Thursday, 2 October 2025

गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पात सुरक्षा व नागरिक जागृतीसाठी उपाययोजना*

 गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पात सुरक्षा व नागरिक जागृतीसाठी उपाययोजना*

मंत्री ॲड. शेलार यांनी गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले कीराज्यातील सुमारे १५ कोटी नागरिकांचा डेटा एकत्रित करण्यात आला असून त्यापैकी सुमारे ६ कोटी डेटा प्रमाणित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी खालील उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

1. नागरिकांसाठी सिटिझन अवेअरनेस सिस्टिमच्या माध्यमातून महाआयटीकडून संदेशवहनाची यंत्रणा उभारावी.

2. डेटाच्या सुरक्षिततेसाठी फायरवॉल व सेफ्टी वॉल प्रणाली महासमन्वय पोर्टलमध्ये विकसित करावी.

3. वाढीव नागरिक वापर लक्षात घेऊन लोड टेस्टिंग अद्ययावत पद्धतीने करावी.

4. हा प्रकल्प डीजी यात्रा प्रणालीशी एकत्रित करावा.

5. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्च इंजिनचा वापर करून डेटा विश्लेषणासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करावी.

मंत्रालयातील सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक

  मंत्रालयातील सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत

पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक

 - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. १ : राज्य शासनाच्या मंत्रालयीन तसेच विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मनुष्यबळ व्यवस्थापनात शिस्तबद्धता राखण्यासाठी शासन निर्णयात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यातअसे निर्देश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध कार्यक्रमधोरणेशासन निर्णय आणि बळकटीकरण आदी विषयांवरील पुनर्विलोकन बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियामहाआयटीचे संचालक संजय काटकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीमंत्रालयात विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले सल्लागार  माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत एम्पॅनेल्ड एजन्सीजद्वारे नियुक्त केलेले असले तरी त्यांच्या कामांचा तपशीलमानधन वा इतर माहिती महाआयटीकडे सादर केली जात नाही. त्यामुळे अशा सर्व नियुक्तींची माहिती अनिवार्यपणे महाआयटीकडे पाठविणे बंधनकारक करावीयासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यात यावी.

राज्यातील विविध विभागांमध्ये सध्या सहा एम्पॅनेल्ड एजन्सीजमार्फत २४६ व्यक्ती सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या प्रक्रियेमध्ये काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त मानधन व प्रशासकीय खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सल्लागार संस्थेच्या पारदर्शकतेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी दिले आहेत. या पोर्टलवर सर्व विभागांनी त्यांच्या सल्लागारांची सविस्तर माहिती सादर करणे अनिवार्य असेल.

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

 ८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

 

मुंबईदि. १ : २९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहेजो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीतअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईलआणि सुमारे ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भगवानगड विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र शासनाची मान्यता

 भगवानगड विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र शासनाची मान्यता

·         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार

 

मुंबईदि 1 : खरवंडी येथील श्री क्षेत्र भगवानगड  ट्रस्टच्या  विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा  देण्यास केंद्र शासनाने  मान्यता दिली असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

केंद्रीय पर्यावरणवन आणि वातावरणीय बदल विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. खरवंडी येथील ही  4 हेक्टर जागा  भक्तगणांच्या सेवासुविधांसाठीरुग्णालयप्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक  विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

"केंद्र शासनाकडे या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता त्याला यश आले आहे . श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि  विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती भाविकांना देताना अतिशय आनंद होतो आहे"असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आभार व्यक्त करताना म्हटले आहे.

राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

 राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

 

 

मुंबईदि. २ :  राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी राजभवन येथे अभिवादन करण्यात आले.

राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडेपरिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट

 

नागपूरदि. २: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला अभिवादन केले व  आयोजित बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमाजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे,  जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उपस्थित होते.

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीड्रॅगन पॅलेस टेंपल आज आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. आता ड्रॅगन पॅलेसची जगभरात ओळख निर्माण होत आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे येऊन बुद्धवंदनेत सहभागी होत असतात. नागपुरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट द्यायची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

मुंबई, दि. 1  : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42  नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात.

0-0-0


Featured post

Lakshvedhi