Friday, 2 January 2026

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

 (महसूल विभाग)

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

 

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान,  चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेऊन, ती श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – २ म्हणून मिळणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे. 

यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बीड शहराच्या वैभवात

 राजकारणात केवळ आश्वासने दिली जातात, पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द लागते, हे बीडमधील प्रभाग क्रमांक १३ चे माजी नगरसेवक भीमराव वाघचौरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. वाघचौरे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बीड शहराच्या वैभवात


भर घालणारे दोन मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघचौरे यांच्या मागणीची दखल घेत शहरात भव्य सायन्स पार्क (Science Park) उभारण्यासाठी २८ कोटी आणि स्व. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


भीमराव वाघचौरे: वचननाम्यातील शब्दाला जागले

यंदाची नगर परिषद निवडणूक लढवताना भीमराव वाघचौरे यांनी आपल्या 'वचननाम्या'मध्ये बीडकरांना एक महत्त्वाचे आश्वासन दिले होते. बीडमधील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आधुनिक सायन्स पार्क आणि तारांगण उभारण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. निवडणूक झाल्यानंतरही ते शांत बसले नाहीत. या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक प्रशासनाकडे सातत्याने तगादा लावला होता.

वाघचौरे यांच्या या प्रयत्नांची आणि तळमळीची दखल घेत, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. "माझे स्वप्न साकार झाल्याचे समाधान आहे," अशा भावना व्यक्त करत वाघचौरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.

दादांनी विमानतळावरून फिरवली सूत्रे

एकीकडे भीमराव वाघचौरे यांचा पाठपुरावा सुरू असतानाच, दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या कामाची 'बुलेट ट्रेन' स्टाईल पुन्हा एकदा दाखवून दिली. गुरुवारी (ता. १) बीड दौऱ्यावर येण्यासाठी विमानतळावर असतानाच अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. "मी बीडला पोहोचेपर्यंत निधी मंजुरीचा आदेश निघाला पाहिजे," अशी तडकाफडकी सूचना त्यांनी दिली. आणि झालेही तसेच, दादांचा ताफा बीडमध्ये येईपर्यंत व्हॉट्सॲपवर ८ कोटी १९ लाख रुपयांच्या मंजुरीचा शासन निर्णय (GR) धडकला होता. काम करायचे तर असे करावे, असे म्हणत अजित पवारांनी अधिकाऱ्यांची आणि स्थानिक नेतृत्वाची पाठ थोपटली.

धानोरा रोडवर होणार विज्ञानाची किमया

भीमराव वाघचौरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले हे सायन्स पार्क धानोरा रस्त्यावरील पंढरी येथे साकारण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून यासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कसे असेल हे सायन्स पार्क?

मध्यभागी तारांगण व विज्ञान उद्यान: अंतराळातील रहस्ये उलगडणारे अद्ययावत तंत्रज्ञान.
माहिती केंद्रे: एआय (AI) आणि आभासी तंत्रज्ञानावर (Virtual Reality) आधारित चार विशेष माहिती केंद्रे.
विविध दालने: मानवी इतिहास, निसर्ग शास्त्र आणि पर्यावरण या विषयांवर आधारित स्वतंत्र विभाग.
तारांगण: ग्रह, तारे, उल्का, धूमकेतू, आकाशगंगा आणि नेब्युला यांची माहिती आता मायबोली मराठीतून मिळणार आहे.
नाट्यगृहाचा 'वनवास' संपला

गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तुटलेल्या खुर्च्या आणि असुविधांमुळे कलाकारांची मोठी कुचंबणा होत होती. मात्र, भीमराव वाघचौरे यांनी हा मुद्दा लावून धरला आणि अजित पवारांनी त्याला तत्काळ प्रतिसाद दिला. आता ८ कोटींच्या निधीतून नाट्यगृहाचे संपूर्ण रूप पालटणार असून, वातानुकूलित यंत्रणेसह अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

भीमराव वाघचौरे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे बीडमधील रसिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी 'हुरडा पार्टी' आणि संक्रांत महोत्सव · महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार

 दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी 'हुरडा पार्टीआणि संक्रांत महोत्सव

·         महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार

 

नवी दिल्ली, दि. 1 : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची माहिती देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात हुरडा पार्टी’ आणि मकर संक्रांत महोत्सवाचे ते 11 जानेवारी या कालावधीत दु. 12 ते रात्रौ 9.30 या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी दिली.

 

महाराष्ट्र सदनात डिसेंबर  महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र खाद्य महोत्सवाला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहताआता हिवाळी हंगामाची मेजवानी म्हणून 'हुरडा पार्टी'चे आयोजन करण्यात आले आहे.

 

संक्रांतीचा गोडवा आणि हुरड्याचा खमंग स्वाद

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात 'तिळगूळआणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. पुणेसोलापूरनाशिक आणि मराठवाड्यातील शेतांमध्ये ज्याप्रमाणे शेकोटीवर हुरडा भाजून आनंद साजरा केला जातोतसाच अनुभव येथे दिला जाणार आहे. हुरड्यासोबतच खमंग लसूण चटणीशेंगदाणा कूटपिवळाधमक गूळसाजूक तूपताक आणि चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी,भरीत भाकरीबटाटेवडाभजी सोबतच ऊसबोरंओला हरबरा अशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल येथे असणार आहेथंडी,  शेकोटीची ऊब आणि संगीत मैफिलीत हुरड्याचा आस्वादअसा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जुळून येणार आहे. याबरोबरच  संक्रात वाणासाठी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

 

शहर आणि गाव यांना जोडणारा हा भावनिक पूल दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाणारा ठरणार आहे. ते 11 जानेवारी दरम्यान नवीन महाराष्ट्र सदन येथे होणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि चवीचा आनंद घ्यावाअसे आवाहन निवासी आयुक्त आर विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण

 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट

 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण

 

            मुंबई, दि. 2 : आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली 20 वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. यावेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी. चांगले काम करावे. तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.

नुकतेच 150 डॉक्टरांना 'सेवा खंड कालावधी क्षमापितकेले होते. एकूण 345 डॉक्टरांना पत्र देण्यात आले असूनउर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिन्याभरात क्षमापण पत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन समाधान व्यक्त होत आहे.

             आरोग्य विभागात 2009 पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. 2009 मध्ये या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे. मात्र सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते. वैद्यकीय अधिकारी यांचे संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ त्यांना मिळतील.

            आरोग्यव्यवस्थेत समर्पित सेवा देण्याचा निश्चय करूयाया निर्णयामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होईल. नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनसह विशेष इन्सेटिव्ह देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली असुन उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांची संख्या वाढवून 2399 करण्यात आली आहे . तज्ञ डॉक्टरांच्या मानधनातही भरघोस वाढ केली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपसचिव केंद्रेसहसंचालक राजेंद्र भालेरावअवर सचिव गायकवाडमुख्य प्रशासकीय अधिकारी कारेगावकरआरोग्य विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

०००००

महामार्ग क्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ॲक्सेस-कंट्रोल्ड

 महामार्ग क्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ॲक्सेस-कंट्रोल्ड सहा-पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मुख्य उद्देश असूनयामुळे प्रवासाचा वेळ 17 तास आणि प्रवासाचे अंतर 201 कि.मी. ने कमी होण्याची अपेक्षा आहे. नाशिक-अक्कलकोट (सोलापूर) मार्गामुळे कोप्पर्थी आणि ओरवाकल या प्रमुख नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआयसीडीसीनोड्सवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची लॉजिस्टिक क्षमता सुधारणार आहे. नाशिक-तळेगाव दिघे हा भाग पुणे-नाशिक एक्सप्रेसवेच्या विकासाच्या दृष्टीने  देखील महत्वाचा आहे. एनआयसीडीसीने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे हाती घेतल्या जाणाऱ्या प्रस्तावित नवीन एक्सप्रेसवेचा भाग म्हणून हा प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे सुधारित सुरक्षा आणि विनाव्यत्यय वाहतुकीसाठी  द्रुत-गती मार्ग उपलब्ध होणार आहे.  यामुळे प्रवासाचा वेळवाहतूक कोंडी आणि परिचालन खर्च कमी व्हायला मदत होईल.  महत्त्वाचे म्हणजेहा प्रकल्प या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच नाशिकअहिल्यानगरधाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सर्वांगीण आर्थिक विकासात मोलाचे योगदान देईल.

हा सहा पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर 'क्लोज टोलिंग'  सुविधेसह असणार आहे.  सरासरी ताशी 60 कि.मी. आणि ताशी 100 कि.मी. डिझाइन स्पीडची अनुमती असेल. यामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे 17 तासांपर्यंत कमी होईल (31 तासांवरून 45टक्केची घट)तसेच प्रवासी आणि मालवाहू  वाहनांसाठी अधिक सुरक्षितवेगवान आणि विनाव्यत्यय दळण वळणाची सुविधा उपलब्ध होईल.

 

या प्रकल्पामुळे सुमारे 251.06 लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि 313.83 लाख मनुष्य-दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. या प्रस्तावित मार्गिकेच्या आसपासच्या परिसरात आर्थिक घडामोडी वाढल्यामुळे अतिरिक्त रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील.

नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण

 नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेलानाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -60 (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळण वळण उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूनेतिरुवल्लूररेणिगुंटाकडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (700 कि.मी. लांब) चार पदरी मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

 केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या

सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

 

नवी दिल्ली दि. 31- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड  नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे.

नाशिकअहिल्यानगरसोलापूर या महत्त्वाच्या  शहरांसह पुढे कुर्नुलला जोडणारा हा प्रकल्प पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद्  आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेलानाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -60 (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळण वळण उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूनेतिरुवल्लूररेणिगुंटाकडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (700 कि.मी. लांब) चार पदरी मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.


Featured post

Lakshvedhi