Tuesday, 26 November 2024

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

 मंत्रालयात केले संविधान उद्येशिकेचे वाचन

 

मुंबई, दि. २६ :  संविधानिक  मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी क्रिडा मंत्री संजय बनसोडेमुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

 

२६ नाव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाने विविध जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केली असल्याचे सांगूनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला. 

 

 संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 



दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन



 दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना

 राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

 

 

मुंबई, दि. २६ : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी  दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलीस जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्म्य पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.

१६ व्या हुतात्मा स्मृतीदिनी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस दलामार्फत आदरांजली अर्पण करण्यात आली.  पोलीस बँड पथकाने सलामी शस्त्र’ तसेच 'बिगुलर्स लास्ट पोस्टवाजविले. यावेळी पोलीस अधिकारी व जवानांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले.राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकरउपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढामुख्य सचिव सुजाता सौनिकअतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल,पोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.

 

0000

 


 

Maharashtra Governor, CM, Dy CM pay tribute to police martyrs on 26 /11 anniversary

 

 

 

Mumbai Date, 26 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan placed a wreath at the Police Martyrs’ Memorial in the premises of the Mumbai Police Commissionerate on the occasion of the 16th anniversary of the martyrdom of police officers and jawans during the Mumbai terrorist attack (26th Nov 2008).

          Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar also placed wreaths at the Police Martyrs’ Memorial.

A Police platoon presented the Salami Shastra and played the Bigulars' Last Post even as all dignitaries, uniformed officers and family members of martyrs saluted the police martyrs.

Soon after the salutation ceremony, the Governor met the family members of the police martyrs and senior retired and serving officers present on the occasion.

Guardian Ministers Deepak Kesarkar and Mangal Prabhat Lodha, Chief Secretary Sujata Saunik, DGP Rashmi Shukla,Additional chief Secretary Dr I S Chahal, Police Commissioner Vivek Phansalkar and others were present.

 

 

0000


 


स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या चमत्कार पनवेल येथील एक स्वामी भक्त यांच्या घरी 52 अध्याय असलेल्या पोथी मधून अक्षरशा स्वामींच्या

 श्री स्वा


मी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या चमत्कार पनवेल येथील एक स्वामी भक्त यांच्या घरी 52 अध्याय असलेल्या पोथी मधून अक्षरशा स्वामींच्या अंगारा निघत आहे दर्शनासाठी दुर दुर वरून भक्त तिथं येत आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️

Monday, 25 November 2024

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा

 

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक 

आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा

मुंबईदि. २५ :  नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते.  लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी द इंटीग्रेटेड सोल्युशन फॉर बुकींग ऑफ रजिस्ट्रेशन मार्क ऑफ चॉईस’  ही ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

   या सुविधेबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयपिंपरी चिंचवड जि. पुणे येथे चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविना) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून  https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे. 

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती ऑफलाईन पद्धतीने जारी करण्यात येईलअसे परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

ऑनलाईन पद्धतीने पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्याचे टप्पे

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जावून न्यु युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेयमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर)कडे नोंदणीसाठी देण्यात यावी. 

*****

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 

मुंबईदि. २५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे - पवार यांनी कळविले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारणद्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तरप्रात्यक्षिकश्रेणीतोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दिनांक २४ जानेवारी ते सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील.

            माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी ते सोमवार दिनांक १७ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तरप्रात्यक्षिकश्रेणीतोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नयेअसेही राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.


जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘संविधान दिना’निमित्त नरेंद्र जाधव यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 

‘संविधान दिना’निमित्त नरेंद्र जाधव यांची मुलाखत

 

मुंबईदि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात  'संविधान दिना'निमित्त अर्थतज्ज्ञशिक्षणतज्ज्ञलेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि तेव्हापासून २६ नोव्हेंबर हा दिवस देशात 'संविधान दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त संविधान निर्मितीची प्रक्रियाइतिहासवैशिष्ट्ये आणि भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमातून अर्थतज्ज्ञशिक्षणतज्ज्ञलेखक आणि विचारवंतप्रा. डॉ. जाधव यांनी माहिती दिली आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रा. डॉ. जाधव यांची मुलाखत मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. तर दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. २७, गुरूवार दि. २८शुक्रवार दि. २९ आणि शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

भारतीय सैनिकांनी चौकी उभारून प्रचंड मेहनतीनं १२०० किलो वजनाची तोफ चढवून कार्यान्वित केली... भारतीय जवानांच्या निष्ठेला, मेहनतीला मानाचा मुजरा. 🙏🏻👏🇮🇳*

 *काश्मिरमधील द्रास कारगिल येथे १७८०० फूट अतिउंच असलेल्या सुळक्यावर भारतीय सैनिकांनी चौकी उभारून प्रचंड मेहनतीनं १२०० किलो वजनाची तोफ चढवून कार्यान्वित केली... भारतीय जवानांच्या निष्ठेला, मेहनतीला मानाचा मुजरा. 🙏🏻👏🇮🇳*


Featured post

Lakshvedhi