Thursday, 1 January 2026

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

 धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला

३१ जानेवारी२०२६ पर्यंत मुदतवाढ

 

मुंबईदि. १ : खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी करिता ३१ डिसेंबर२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.

 

शेतकरी नोंदणीस देण्यात आलेल्या  मुदतवाढ कालावधीत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन शेतकऱ्यांच्या नोंदणीची कार्यवाही करण्याबाबत विभागाने संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे. शेतकरी नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत होती,  तिला वाढ देण्याबाबत लोकप्रतिनिधीनकडून तसेच विविध स्तरावरुन मागणी होती.  त्यानुषंगाने खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा

 दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा

                                              -सचिव तुकाराम मुंढे

 

       मुंबईदि. १ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम२०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.

सचिव मुंढे म्हणालेजिल्हा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न व तक्रारी ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद यांच्या उपाध्यक्षतेखाली विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारीत्यावर घेण्यात आलेले निर्णय तसेच करण्यात आलेली कार्यवाही यांचा सविस्तर अहवाल आयुक्तदिव्यांग कल्याण तसेच शासनास सादर करण्यात येणार आहे. बैठकीदरम्यान शासनस्तरावर निर्णय किंवा कार्यवाही आवश्यक असलेल्या मुद्द्यांसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करून सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमधून आरोग्य तपासणीवैद्यकीय सल्ला व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होणार असूनया उपक्रमांमुळे दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मार्गी लागतीलअसे सचिव मुंढे यांनी सांगितले.

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

 सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी

अर्ज सादरीकरणा मुदतवाढ

 

मुंबईदि. १ : सैनिक कल्याण विभागमहाराष्ट्र राज्यपुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहेअर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुंबई शहराचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

या भरतीसंदर्भातील जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होतीतर शुद्धिपत्रक ७ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आले होते. संबंधित भरतीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रीय झाल्याने इच्छुक उमेदवारांना वेबलिंकपर्यंत पोहोचण्यात अडचण येत असल्याने मुदत वाढ देण्यात आली आहे.

 

विभागाने दिलेल्या माहितीनुसारउमेदवारांनी खालील Web Link किंवा QR Code चा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

अर्जासाठीची लिंक:

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html

 

00000

 


 

Maharashtra Governor Acharya Devvrat releases ‘Lok Bhavan’ Calendar

 Maharashtra Governor Acharya Devvrat releases ‘Lok Bhavan’ Calendar

 

Maharashtra and Gujarat Governor Acharya Devvrat released the calendar of Maharashtra Lok Bhavan for the year 2026 at Lok Bhavan Mumbai on Thursday (1 Jan.). This is the maiden calendar prepared after the renaming of Maharashtra Raj Bhavan as Lok Bhavan.

 

Speaking on the occasion, Governor Devvrat congratulated all those associated with the initiative for bringing history to the fore through the medium of the Calendar.

 

The calendar features photographs of the historic buildings of Lok Bhavan, captured over time by several renowned photographers.

 

In addition to Lok Bhavan at Mumbai, the calendar also includes photographs of the Lok Bhavans located in Nagpur, Pune, and Mahabaleshwar.

 

It also carries a photograph of the national bird, the peacock, for whom Lok Bhavan premises in Mumbai serves as a habitat.

 

Along with new photographs of the historic buildings, the calendar also includes old photographs of the respective heritage buildings. Each photograph has been provided with its historical context.

 

The calendar includes works of photographers Sudhakar Olwe, Navin Bhanushali, Sachin Vaidya, Pratik Chorge, Hanif Tadvi, Sandeep Yadav, Vaibhav Nadgaonkar, Raman Kulkarni, Nagorao Rodewad, Satish Kulkarni, and Chandrakant Khandagale.

 

Secretary to the Governor Dr. Prashant Naranware, Deputy Secretary to the Governor S Ramamoorthy, and Public Relations Officer Umesh Kashikar were present on the occasion.


राज्यपाल आचार्य देवव्रत के हाथों ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिका का विमोचन

 राज्यपाल आचार्य देवव्रत के हाथों

महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिका का विमोचन

 

मुंबई, दि. ०१ :महाराष्ट्र राजभवन का नाम लोकभवन’ किए जाने के बाद पहली बार तैयार की गई महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिका का विमोचन महाराष्ट्र एवं गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत द्वारा को लोकभवनमुंबई में किया गया।

इस अवसर पर राज्यपाल आचार्य देवव्रत ने दिनदर्शिका के माध्यम से इतिहास को सामने लाने के लिए इससे जुड़े सभी लोगों को बधाई दी।

दिनदर्शिका में अनेक नामांकित छायाचित्रकारों द्वारा समय-समय पर लिए गए लोकभवन की ऐतिहासिक इमारतों के उत्कृष्ट छायाचित्र शामिल किए गए हैं।  मुंबई स्थित लोकभवन के साथ-साथ नागपुरपुणे एवं महाबलेश्वर स्थित लोकभवनों की इमारतों के छायाचित्र भी दिनदर्शिका में सम्मिलित किए गए हैं। इसके अतिरिक्तमुंबई के लोकभवन परिसर में स्वतंत्र रूप से विचरण करने वाले राष्ट्रीय पक्षी मोर के छायाचित्र को भी दिनदर्शिका में स्थान दिया गया है।

ऐतिहासिक इमारतों के नवीन छायाचित्रों के साथ-साथ संबंधित इमारतों के पुराने छायाचित्र भी दिनदर्शिका में शामिल किए गए हैं। प्रत्येक छायाचित्र को ऐतिहासिक संदर्भ के साथ प्रस्तुत किया गया है।

दिनदर्शिका में सुधारक ओलवेनवीन भानुशालीसचिन वैद्यप्रतीक चोरगेहनीफ तडवीसंदीप यादववैभव नाडगांवकररमण कुलकर्णीनागोराव रोडेवाडआकाश मनसुखानीसतीश कुलकर्णी तथा चंद्रकांत खंडागळे द्वारा लिए गए छायाचित्र शामिल हैं।

इस अवसर पर राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपाल के उपसचिव राममूर्ति तथा जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर उपस्थित थे।

राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

 राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

 

मुंबई, दि. १ :- महाराष्ट्र राजभवनाचे नाव लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवनमुंबई येथे करण्यात आले.

यावेळी राज्यपाल देवव्रत यांनी दिनदर्शिकेच्या माध्यमातून इतिहास पुढे आणल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

अनेक नामांकित छायाचित्रकारांनी वेळोवेळी काढलेल्या लोकभवनातील ऐतिहासिक वास्तूंच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा दिनदर्शिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई लोकभवनाशिवाय दिनदर्शिकेमध्ये नागपूरपुणे व महाबळेश्वर येथील लोकभवनांच्या वास्तूंची देखील आणि मुंबई येथील लोकभवनामध्ये मुक्त संचार असलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.

ऐतिहासिक वास्तूंच्या नव्या छायाचित्रांसोबतच संबंधित वास्तूंच्या जुन्या छायाचित्रांचा देखील दिनदर्शिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे.  प्रत्येक छायाचित्राला ऐतिहासिक संदर्भ देण्यात आला आहे.

दिनदर्शिकेत सुधारक ओलवेनवीन भानुशालीसचिन वैद्यप्रतिक चोरगेहनीफ तडवीसंदीप यादववैभव नाडगावकररमण कुलकर्णीनागोराव रोडेवाडआकाश मनसुखानीसतीश कुलकर्णीचंद्रकांत खंडागळे यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपालांचे उपसचिव राममूर्ती व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर  उपस्थित होते.

“The New Year will usher in a new era of prosperity

 “The New Year will usher in a new era of prosperity

and development for Maharashtra”

-Chief Minister Devendra Fadnavis

Chief Minister extends New Year greetings on the eve of the New Year

Mumbai, Dec. 31: Expressing confidence that the New Year will mark the beginning of a new chapter of prosperity and development for Maharashtra, Chief Minister Devendra Fadnavis has extended New Year greetings to the people of the state.

In his message on the eve of the New Year, while bidding farewell to the outgoing year, Chief Minister Fadnavis said, Let us forget the bitter moments of the past year and move forward, drawing inspiration from cherished memories. Maharashtra is a leading state across all sectors and continues to provide leadership to the nation. Let us unite to ensure that the flag of Maharashtra’s progress continues to fly high.”

He further stated that the soil of Maharashtra has the strength to accept challenges and called upon citizens to resolve collectively to overcome any challenges that may arise. Expressing hope that the New Year will bring renewed energy and strengthen hopes and aspirations, the Chief Minister wished that the New Year would be healthy for all and bring growth and prosperity across every sector.


Featured post

Lakshvedhi