Friday, 2 January 2026

नवीन धोरणानुसार -परभणी जिल्ह्याचा समावेश “झोन-१” मध्ये करण्यात आला आहे.

 नवीन धोरणानुसार -परभणी जिल्ह्याचा समावेश झोन-१ मध्ये करण्यात आला आहे.

नवीन धोरणांतर्गत झोन१ मध्ये देशाच्या सरासरीपेक्षा कमी प्रतिव्यक्ती उत्पन्न असलेले जिल्हे समाविष्ट असतात केलेले आहेत. झोन१ मध्ये समावेश झाल्यामुळे परभणीतील गुंतवणूकदारांना विशेष प्रोत्साहन सवलती मिळणार आहेत.

तसेच परभणी जिल्हा  डीश्रेणी मध्ये कायम ठेवण्यात आला असूनया झोनमध्ये राज्यातील सर्वाधिक औद्योगिक प्रोत्साहन सवलती दिल्या जातात. या निर्णयामुळे नवीन उद्योगगुंतवणूकरोजगार निर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

राज्यमंत्री  साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक मागासलेपणाचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परभणीसाठी विशेष झोन दर्जाची मागणी केली होती. ही मागणी मंजूर होऊन राज्याच्या औद्योगिक धोरणात समाविष्ट करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यात उद्योग सुरू करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल अनुदानेकरसवलतीभांडवली साहाय्य व इतर प्रोत्साहनांचा लाभ मिळणार असूनजिल्हा आता राज्यातील गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण ठरणार आहे.

परभणीतील नागरिकउद्योजकयुवक व शेतकरी वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असूनहा निर्णय परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी नववर्षाची अमूल्य भेट असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

0000

सावित्रीबाई फुले थोडक्यातविचार आणि कार्य आजही तितकेच समर्पक आणि प्रेरणादायी जीवनपट

 सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य आजही तितकेच समर्पक आणि प्रेरणादायी आहेत. शिक्षणसमानता आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी त्यांचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते.

सावित्रीबाई फुले थोडक्यात जीवनपट

पूर्ण नाव : सावित्रीबाई जोतिराव फुले

जन्मतारीख : ३ जानेवारी १८३१

जन्मगाव : नायगावतालुका खंडाळाजिल्हा सातारामहाराष्ट्र

वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे पाटील

 

कार्य / योगदान :

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका

पुणे येथे पहिली मुलींची शाळा (१८४८) सुरू केली

स्त्री शिक्षणबहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य

बालहत्या प्रतिबंधविधवाविवाहस्त्री-पुरुष समानता यांसाठी समाजसुधारणा

सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग

प्लेग साथीच्या काळात रुग्णसेवा

मृत्यू :

१० मार्च १८९७

पुणेमहाराष्ट्र (प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना संसर्गामुळे निधन)

ओळख :

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका

थोर समाजसुधारिकाकवयित्री व शिक्षणतज्ज्ञ


शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नयेत

 शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नयेत

     सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 2 : राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनांतून विनासायासमोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेतअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते. बैठकीस महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाणठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्यासह विविध खाजगी व शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी तसेच दोन्ही जनआरोग्य योजनांचे कर्मचारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कीसर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मोफत मिळावेतया उद्देशाने शासन जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवत आहे. या योजना शासनाच्या नियमानुसारच राबविल्या गेल्या पाहिजेत. मात्र रेशनकार्डाची मूळ प्रत उपलब्ध नसणे किंवा इतर किरकोळ कारणांमुळे रुग्णांना उपचारांपासून वंचित ठेवले जाऊ नये. अशावेळी डिजिटल रेशनकार्ड व्हेरिफिकेशनचा वापर करून रुग्णांना तातडीने उपचार देण्यास प्राधान्य देण्यात यावे.

रुग्णांना कागदपत्रेमंजुरी प्रक्रिया किंवा तांत्रिक अडथळ्यांमुळे त्रास होऊ नयेयासाठी रुग्णालयांतील समन्वयकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समन्वयकांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आवश्यक मार्गदर्शन करून उपचार प्रक्रिया सुलभ करावीअसे निर्देशही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिले. 

गरीब आणि गरजू माणसाला मदत करायची आहेया भावनेने जनआरोग्य योजना अधिक लोकाभिमुख कराव्यातअसे सांगून आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले कीतज्ज्ञ समितीच्या नियमित बैठका घ्याव्यातमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची राज्यभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावीया योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्यास पात्र लाभार्थ्यांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईलअसेही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

बैठकीत शासकीय जनआरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपारदर्शक आणि रुग्णकेंद्रित करण्यावर भर देण्यात आला.

०००००

सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि शाहूपुरी

 सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री  श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेआमदार शशिकांत शिंदेमहेश शिंदेअतुल भोसलेमनोज घोरपडेपोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागीविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी संतोष पाटीलपोलीस अधीक्षक तुषार दोशीमुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनअतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकरपोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये ६९८ सदनिका असून यामध्ये निवासस्थानेव्यायामशाळावाचनालयबहुउद्देशिय सभागृहपॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत. या प्रक्रल्पाचे अतिशय सुंदर काम केल्याबद्दल पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले२०१४ ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिसांना उत्तम घरे मिळाली पाहिजेत हा संकल्प केला होता. यासाठी पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला प्राधिकृत केले. त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली. जुन्या पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. पोलीस कुटुंबीयांच्या जीवनात आनंद निर्माण करुन त्यांना राहण्यायोग्य घरे निर्माण व्हावीत यासाठी आपण ही जबाबदारी पोलीस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळाला दिली.  पोलिसांच्या मुलांना व त्यांच्या कुटुंबाला आनंदी वातावरण मिळावे आणि अनेकवेळा तासंतास सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाने जगता यावेयादृष्टीने या सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून अशाच प्रकारे पोलिसांना उत्तम घर आम्ही देत राहू असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रकल्पाचे उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य अभियंता राजाराम पुरीगोसावीविलास बिरारी यांचे अभिनंदन केले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह प्रकल्पाची पाहणी करुन प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्यांचे वितरण केले. यावेळी पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल

 गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सातारा, दि. २ : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Chief Minister’s Secretariat (Public Relations Wing)

 Chief Minister’s Secretariat (Public Relations Wing)


“The New Year will usher in a new era of prosperity

and development for Maharashtra”

-Chief Minister Devendra Fadnavis

Chief Minister extends New Year greetings on the eve of the New Year

Mumbai, Dec. 31: Expressing confidence that the New Year will mark the beginning of a new chapter of prosperity and development for Maharashtra, Chief Minister Devendra Fadnavis has extended New Year greetings to the people of the state.

In his message on the eve of the New Year, while bidding farewell to the outgoing year, Chief Minister Fadnavis said, Let us forget the bitter moments of the past year and move forward, drawing inspiration from cherished memories. Maharashtra is a leading state across all sectors and continues to provide leadership to the nation. Let us unite to ensure that the flag of Maharashtra’s progress continues to fly high.”

He further stated that the soil of Maharashtra has the strength to accept challenges and called upon citizens to resolve collectively to overcome any challenges that may arise. Expressing hope that the New Year will bring renewed energy and strengthen hopes and aspirations, the Chief Minister wished that the New Year would be healthy for all and bring growth and prosperity across every sector.


Chief Minister’s Secretariat (Public Relations Cell)

 Chief Minister’s Secretariat (Public Relations Cell)

Cabinet Decision (Total – 1)

(Revenue Department)

Three Acres of MTDC Land at Chikhaldara to Amravati’s Ambadevi Sansthan

Mumbai: The State Cabinet, at its meeting chaired by Chief Minister Devendra Fadnavis, has approved the allotment of 3 acres and 8 R of land belonging to the Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) at Mouje Chikhaldara in Amravati district to the Shri Ambadevi Sansthan, Amravati.

The land in question is part of approximately 7.5 acres that was allotted to MTDC in 1975 for developing basic facilities for tourists at Chikhaldara. However, the land had remained unused.

Shri Ambadevi Sansthan, Amravati—which is responsible for the management of Devi Point and the Virat Devi Temple at Chikhaldara—had requested land from the government for the development of these religious sites. Accordingly, the government has decided to resume about 3 acres and 8 R of land from MTDC and allot it free of cost to Shri Ambadevi Sansthan.

The land will be allotted to the temple trust as Occupant Class–II, and it shall be used exclusively for religious purposes.


Featured post

Lakshvedhi