Friday, 3 October 2025

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

मुंबई, दि. 1  : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42  नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात.

अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक संधी pl share

 अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून इयत्ता ११ वी

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक संधी

 

मुंबईदि. १ : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी कळविले आहे.

 

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. आतापर्यंत इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या १० फेऱ्या राबविण्यात आलेल्या आहेत.

 

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या संधीबाबतच्या सविस्तर सूचना ३ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात येणार आहेत. या फेरीमध्ये भाग-२ व प्राधान्यक्रम नोंदविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय देण्यात येणार आहे. विद्यार्थीपालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी या प्रवेश प्रक्रियेची नोंद घ्यावीअसे आवाहन शिक्षण संचालकांमार्फत करण्यात आले आहे.

एजन्सीमार्फत नियुक्त मनुष्यबळातील प्रशासकीय खर्च कमी करण्याचे आदेश

 एजन्सीमार्फत नियुक्त मनुष्यबळातील प्रशासकीय खर्च कमी करण्याचे आदेश

राज्य शासनातील विविध विभागांमध्ये एजन्सीद्वारे नियुक्त केलेल्या २२०० कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापन प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले कीमहाआयटी मार्फत आकारण्यात येणारा १० टक्के प्रशासकीय खर्च कमी करून ५ टक्के करण्यात यावा. यामुळे प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला अधिक मानधन मिळेल व कामाची गुणवत्ता वाढेल.

तसेचया कर्मचाऱ्यांना पगार थेट त्यांच्या खात्यात जमा होईल अशी तांत्रिक व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेतजेणेकरून एजन्सीद्वारे कोणतीही आर्थिक पिळवणूक होणार नाही.

व्हॉट्स ॲपच्या नागरिक सेवा व्यवस्था क्षमतेचे पुनर्विलोकन करण्याचे निर्देश

 व्हॉट्स ॲपच्या नागरिक सेवा व्यवस्था क्षमतेचे पुनर्विलोकन करण्याचे निर्देश

मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीनागरिकांना सेवा देणे हे प्रमुख कर्तव्य असूनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार व्हॉट्स ॲप सिटीझन सर्विस प्रणालीद्वारे नागरिकांना शासकीय सेवा पुरविण्याचे काम सुरू आहे.

या प्रणालीत सध्या १०० सेवा सुरू असूनपुढील टप्प्यात १००० सेवा व्हॉट्स ॲपवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी विद्यमान व्हेंडरची लोड असेसमेंट व कार्यक्षमता तपासावी तसेच अद्ययावत आरएफपी तयार करून नागरिकांना अधिक जलद सेवा देणाऱ्या नव्या व्हेंडरची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पात सुरक्षा व नागरिक जागृतीसाठी उपाययोजना*

 गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पात सुरक्षा व नागरिक जागृतीसाठी उपाययोजना*

मंत्री ॲड. शेलार यांनी गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले कीराज्यातील सुमारे १५ कोटी नागरिकांचा डेटा एकत्रित करण्यात आला असून त्यापैकी सुमारे ६ कोटी डेटा प्रमाणित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी खालील उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

1. नागरिकांसाठी सिटिझन अवेअरनेस सिस्टिमच्या माध्यमातून महाआयटीकडून संदेशवहनाची यंत्रणा उभारावी.

2. डेटाच्या सुरक्षिततेसाठी फायरवॉल व सेफ्टी वॉल प्रणाली महासमन्वय पोर्टलमध्ये विकसित करावी.

3. वाढीव नागरिक वापर लक्षात घेऊन लोड टेस्टिंग अद्ययावत पद्धतीने करावी.

4. हा प्रकल्प डीजी यात्रा प्रणालीशी एकत्रित करावा.

5. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्च इंजिनचा वापर करून डेटा विश्लेषणासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करावी.

मंत्रालयातील सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक

 मंत्रालयातील सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत

पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक

 - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. १ : राज्य शासनाच्या मंत्रालयीन तसेच विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मनुष्यबळ व्यवस्थापनात शिस्तबद्धता राखण्यासाठी शासन निर्णयात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यातअसे निर्देश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध कार्यक्रमधोरणेशासन निर्णय आणि बळकटीकरण आदी विषयांवरील पुनर्विलोकन बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियामहाआयटीचे संचालक संजय काटकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीमंत्रालयात विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले सल्लागार  माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत एम्पॅनेल्ड एजन्सीजद्वारे नियुक्त केलेले असले तरी त्यांच्या कामांचा तपशीलमानधन वा इतर माहिती महाआयटीकडे सादर केली जात नाही. त्यामुळे अशा सर्व नियुक्तींची माहिती अनिवार्यपणे महाआयटीकडे पाठविणे बंधनकारक करावीयासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यात यावी.

राज्यातील विविध विभागांमध्ये सध्या सहा एम्पॅनेल्ड एजन्सीजमार्फत २४६ व्यक्ती सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या प्रक्रियेमध्ये काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त मानधन व प्रशासकीय खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सल्लागार संस्थेच्या पारदर्शकतेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी दिले आहेत. या पोर्टलवर सर्व विभागांनी त्यांच्या सल्लागारांची सविस्तर माहिती सादर करणे अनिवार्य असेल.

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

 ८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

 

मुंबईदि. १ : २९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहेजो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीतअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईलआणि सुमारे ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi