Saturday, 1 November 2025

रासायनिक व भगीरथ खत विभाग - पणन महासंघाने

 रासायनिक व भगीरथ खत विभाग - पणन महासंघाने राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे खत पुरवठा करण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. 2024-25 मध्ये पणन महासंघाने 65,274 मे. टन रासायनिक खतांची विक्री केलेली असून 83.29 कोटींची उलाढाल केलेली आहे. तसेच भगीरथ मिश्रखताची 1,316 मे. टन विक्री करण्यात आलेली असून 1.82 लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव 14 नोव्हेंबर पर्यंत पाठविण्याचे आवाहनdpomumbaicity@gmail.com

 डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण  योजनेसाठी

प्रस्ताव 14 नोव्हेंबर पर्यंत पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई दि.१ – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे.  राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी या योजनेंतर्गत सुधारित प्रस्ताव सादर करण्यासाठी विहित अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह पूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारीमुंबई शहर (जुने जकात घरशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर२०२५ पर्यंत सादर करावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

अधिक माहिती  https://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निर्धारित दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीतयाची संबंधित मदरसांनी नोंद घ्यावी. मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक – १४ नोव्हेंबर२०२५

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक  १५ डिसेंबर२०२५ आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा नियोजन समितीजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे अथवा,

दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७ई-मेल: dpomumbaicity@gmail.com यावर संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

समुद्रकाठच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा

 समुद्रकाठच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा

राष्ट्रीय सागरी मत्स्य जनगणना २०२५ चे निष्कर्ष यातून लक्ष्यित शासकीय योजना तयार करण्यात मदतमच्छीमार कुटुंबांची जीवनमान उंचावण्यास हातभारसागरी अर्थव्यवस्थेला गतीब्लू इकॉनॉमीला बळ मिळेल.

देशातील सागरी संपदा व मच्छीमारांच्या सशक्तीकरणासाठी ही मोहीम मैलाचा दगड ठरणार आहे. भारत सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून मत्स्य समुदायांच्या सर्वांगीण उन्नतीला गती मिळेल आणि भारताच्या ब्लू इकॉनॉमी मिशनला नवे बळ मिळेलअसा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

०००००

प्रथमच संपूर्ण प्रक्रिया डिजिटलकेंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेने विकसित केलेली VyasNAV

 प्रथमच संपूर्ण प्रक्रिया डिजिटल

यंदा प्रथमच जनगणना एक अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे राबवली जात आहे. केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेने विकसित केलेली VyasNAV अॅप प्रणालीप्रगणकांकरिता टॅबलेट पीसीचे वितरण डिजिटल प्रशिक्षण व पर्यवेक्षण प्रणालीजनगणना चौकटीची अधिक अचूकता आणि पारदर्शकताही पद्धत जनगणनेची गती वाढवून माहिती अधिक विश्वसनीय बनवेल.

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ला प्रारंभ; डिजिटल माध्यमातून सागरी मत्स्य क्षेत्राचे सखोल चित्रण

 राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ला प्रारंभ;

डिजिटल माध्यमातून सागरी मत्स्य क्षेत्राचे सखोल चित्रण

 

मुंबईदि. ३१ : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आणि भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला औपचारिक सुरुवात झाली आहे. ही देशातील पाचवी सागरी मत्स्य जनगणना असून ती ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पाडली जाणार आहे.

उद्दिष्टे व वैशिष्ट्ये

या जनगणनेचा मुख्य उद्देश फक्त आकडे गोळा करणे नसून सुमारे १२ लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबांची माहिती५६८ मासेमारी गावे व १७३ मत्स्य उतरण केंद्रांबद्दल तपशीलमच्छीमारांची सामाजिक-आर्थिक स्थितीची माहितीउपलब्ध पायाभूत सुविधाउपजीविका साधने आणि शासकीय योजनांच्या लाभाविषयी माहिती यांची सखोल नोंद घेऊन सागरी मत्स्य क्षेत्रातील धोरणनिर्मिती आणि विकास नियोजनाला दिशा देणे हा आहे.

आयुष्मान आरोग्य मंदिरांचे अनावरणवसई विरार,पालघर

 आयुष्मान आरोग्य मंदिरांचे अनावरण

वसई विरार महापालिकेच्या वतीने 11 आयुष्मान आरोग्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. या आरोग्य मंदिरांचे ऑनलाईन अनावर पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

पालघर महापालिका हद्दीतील 117 शाळा व तीन आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

००००

वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी

 वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी

- पालकमंत्री गणेश नाईक

मुंबईदि. 31 : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना अनुकूल असणारी झाडे लावण्यात यावीतअसे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

मंत्री नाईक यांनी मंत्रालयात वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

वसई विरार महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये पिकनिक पार्कचे आरक्षण आहे. या सात एकर जागेवर बर्ड पार्क उभारण्यात यावे. यासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कार्यवाही तातडीने करावी. पक्षांना अनुकूल असणारी झाडे शासकीय नर्सरीत नसतील तर खासगी नर्सरीतून अशी झाडे घेण्यात यावीतअशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज सुर्यवंशीपालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi