Saturday, 6 December 2025

बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे दुपारी 1 वा. प्रसारण

 बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे दुपारी 1 वा. प्रसारण

भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 1 वाजता महासंचालनालयाच्या एक्सफेसबुक आणि यूट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने एन.एस. थापा यांनी 1981 मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे सकाळी ११ वा. प्रसारण*

 महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे सकाळी ११ वा. प्रसारण*

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता. महासंचालनालयाच्या एक्स,  फेसबुक आणि यूट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेचलाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या ११ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै 1968 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे मानवंदना माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना

माहिती व जनसंपर्कतर्फे मानवंदना

माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार

 

मुंबईदि. ४ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ शनिवार, 6 डिसेंबर 2025 रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

 

महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी 11 वा. आणि बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 1 वाजता तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. माहितीपट व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

 

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक –  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

ऊर्जा क्षेत्रात नवे युग

 ऊर्जा क्षेत्रात नवे युग

 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटायझेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) ऊर्जा क्षेत्राचे आधुनिकीकरण करणार आहे. महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात नवे युग सुरू होणार आहे.

उपक्रमाचे मुख्य उद्दिष्टे

- वीज प्रवाहग्रीड ऑप्टिमायझेशनआणि नूतनीकरणीय ऊर्जेचे एकत्रीकरण अधिक प्रभावी होणार. 

- ग्राहक सेवा आणि वितरण कार्यक्षमता सुधारून आर्थिक सक्षमता साध्य घेणार. 

 - महाराष्ट्रातील संपूर्ण वीज वितरण विद्युत वाहिन्यांच्या देखभाल व नियोजनात सुधारणा घेणार. 

ग्रामीण ग्राहक व शेतकऱ्यांना लाभ

या नवीन डिजिटल प्रणालीमुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवता येईलशेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील ग्राहकांना अधिक विश्वसनीय आणि अखंड वीजपुरवठा मिळेल.

 #आर्थिक व पर्यावरणीय परिणाम

- वीज वितरणातील दरवर्षी सुमारे ₹10001500 कोटींची बचत. 

- हरित ऊर्जा वापर वाढल्याने प्रदूषणात घट.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व

       उपक्रमात जागतिक सहभागामुळे याप्रकारच्या डिजिटल उपाययोजनाविशेषतः भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशांतवीजविषयक स्थिरताअखंड उपलब्धता व ग्रामीण भागांत विद्युत सेवांची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाचा बदल ठरू शकतो. भारतात वीज वितरण व्यवस्थेत एआय डिजिटल प्रणाली वापराचा महत्त्वपूर्ण प्रयत्न होत असूनआधुनिक भारताला शाश्वत स्वयंपूर्णपर्यावरणपूरक कार्यक्षम ऊर्जा प्रणालीची गरज आहे. या उपक्रमामुळे यात योगदान देण्याची संधी महाराष्ट्राला प्राप्त झाली आहे. 

         

हरित ऊर्जा प्रणालीकडे स्वयंपूर्ण कार्यक्षम वाटचाल संधी

 हरित ऊर्जा प्रणालीकडे स्वयंपूर्ण कार्यक्षम वाटचाल संधी

          ऊर्जा क्षेत्रावर हे बदल मोठे परिणाम करणार आहेअसे ऊर्जा विभागाने म्हटले आहे. या डिजिटल रूपांतरणामुळे प्रकल्प व्यवस्थापनात जलद निर्णय घेता येतात. यामुळे ग्रीडच्या कार्यक्षमतेत वाढ झाली असूनसौर ऊर्जा अधिक प्रमाणात उपयोगात आली आहे. या हरित ऊर्जा वापराने प्रदूषणात मोठी घट होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे विद्युत वितरणामध्ये कमीत कमी एक टक्का जरी वीज गळती घटली तरी वर्षाला सुमारे 1000-1500 कोटी रुपयांची बचत होऊन नुकसानीत मोठी घट होणार आहे.

डिजिटायझेशन उपक्रम : महाराष्ट्रातील वाटचाल

 डिजिटायझेशन उपक्रम : महाराष्ट्रातील वाटचाल

          महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील शेतकरी आणि वीज ग्राहक यांना या नवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक विश्वसनीय व विजेची सहज उपलब्धता मिळणार आहे. जागतिक स्तरावरील ए आय तंत्रज्ञान व ऊर्जा क्षेत्रातील थेट भागीदारीच्या मदतीनेमहाराष्ट्रात प्रगत डिजिटल प्रणाली लागू होइल. ज्यामुळे वीज प्रवाहाची अचूकताक्षेत्रीय कामकाजआणि ऊर्जा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे.

            या उपक्रमामध्येवीज नेटवर्कचे डिजिटल मॉडेल तयार केले जात आहे जेणेकरून वीज प्रवाहाचे विश्लेषणग्रीडची ऑप्टिमायझेशनवीज आउटेज नियोजननवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांचे (आरईअधिक चांगले समायोजन होईल. विद्युत वाहिन्यांच्या देखभालीसाठी अधिक जागरूक नियोजन तसेच शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा वापर यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली काम करेल.

           ही डिजिटल प्रणाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएसईडीसीएलमध्ये लागू केली जात आहेज्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या तांत्रिक किचकट अडचणी दूर होण्याची ही सुरवात आहे.

Featured post

Lakshvedhi