Friday, 2 January 2026

यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बीड शहराच्या वैभवात

 राजकारणात केवळ आश्वासने दिली जातात, पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द लागते, हे बीडमधील प्रभाग क्रमांक १३ चे माजी नगरसेवक भीमराव वाघचौरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. वाघचौरे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बीड शहराच्या वैभवात


भर घालणारे दोन मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघचौरे यांच्या मागणीची दखल घेत शहरात भव्य सायन्स पार्क (Science Park) उभारण्यासाठी २८ कोटी आणि स्व. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


भीमराव वाघचौरे: वचननाम्यातील शब्दाला जागले

यंदाची नगर परिषद निवडणूक लढवताना भीमराव वाघचौरे यांनी आपल्या 'वचननाम्या'मध्ये बीडकरांना एक महत्त्वाचे आश्वासन दिले होते. बीडमधील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आधुनिक सायन्स पार्क आणि तारांगण उभारण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. निवडणूक झाल्यानंतरही ते शांत बसले नाहीत. या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक प्रशासनाकडे सातत्याने तगादा लावला होता.

वाघचौरे यांच्या या प्रयत्नांची आणि तळमळीची दखल घेत, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. "माझे स्वप्न साकार झाल्याचे समाधान आहे," अशा भावना व्यक्त करत वाघचौरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.

दादांनी विमानतळावरून फिरवली सूत्रे

एकीकडे भीमराव वाघचौरे यांचा पाठपुरावा सुरू असतानाच, दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या कामाची 'बुलेट ट्रेन' स्टाईल पुन्हा एकदा दाखवून दिली. गुरुवारी (ता. १) बीड दौऱ्यावर येण्यासाठी विमानतळावर असतानाच अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. "मी बीडला पोहोचेपर्यंत निधी मंजुरीचा आदेश निघाला पाहिजे," अशी तडकाफडकी सूचना त्यांनी दिली. आणि झालेही तसेच, दादांचा ताफा बीडमध्ये येईपर्यंत व्हॉट्सॲपवर ८ कोटी १९ लाख रुपयांच्या मंजुरीचा शासन निर्णय (GR) धडकला होता. काम करायचे तर असे करावे, असे म्हणत अजित पवारांनी अधिकाऱ्यांची आणि स्थानिक नेतृत्वाची पाठ थोपटली.

धानोरा रोडवर होणार विज्ञानाची किमया

भीमराव वाघचौरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले हे सायन्स पार्क धानोरा रस्त्यावरील पंढरी येथे साकारण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून यासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कसे असेल हे सायन्स पार्क?

मध्यभागी तारांगण व विज्ञान उद्यान: अंतराळातील रहस्ये उलगडणारे अद्ययावत तंत्रज्ञान.
माहिती केंद्रे: एआय (AI) आणि आभासी तंत्रज्ञानावर (Virtual Reality) आधारित चार विशेष माहिती केंद्रे.
विविध दालने: मानवी इतिहास, निसर्ग शास्त्र आणि पर्यावरण या विषयांवर आधारित स्वतंत्र विभाग.
तारांगण: ग्रह, तारे, उल्का, धूमकेतू, आकाशगंगा आणि नेब्युला यांची माहिती आता मायबोली मराठीतून मिळणार आहे.
नाट्यगृहाचा 'वनवास' संपला

गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तुटलेल्या खुर्च्या आणि असुविधांमुळे कलाकारांची मोठी कुचंबणा होत होती. मात्र, भीमराव वाघचौरे यांनी हा मुद्दा लावून धरला आणि अजित पवारांनी त्याला तत्काळ प्रतिसाद दिला. आता ८ कोटींच्या निधीतून नाट्यगृहाचे संपूर्ण रूप पालटणार असून, वातानुकूलित यंत्रणेसह अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

भीमराव वाघचौरे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे बीडमधील रसिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi