Thursday, 29 January 2026

अहिंसा, क्षमा, करुणा, दया, लोकसंग्रह, व्यवहार, समता आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील 10 हजार प्रबोधनकार

 अभियानांतर्गत पाच प्रमुख स्तंभांवर काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणाअंतर्गत ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार प्रशिक्षकांमार्फत राज्यातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येईल. मुलभूत सैनिकी प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेट्सच्या माध्यमातून संचलन (परेड)कवायत आणि मूलभूत सैनिकी शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रथमसंस्कारमूल्यप्रबोधनशिक्षणाचे महत्वएकाग्रतामनोबलअभ्यासशुद्धबुद्धीविवेकतारतम्यसंवादमृदुवचनशब्द सामर्थ्यअहिंसाक्षमाकरुणादयालोकसंग्रहव्यवहारसमता आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील 10 हजार प्रबोधनकार शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यामध्ये वारकरी शिक्षण संस्था व विविध क्षेत्रांतील विचारवंतांचाही सहभाग असेल. योग प्रशिक्षणाअंतर्गत 'आर्ट ऑफ लिव्हिंगआणि त्र्यंबकेश्वर येथील योग संस्थांच्या मदतीने 10 हजार योग प्रशिक्षक विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मनोबल वाढवण्यासाठी योग प्रशिक्षणाचे कार्य करतील. तर आरोग्य समुपदेशन (छत्रपती संभाजीनगर मॉडेल) करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करून संतुलित आहारपोषण मूल्य आहार सवयीचे महत्ववैयक्तिक स्वच्छतापरिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे महत्व सांगितले जाईल. विशेषतः मोबाईलसंगणक व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे डोळेमेंदूझोप व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजवून सांगण्यासह विद्यार्थ्यांसाठी राज्यभर विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सूचित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi