Monday, 25 November 2024

जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘संविधान दिना’निमित्त नरेंद्र जाधव यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 

‘संविधान दिना’निमित्त नरेंद्र जाधव यांची मुलाखत

 

मुंबईदि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात  'संविधान दिना'निमित्त अर्थतज्ज्ञशिक्षणतज्ज्ञलेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि तेव्हापासून २६ नोव्हेंबर हा दिवस देशात 'संविधान दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त संविधान निर्मितीची प्रक्रियाइतिहासवैशिष्ट्ये आणि भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमातून अर्थतज्ज्ञशिक्षणतज्ज्ञलेखक आणि विचारवंतप्रा. डॉ. जाधव यांनी माहिती दिली आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रा. डॉ. जाधव यांची मुलाखत मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. तर दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. २७, गुरूवार दि. २८शुक्रवार दि. २९ आणि शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi