Thursday, 4 December 2025

माहिती व जनसंपर्क विभाग – शासनाचा खरा दुवा

 माहिती व जनसंपर्क विभाग – शासनाचा खरा दुवा

शासनाचे लोकराज्य मासिक हे अतिशय माहितीपूर्ण आणि संग्रही मासिक आहे. डिजीटल स्वरुपातही माहिती जनतेला मिळेल यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. शासकीय माहिती जनतेपर्यंत पोहोचवणारा खरा वाहक म्हणून विभागाने आपली वेगळी ओळख निर्माण करावी. सत्यता विश्वसनीयतापारदर्शकता आणि गतीमानता ही जनसंपर्क विभागाची ओळख बनली पाहिजेअसे फडणीस यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विविध विषायावर श्री. फडणीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी यांनी श्री. फडणीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचलन विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे यांनी केले तर आभार वरिष्ठ सहायक संचालक काशीबाई थोरात यांनी मानले.

राज्यांच्या गुंतवणुकीचे उदाहरण

 राज्यांच्या गुंतवणुकीचे उदाहरण

केरळउत्तर प्रदेशतामिळनाडू यांसारख्या अनेक राज्यांनी शासकीय माध्यमात मोठी गुंतवणूक करून पर्यटनउद्योग व शासन व्यवस्था यांची प्रभावी प्रसिद्धी केली आहे. महाराष्ट्र हे मूलतः विकसित राज्य असल्याने पर्यटनउद्योगसंस्कृती आणि शासन प्रगती यांची देशातील इतर राज्यात प्रभावी प्रसिद्धी करण्यावर भर द्यावाअसेही फडणीस यांनी यावेळी सांगितले.

क्रिएटिव्हिटी, प्रॉडक्टिव्हिटी आणि प्रभावी कंटेंट यांचे महत्त्व

 क्रिएटिव्हिटीप्रॉडक्टिव्हिटी आणि प्रभावी कंटेंट यांचे महत्त्व

जनतेपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती प्रभावीआकर्षक आणि क्रिएटिव्ह असणे अत्यावश्यक आहे. मनोरंजनाच्या स्वरूपात दिली जाणारी माहिती अधिक लक्षवेधी ठरतेत्यामुळे विभागाने माहिती सादरीकरणाचा आधुनिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाची प्रॉडक्टिव्हिटी चारपट वाढणार असूनडिजिटल साधनांचा वापर हे यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेलअसेही फडणीस यांनी सांगितले.

स्वतंत्र ॲप आणि स्वतःचा डेटा-बेस आवश्यक

 स्वतंत्र ॲप आणि स्वतःचा डेटा-बेस आवश्यक


माहिती व जनसंपर्क विभागाने आपले स्वतंत्र आधुनिक ॲप विकसित करून त्याद्वारे शासकीय माहिती, प्रसिद्धिपत्रके, धोरणात्मक घोषणा आणि जनजागृती मोहीमा थेट जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. स्वतःचा डेटा-बेस तयार केला तर माहिती अधिक जलद व अचूक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल, असेही फडणीस यांनी नमूद केले.

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा

 पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि. २ : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव (नगरविकास) असीम गुप्तावैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारएमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाडवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवालेमहाव्यवस्थापक श्रीमंत पाटोळेतसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे शैलेंद्र मोरेदीपक गायकवाडनिखिल दुर्गाईजीवन घोंगडेआनंद घेडेनीता अडसुळेस्वाती गायकवाडअर्चना केदारी, संदीप शिंदेमिलिंद अहिरेसुधीर कुरूमकर उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, संबंधित जागा सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात यावा. यासंदर्भातील सर्व मुद्यांची दखल घेवून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या

स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव

 

मुंबई,दि.३ : पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढविणे आणि विकास योजनांची जलद अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागामार्फत राज्यात सन २०२५-२६ पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतपंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या कामगिरीच्या आधारे तालुकाजिल्हामहसूल विभाग व राज्य स्तरावर मूल्यमापन करून पुरस्कार देण्यात येणार आहेत. या योजनेचे स्वरुप स्पर्धात्मक असल्यामुळे या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदांना आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून दरवर्षी किमान १० टक्के निधी या अभियानासाठी राखीव ठेवण्यास ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या  ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासननिर्णयान्वये मान्यता  दिली आहे.

       अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि प्रचारात्मक खर्चासाठी जिल्हा परिषदांना स्वनिधी (सेस फंड) अपुरा ठरत असल्यानेजिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून दरवर्षी किमान १० टक्के निधी या अभियानासाठी राखीव ठेवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

       शासन निर्णयानुसारसंबंधित जिल्हा परिषदांनी हा निधी अभियानातील घटकांसाठी प्राप्त प्रस्तावांनुसार आणि शासनाने दिलेल्या वेळापत्रकातच खर्च करणे अनिवार्य राहणार आहे. अधिक पारदर्शकता आणि प्रभावी नियोजनासाठी क्षमता बांधणीप्रशिक्षणकार्यशाळायशोगाथा फिल्ममेळावे आणि तांत्रिक सहाय्य इत्यादींसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.

       हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५११०४१८१५४९६६२० असा आहे. 

 

विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध

 विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध

मुंबई, दि.३:- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात येऊन  विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.असे अभिनव उपक्रम महाविद्यालयांनी राबवावेत असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयातडिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते  दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला.

यावेळी  आदिवासी विकास मंत्री  डॉ. अशोक वुईके (ऑनलाइन)उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरतंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईकग्रंथालय संचालक अशोक गाडेकरतसेच विभागातील अधिकारीप्राचार्यप्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेविद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. डिजिटल रीडिंग झोनमुळे वाचन संस्कृतीला मोठी चालना मिळेल आणि  विद्यार्थ्यांना  संशोधनासाठी उपयुक्त माहिती सहज उपलब्ध होईल.

या उपक्रमात जागतिक दर्जाच्या नामांकित अशा १० हजारपेक्षा अधिक जर्नल्सचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना कुठेहीकधीही अभ्यासाची सोयऑफलाइन डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यास सामग्रीचालू घडामोडीजनरल स्टडीज साहित्य आणि परीक्षा निहाय वर्गीकृत माहिती प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Featured post

Lakshvedhi