शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 30 : राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यूदर वाढीची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेऊन याविषयी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, संचालक डॉ. अजय चंदनवाले, जे.जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्णालयात वैद्यकीय सेवेत तत्काळ सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, निधी आणि उपकरणांची उपलब्धता प्राधान्याने सुनिश्चित करावी. अतीदक्षता विभागातील खाटांची संख्या, मनुष्यबळ वाढविणे, औषधे व आधुनिक उपकरणे पुरविणे आणि दीर्घकालीन सुधारणा आराखडा तयार करण्याचेही त्यांनी निर्देश दिले. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून शेवटच्या टप्प्यात शासकीय रुग्णालयात स्थलांतरित होत असल्यानेही आयसीयूतील मृत्यूदर तुलनेने अधिक दिसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment