Sunday, 2 November 2025

रुग्णालयातील सेवांची गुणवत्ता वाढण्यासाठी ठोस उपाययोजना अमलात

 यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करत पारदर्शक चौकशी आणि मजबुत सुधारणा आराखडा आखला आहे. रुग्णालयातील सेवांची गुणवत्ता वाढण्यासाठी ठोस उपाययोजना अमलात आणण्यात येत आहेत.

तत्काळ उपाययोजना

१. ‘आयसीयू’मध्ये आवश्यक तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व महत्त्वाची औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश

२. अतिगंभीर रुग्णांना आवश्यकतेनुसार सर जे.जे. रुग्णालयात सुसज्ज रुग्णवाहिकेतून स्थलांतर करण्याच्या सूचना

दीर्घकालीन उपाययोजना

१. सेंट जॉर्जेस रुग्णालयात मनुष्यबळऔषधसाठा आणि आयसीयू बेड्स वाढवण्याचे आदेश

२. मुंबईसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा सखोल आढावा घेऊन सेवा गुणवत्ता उंचावणे

३. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा मृत्यूदराचा मासिक आढावा घेण्याचा निर्णय

४. आवश्यक निधीमानव संसाधन व औषध पुरवठा शासनातर्फे प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची हमी यासारख्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे..

शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

 शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

-         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबईदि. 30 : राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यूदर वाढीची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेऊन याविषयी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारसंचालक डॉ. अजय चंदनवालेजे.जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कीशासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्णालयात वैद्यकीय सेवेत तत्काळ सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक मनुष्यबळनिधी आणि उपकरणांची उपलब्धता प्राधान्याने सुनिश्चित करावी. अतीदक्षता विभागातील खाटांची संख्यामनुष्यबळ वाढविणेऔषधे व आधुनिक उपकरणे पुरविणे आणि दीर्घकालीन सुधारणा आराखडा तयार करण्याचेही त्यांनी निर्देश दिले. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून शेवटच्या टप्प्यात शासकीय रुग्णालयात स्थलांतरित होत असल्यानेही आयसीयूतील मृत्यूदर तुलनेने अधिक दिसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चिढे

 दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी

दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चिढे

 

मुंबईदि. 2 : दिव्यांग व्यक्तींचा सन्मानहक्कसुरक्षा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत कलम 79 ते 83 नुसार आयुक्तदिव्यांग कल्याण यांना राज्य आयुक्त म्हणून अधिसूचित करण्यात आले असूनत्यांना न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. राज्य आयुक्तांच्या चौकशीतपासणी आणि कार्यवाही प्रक्रियेला अधिक सुसूत्र आणि परिणामकारक करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

सचिव श्री. मुंढे म्हणालेराज्य आयुक्त स्वतःहून (Suo Moto) किंवा प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करू शकतात. दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही किंवा निर्देश देण्याचा अधिकार त्यांना आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम च्या

कलम 82 नुसारराज्य आयुक्तांना दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. यामध्ये साक्षीदारांना समन्स पाठविणेकागदपत्रे सादर करणेशपथपत्रावर पुरावे स्वीकारणे तसेच तपासणीसाठी आयोग नेमण्याचे अधिकार समाविष्ट आहेत. त्यामुळे राज्य आयुक्तांसमोरील प्रत्येक कार्यवाही न्यायिक स्वरूपाची मानली जाईल.

राज्य आयुक्तांकडे दिव्यांग व्यक्तीत्यांचे पालक किंवा कायदेशीर प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रतिवादीस नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मागवले जाईल. प्रतिवादीने 15 दिवसांत उत्तर सादर करावे लागेलत्यानंतर 30 दिवसांत सुनावणी पूर्ण केली जाईल. सुनावणीसाठी दोन्ही पक्ष उपस्थित राहतील. सुनावणीसाठी प्रतिवादी उपस्थित राहिला नाही तर आयुक्तांना एकतर्फी निर्णय (Ex parte decision) घेण्याचा अधिकार असेल.

राज्य आयुक्तांच्या शिफारशींवर संबंधित प्राधिकरणाने कार्यवाही करणे बंधनकारक आहे. शिफारशीवर केलेली कार्यवाही किंवा कारणासहित नकार अहवाल 90 दिवसांत राज्य आयुक्तांकडे सादर करावा लागेल. एखाद्या प्राधिकरणाने राज्य आयुक्तांची शिफारस नाकारल्यास आणि जर नकाराची कारणमीमांसा योग्य नसल्याचे आढळलेतर राज्य आयुक्त शासनाकडे अहवाल सादर करतील.

 राज्य आयुक्तांनी मागितलेली आवश्यक माहिती व अनुपालन अहवाल सर्व अधिकारीप्राधिकरी यांना सादर करणे बंधनकारक असेल. राज्य आयुक्तांच्या निर्देशांचे पालन न केल्यासदिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 89 आणि कलम 93 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यानंतर सुद्धा राज्य आयुक्तांच्या निर्देशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकारीप्राधिकारी यांच्याविरुद्ध प्रशासकीय तसेच शिस्तभंगात्मक कार्यवाही करण्यात येईल.

 

बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचे राज्य शासनामार्फत आयोजन

 बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचे राज्य शासनामार्फत आयोजन

 

मुंबईदि. नोव्हेंबर : सन 2025-26 या वर्षासाठीची बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य या दोन्ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फतच आयोजित करण्यात येणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये कोणत्याही शासन बाह्य संस्थांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप नाही. ही शासन आयोजित स्पर्धा असल्याने संचालनालय त्याचे आयोजन करत आहे. या स्पर्धा आयोजनाची संपूर्ण जबाबदारी कोणत्याही एका संस्थेस देण्यात आलेली नाही. स्थानिक आयोजनातील सहकार्य आणि स्थानिक समन्वय यासाठी मात्र संचालनालय विविध संस्थांचे सहकार्य घेत असतेत्यापैकीच बालरंगभूमी ही एक संस्था आहे. 

सांस्कृतिक कार्यक्रम असो की नाट्य स्पर्धांच्या आयोजनात स्थानिक सहकार्य करणाऱ्या कलाक्षेत्रातील किंवा नाट्य क्षेत्रातील संस्थांचे सहकार्य नेहमीच सांस्कृतिक कार्य संचालनालय घेत असते. बालरंगभूमी ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न शाखा असल्यामुळेस्थानिक सहकार्य व समन्वयासाठी संचालनालयास सहकार्य करत असते. 

बालरंगभूमीप्रमाणे इतर संस्था आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर संचालनालयास वेळोवेळी सूचना करत असतात व त्यातील योग्य सूचनांवर संचालनालयामार्फत सकारात्मक विचारही करण्यात येत असतो.

बालनाट्य चळवळ अधिक प्रभावी व्हावीजास्तीत जास्त बालकांनी या नाट्य स्पर्धेत प्रवेश घ्यावा व या नाट्य स्पर्धेतील नाट्यप्रयोगांचा आस्वाद घ्यावायासाठी वेगवेगळ्या नाट्य संस्थांशी संचालनालयामार्फत समन्वय ठेवण्यात येत असतो. नाट्य किंवा कलाक्षेत्रातील ज्या संस्था यासाठी स्वयंप्रेरणेने सहकार्यासाठी पुढे येतातत्यांचेही सहकार्य संचालनालयामार्फत घेण्यात येत असते.

 

राज्यातील युवकांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करून ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी

 राज्यातील युवकांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करून मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचा उपक्रम म्हणून या दोन केंद्रांना मोठे महत्त्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील औद्योगिक जिल्ह्यांना कौशल्य विकासाचे नवे केंद्र बनविण्याचा संकल्प केला असूनया निर्णयामुळे त्या दिशेने एक ठोस पाऊल उचलले गेले आहे. या 'सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमधून विद्यार्थ्यांना आणि उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. रोबोटिक्स’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT)’, ‘डेटा अनालिटिक्स, ‘इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान’, ‘ऑटोमेशन’ अशा अत्याधुनिक क्षेत्रांत युवकांना प्रशिक्षण मिळेल. उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या पुढाकारातून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांना मिळालेली सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे ही राज्याच्या औद्योगिक आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरतील. या माध्यमातून कौशल्यसंपन्न महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने राज्याने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.

या 'सीट्रिपलआय' सेंटरमुळे स्थानिक युवकांसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण

 या 'सीट्रिपलआयसेंटरमुळे स्थानिक युवकांसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्र (नाशिक) आणि विदर्भ (अमरावती) या दोनही भागातील युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण मिळण्याची दारे उघडली जाणार आहेत. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्यआवश्यक प्रशिक्षण यासारख्या संधी आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होतील. या केंद्रांमुळे स्थानिक पातळीवर उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईलनवउद्योगांना चालना मिळेल आणि स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमुळे औद्योगिक क्षेत्राला प्रशिक्षितकुशल आणि तांत्रिकदृष्ट्या समर्थ युवक मिळतीलनवउद्योगांच्या स्थापनेस प्रोत्साहन मिळेलस्थानिक अर्थव्यवस्था आणि उद्योगविकासाला बळकटी मिळेलतसेच युवकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल.

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

 नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबईदि. 2:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने आता नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक सेंटर फॉर इन्व्हेन्शनइनोव्हेशनइन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सी-ट्रिपल आयटी उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या पत्राला कंपनीकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असूनदोन्ही जिल्ह्यांसाठी सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे स्थापन करण्यास टाटा टेक्नॉलॉजीने अधिकृत मान्यता दिली आहे.

Featured post

Lakshvedhi