Saturday, 1 November 2025

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ला प्रारंभ; डिजिटल माध्यमातून सागरी मत्स्य क्षेत्राचे सखोल चित्रण

 राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ला प्रारंभ;

डिजिटल माध्यमातून सागरी मत्स्य क्षेत्राचे सखोल चित्रण

 

मुंबईदि. ३१ : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आणि भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला औपचारिक सुरुवात झाली आहे. ही देशातील पाचवी सागरी मत्स्य जनगणना असून ती ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पाडली जाणार आहे.

उद्दिष्टे व वैशिष्ट्ये

या जनगणनेचा मुख्य उद्देश फक्त आकडे गोळा करणे नसून सुमारे १२ लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबांची माहिती५६८ मासेमारी गावे व १७३ मत्स्य उतरण केंद्रांबद्दल तपशीलमच्छीमारांची सामाजिक-आर्थिक स्थितीची माहितीउपलब्ध पायाभूत सुविधाउपजीविका साधने आणि शासकीय योजनांच्या लाभाविषयी माहिती यांची सखोल नोंद घेऊन सागरी मत्स्य क्षेत्रातील धोरणनिर्मिती आणि विकास नियोजनाला दिशा देणे हा आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi