Monday, 1 December 2025

डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत..

 डिसेंबर अखेर महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत..

                                                                                                - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. 20 :  या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा-भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे. तब्बल 14 वर्षाच्या पाठपुराव्याला यश येत असून मिरा-भाईंदरवासियांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहेअशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  दिली.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केलात्यावेळी ते  बोलत होते. त्यांच्या सोबत महामेट्रो’ चे अधीक्षक अभियंता व त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम उपस्थित  होती.

मंत्री सरनाईक म्हणाले की,  सन 2009 मध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलोत्यावेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. गेल्या 14 वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते  काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच एअरपोर्ट टी-1 स्थानक वरून मेट्रो 3 चा वापर करून  थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतील.

त्याचबरोबरनवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालयविधान भवन  येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे.

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकते प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

 मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकते प्रकरणी अहवाल

सादर करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. २० : मौजे महमदवाडी (ता. हवेलीजि. पुणे) येथील तक्रारप्राप्त जमीन मिळकतीबाबतचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश विधानसभा  उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले .

विधानभवनात आयोजित बैठकीस महसूल उपसचिव अजित देशमुखहवेली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव मानेमंडळ अधिकारी मिलिंद सेठीग्राम महसूल अधिकारी  स्वप्नील आंबेकर उपस्थित होते.

मौजे महमदवाडी (ता. हवेलीजि. पुणे) येथील स.न. ४४एकूण क्षेत्र ५ हेक्टर ९१ आर जमिनीच्या मिळकतीबाबतचे निवेदन प्राप्त झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करूनतक्रारकर्त्यांनी मांडलेल्या सर्व आक्षेपांसंदर्भात सविस्तर तपास अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिले. हवेली तालुक्यातील जमीन बेकायदेशीर ताब्यात घेतल्यासंदर्भात सात दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही उपाध्यक्ष बनसोडे अधिकाऱ्यांना दिले.

टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि

 कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च २६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिली. तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.

राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून

    राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. तसेच राज्य शासनाकडे आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या  पायाभूत सुविधाउद्योग क्षेत्रातील ज्ञानअनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योग समूहांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढच्या या अनुषंगाने अनेक रोजगाराभिमुख सामंजस्य करार होतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

   यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माव्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी,  टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश रावकंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक भास्कर पै आणि मुख्य व्यवस्थापक रवी  सोनटक्के उपस्थित होते

किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ·

  किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि

प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार

·         ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी, ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

 

      मुंबई दि. २० : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

 

      या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये ( एलएमव्हीहलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तेथे शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ८ हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च २६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिली. तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत 6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025 youthfestival.srmd.org

 क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत

6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025

 

मुंबईदि. 20 : शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डनवांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या सहकार्याने ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यामध्ये १०,००० पेक्षा जास्त तरुण मन:शांतीअॅडव्हेंचरआर्ट्सकल्चरसंगीतयोग-ध्यानसमाजाभिमुख उपक्रम आणि (स्किल-बिल्डिंग) कौशल्य विकास यांसारख्या अनोख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

 

क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्यानेहा देशातील आघाडीचा युवक उत्सव ठरणार आहे. आत्मपरिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवण्यासाठी हा उत्सव तरुणांची चळवळ म्हणून उभी राहील.

 

लंडन आणि पुण्यासारख्या शहरानंतर ग्लोबल यूथ फेस्टिव्हल या वर्षी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. ग्लोबल यूथ कम्युनिटी ही २० पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 170 पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेली तरुणांची एक प्रेरणादायी चळवळ आहे. क्रिएटर्सव्यावसायिककलाकारउद्योजक आणि चेंजमेकर यांनी एकत्रित येऊन ग्लोबल यूथ कमिटी तयार केली आहे.

 

हजारो लोकांना एकत्र आणणारे सायकलथॉनसारखे उपक्रमग्रामीण विकासासाठी केलेले अनेक प्रकल्पआरोग्यप्राणी-कल्याणशिक्षण यांसाठी उभारलेले उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ मनोरंजन नसून प्रभाव आणि परिवर्तनाचा उत्सव ठरणार आहे.

 

संगीत किंवा कला अशा एखाद्या विषयापुरते मर्यादित न राहताग्लोबल युथ फेस्टिवल हा समग्र अनुभव देणारा उत्सव आहे. महिला सक्षमीकरणबालशिक्षणग्रामीण विकासप्राणी-कल्याणपर्यावरण संवर्धन यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांचे प्रात्यक्षिक देशातील सर्वात मोठा आऊटडोअर साउंड हीलिंग अनुभवसंगीतकलाध्यानजर्नलिंगपॉटरीड्रम सर्कल अशा मजेशीर पॉप-अप अ‍ॅक्टिव्हिटीज यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी youthfestival.srmd.org येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या

 गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी

आंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या

                                                 -पर्यटन मंत्री शंभुराज देसाई

 

मुंबई,दि.24 : गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे 128 एकर जमिनीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास केला जाणार असूनयाबाबतचा आढावा  पर्यटनखनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यासंदर्भातील सर्व प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज  देसाई यांनी यावेळी दिले.

            मेघदूत या निवासस्थानी गोराई प्रकल्पाबाबतचा आढावा घेताना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेपर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणेउपसचिव विजय पोवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi