Monday, 3 November 2025

किमान आधारभूत किमतीने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

  किमान आधारभूत किमतीने सोयाबीनमूग आणि उडीद खरेदीसाठी

 नोंदणी प्रक्रिया सुरू

- पणन मंत्री जयकुमार रावल

  • ऑनलाइन ॲपद्वारे व खरेदी केंद्रावर नोंदणी
  • राज्यस्तरीय तीन नोडल संस्थांची नियुक्ती

 

मुंबईदि. २९  : सोयाबीनमूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया 30 ऑक्टोबरपासून सुरू होत असून कापूस खरेदीसाठी कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. एमएसपीनुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ," असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

या वर्षी  मूग खरेदीचे  ३.३० लाख क्विंटलउडीद खरेदीचे ३२.५६ लाख क्विंटल आणि सोयाबीन खरेदीचे १८.५० लाख मेट्रिक टन असे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट आहे. शेतकरी विक्रीस आणेल त्या सर्व सोयाबीनमूग आणि उडीद या शेतमालाच्या मोठ्या प्रमाणात खरेदीचे नियोजन राज्य शासनाने केले असल्याचे पणनमंत्री रावल यांनी सांगितले.

बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण आणि शुभंकर प्रदर्शित

 बोधचिन्हजर्सीचे अनावरण आणि शुभंकर प्रदर्शित

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीसउपमुख्यमंत्री पवारकेंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मंत्री रक्षा खडसेराज्यमंत्री माधुरी मिसाळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते 'पुणे ग्रँड टूर -२०२६च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील  या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर जंगलात आढळणाऱ्या शेकरूवर ( उडती खार ) आधारित स्पर्धेचे इंदू हे शुभंकर जारी करण्यात आले.

केंद्र सरकारचे क्रीडा धोरण हे क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून

 केंद्र सरकारचे क्रीडा धोरण हे क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून देशभर पुढे नेण्यावर केंद्रित आहे. महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळे असल्याने पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूरच्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाचे उत्तम उदाहरण देशभर दिले जाईल. क्रीडा विज्ञान हे एक नवे क्षेत्र असूनत्याद्वारे राज्यातील खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणता येईलअसेही  रक्षा खडसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ची संकल्पना आणि तयारी विषयी माहिती दिली.

देशात २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन

 केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री खडसे म्हणाल्यादेशात २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताकडे वाटचाल करताना क्रीडा क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. रविवारी ५ ते ६ हजार ठिकाणी सायकल ऑन संडे’ उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहेज्यामध्ये सुमारे ५ लाख सायकलपटू सहभागी होतात. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिट इंडियाहे स्वप्न पूर्ण होणार आहे.

केंद्र 

सायकल स्पर्धा आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल-

 सायकल स्पर्धा आरोग्यरोजगारपर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल-उपमुख्यमंत्री

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेऐतिहासिक वारसा असलेल्या पुण्यातून ग्रॅण्ड चॅलेंज टूर सुरू होत असल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगातून जाणाऱ्या २०० हून अधिक गावांमधून ही खडतर स्पर्धा होणार आहे. टूर द फ्रान्सपासून प्रेरणा घेत आयोजित होणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ क्रीडा नाहीतर पर्यावरणआरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीचे प्रतिक आहे.

या स्पर्धेसाठी भिमाशंकर,महाबळेश्वर आणि भंडारदरा परिसरातील भारतीय शेकरू’ या दुर्मिळ प्रजातीवर आधारित बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. याद्वारे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मिती होईल व राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ही स्पर्धा म्हणजे आरोग्यरोजगारपर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

देशात सायकल श्रीमंताचे वाहन म्हणून दीडशे वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी सायकल वापरण्यासाठी परवाना

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेही स्पर्धा पुण्याला जगाच्या नकाशावर घेऊन जाणारी ठरेल. देशात सायकल श्रीमंताचे वाहन म्हणून दीडशे वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी सायकल वापरण्यासाठी परवाना  लागायचा. पुण्यात १९४७ साली पहिली सायकल स्पर्धा झाली होती. त्यामुळे पुण्याची ओळख सायकलचे शहर’ म्हणून होतीआणि ही सायकल संस्कृती आजही शहराच्या अभिमानाचा भाग आहे. जागतिक वेळापत्रकात या स्पर्धेचा समावेश झाल्याने तिचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल आणि ही स्पर्धा देशासाठी महत्वपूर्ण ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल ; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल

 पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल ;

सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल

 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे ग्रॅण्ड टूर २०२६चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

 

पुणेदि. २९ : बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिकसांस्कृतिकधार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची सायकलचे शहर ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य शासनपुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारकेंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसेनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळआशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिलसायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंगआशियाई सायकलिंग महासंघाचे माजी महासचिव ओंकारसिंगमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi