आरोग्याबाबतच्या ठोस दृष्टीकोनाचे प्रतिबिंब असूनभारतात महिला-केंद्रित आरोग्यसेवेच्या दिशेने परिवर्तनकारी पाऊल म्हणून त्याचे व्यापक कौतुक होत आहे.


Featured post

Lakshvedhi