डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स महाविद्यालय, वडाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळमधील बीआयटी चाळ, सिद्धार्थ महाविद्यालय, फोर्ट या स्थळांचा समावेश आहे. या टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवास, सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 1 December 2025
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन
-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयाचा कौतुकास्पद उपक्रम
मुंबई, दि.29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून पर्यटन संचालनालयामार्फत दि. 3, ते 5 डिसेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील चैत्यभूमी येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी महान कार्य, त्यांचे जीवनचरित्र, विचार पर्यटक व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या टूर सर्कीटचा मुख्य उद्देश आहे.पर्यटकांनी या पर्यटन सर्किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर “पर्यटन सर्किट” ही केवळ एक पर्यटन संकल्पना नसून, भारताच्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी कार्य, संघर्ष आणि आदर्श या परिपथाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने हाती घेतलेला हा उपक्रम, इतिहास, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यांना जोडणारा प्रेरणादायी प्रवास आहे. या परिपथामुळे अनुयायी, पर्यटकांना बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळेल. हा केवळ प्रवास नसून, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती आहे, असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले.
पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई shebox.wcd.gov.in
पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
कायद्याप्रमाणे तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखास कलम 26 नुसार 50,000 रुपयांपर्यंत दंड तसेच, उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास दंड दुपटीने वाढविणे, आस्थापनेचा परवाना रद्द करणे किंवा अन्य कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. अंतर्गत समितीची माहिती केंद्र सरकारच्या शी बॉक्स पोर्टलवर (shebox.wcd.gov.in) अद्ययावतपणे अपलोड करावी.
तसेच नागरिक ज्या कार्यालये किंवा आस्थापनांना भेट देतील, त्या ठिकाणी अंतर्गत समितीचा फलक प्रदर्शित नसेल, तर त्याबाबत तक्रार 181 या महिला हेल्पलाईनवर तक्रार करावी. असे आवाहनही आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना पोश कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी
सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना पोश कायद्याची
काटेकोर अंमलबजावणी करावी
-महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे
· पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
मुंबई, दि. 28 : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व सरकारी विभाग, निमशासकीय संस्था तसेच खासगी आस्थापनांनी प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी अंतर्गत समिती तातडीने गठीत करण्याचे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
ज्या कार्यालये किंवा आस्थापनांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कंपनी, नगरपरिषद, तसेच शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाकडून निधी प्राप्त करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे खासगी कंपन्या, उद्योग, सेवा पुरवठादार संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, मनोरंजन क्षेत्रातील संस्था, क्रीडा संघटना, क्रीडा संकुले आदी सर्व खासगी आस्थापनांनाही हा नियम लागू आहे.
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी
1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत
मुंबई, दि. 28 : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.
0000
प्रोजेक्ट महा-देवा’ राज्यस्तरीय स्काऊटिंग अंतिम फेरीचे उद्घाटन · राज्यात फुटबॉलचा पाया मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने महा-देवा महत्वपूर्ण प्रकल्प
प्रोजेक्ट महा-देवा’ राज्यस्तरीय स्काऊटिंग अंतिम फेरीचे उद्घाटन
· राज्यात फुटबॉलचा पाया मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने महा-देवा महत्वपूर्ण प्रकल्प
मुंबई, दि. २८ : क्रीडा विभागातर्फे ‘प्रोजेक्ट महा-देवा’च्या राज्यस्तरीय स्काऊटिंग अंतिम फेरीचे उद्घाटन मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कुपरेज फुटबॉल मैदान येथे करण्यात आले. महाराष्ट्रात फुटबॉलचा पाया मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची शुक्रवारी औपचारिक सुरुवात झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील फुटबॉलचा विकास साधण्यासाठी ‘प्रोजेक्ट महा-देवा’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रतिभावान खेळाडू शोधणे, त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रगतीसाठी आवश्यक पाठबळ देणे हे प्रकल्पाचे मुख्य ध्येय आहे. ग्रामपातळीवर सुरू झालेल्या निवड प्रक्रियेतून राज्यातील 120 प्रतिभावान फुटबॉलपटूंनी प्रोजेक्ट महा-देवाच्या अंतिम राज्यस्तरीय चाचणीपर्यंत मजल मारली आहे. या प्रक्रियेतून राज्यातील सर्वोत्तम 30 मुले आणि 30 मुली निवडण्याची अंतिम फेरी आता पार पडत आहे.
निवडलेल्या 60 फुटबॉलपटूंना महाराष्ट्र सरकारतर्फे पाच वर्षांची विशेष शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. तसेच या तरुणांना 14 डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्याकडून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला मित्र चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, विफा चे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मित्र चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, नवनाथ फडतरे, युनिसेफ इंडियाच्या प्रमुख सिंथिया मॅकेफ्रे, युनिसेफ महाराष्ट्राचे प्रमुख संजय सिंह तसेच व्हीएसटीएफ चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंह बायस गोट टूर प्रमोटर सत्तादूर दत्ता उपस्थित होते.
भारत 2034 फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरेल, तेव्हा राष्ट्रीय संघात किमान पाच खेळाडू महाराष्ट्रातील असावेत, या दृष्टीने राज्य सरकार आणि क्रीडा विभाग विशेष प्रयत्नशील आहेत. क्रीडा विभाग, मित्रा, विफा, विएसटीएफ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट महा-देवा’ महाराष्ट्रातील फुटबॉलप्रेमी तरुणांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा निर्णायक उपक्रम ठरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Maharashtra Governor releases the Information Brochure and Poster for Mahaparinirvan Din
Maharashtra Governor releases the Information Brochure and Poster for Mahaparinirvan Din
Maharashtra and Gujarat Governor Acharya Devvrat released a Poster and Information brochure containing instructions for the visitors to Chaityabhumi at a brief function held at Raj Bhavan Mumbai on Sun (30 Nov).
The Poster and brochure have been prepared by the Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Samanvay Samiti. It has been prepared for the benefit of lakhs of visitors coming to pay their respects to Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on the occasion of the 69th Mahaparinirvana Din.
Chairman of the Maharashtra State Three Language Committee, former MP Dr Narendra Jadhav, General Secretary of the Samiti Nagsen Kamble and other members were present.
000
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...