Thursday, 2 October 2025

ऐतिहासिक दस्तऐवजांचे मुलुंड येथे प्रदर्शन

 ऐतिहासिक दस्तऐवजांचे मुलुंड येथे प्रदर्शन

-         सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबईदि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे महत्त्वाचे दस्तऐवज प्रदर्शनामध्ये सर्वसामान्यांसाठी शासनाने खुले केले असून ते जास्तीत जास्त नागरिकांनी नक्की पहाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केले.

 

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचनालयातर्फे सेवा सप्ताह निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराभिलेख संचालनालयातील अत्यंत दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार मिहीर कोटेचापुरालेख संचालनालयाचे संचालक सुजीत उगले आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात करण्यात आले आहे.

 

 महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची दुर्मिळ छायाचित्रेपत्र आणि काही महत्त्वाची कागदपत्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. राज्य शासनाकडे अशी साडे सतरा कोटी कागदपत्रे असून कागदपत्रांच्या दृष्टीने आपण अत्यंत समृद्ध आहोत. ही कागदपत्रे योग्य पध्दतीने जतन व्हावी म्हणून शासन वांद्रे कुर्ला संकुलमध्ये पुराभिलेख भवन उभे करीत असून अभ्यासकांसोबतच ही कागदपत्रे सर्वसामान्यांनाही पाहण्यासाठी उपलब्ध होतील. हा आपला वारसा आहेअसे सांगत मंत्री ॲड. शेलार यांनी ही कागदपत्रे नक्की सगळ्यांनी पहावीअसे आवाहन केले.

पूरग्रस्त शेतक-यांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सवलती लागू करण्याबाबत चर्चा

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्त शेतक-यांना  दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सवलती लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात एकूण १ कोटी लाख एकर क्षेत्र बाधित झाले आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना २२५० कोटी रूपयांची मदत करण्यात आली आहे. शेतकरी या संकटातून पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मंत्रिमंडळातील सदस्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेऊन संवेदनशीलपणे मदत तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाच ते दहा हजार रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान, जनावरांना चारा उपलब्ध करून देत आहोत. दहा किलो तांदूळ, गहू आणि तीन किलो डाळ उपलब्ध करून दिली आहे. निसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूर परिस्थितीची माहिती प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली आहे. केंद्रामार्फतही शेतकऱ्यांना चांगली भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासन सकारात्मक आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे हित साधणारे असल्याने त्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दुष्काळाच्या निकषाप्रमाणे मदत करणार

 पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दुष्काळाच्या निकषाप्रमाणे मदत करणार

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

कृषी विभागाकडून पूरग्रस्तांना एक दिवसाचा पगार

६ कोटी १७ लाख रूपयांची मदत

 

मुंबई, दि. ३० : मे, जून, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत २२५० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या जाणार आहेत. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा ६ कोटी १७ लाख ५० हजार रुपये हा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्याचा नवा अध्याय या हबच्या माध्यमातून सुरू

 महाराष्ट्र शासन व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्याचा नवा अध्याय या हबच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या उपक्रमामध्ये आयआयटी मुंबईमुंबई विद्यापीठसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठडी.वाय. पाटील विद्यापीठ यांच्यासह राज्यातील अग्रगण्य संस्थाविद्यापीठ तसेच ऑस्ट्रेलियातील न्यूकॅसलमोनॅशआरएमआयटी व सिडनी विद्यापीठ सहभागी होणार आहेत. या माध्यमातून परदेशातील अभ्यासक्रम आणि विशेष कौशल्य प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थ्यांना पीएचडीपदवी व पदव्युत्तर विद्यार्थी प्रशिक्षित करणेऊर्जा व आरोग्य क्षेत्रातील किमान पेटंट तंत्रज्ञान विकसित करणेतसेच आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचे आदानप्रदान साध्य करणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार

 महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे

शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

             मुंबईदि. ३० : राज्यातील औद्योगिक व शैक्षणिक परिसंस्थेला ऑस्ट्रेलियन कौशल्यांशी जोडून परिवर्तनशील शिक्षणसंशोधन व उद्योग सहकार्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब उभारण्यात येणार आहे. या हबच्या माध्यमातून ऊर्जापर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात संशोधननवकल्पना व कौशल्यविकासाला चालना मिळणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

 

            आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इनोव्हेशन अँड स्किल्स हबबाबत बैठक झाली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकरतंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकरऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजयन विनू डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी.पाटीलमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णीडॉ होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामतसहसचिव संतोष खोरगडेउपसचिव प्रताप लुबाळतसेच अधिकारी उपस्थित होते.

 

व्यसनाधीनता, तणाव, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ

 उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे १८ दशलक्ष लोक हृदयरोगामुळे मृत्यू पावतात. भारतातही ही समस्या गंभीर आहे. वाढती व्यसनाधीनतातणावअसंतुलित आहारव्यायामाचा अभाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे आणि त्याला जीवनदान देणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज लोकार्पण झालेल्या या उपकरणांचे विशेष महत्व आहे. मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या ४ हजार कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाल्यास या उपकरणामुळे निश्चितच जीवनदान मिळेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रालयातील दवाखान्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. ईसीजी व रक्त तपासणीसाठी रुग्णांना मंत्रालयाबाहेर जाण्याची गरज भासू नयेयासाठी आरोग्य विभागाने व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराज यांनी यावेळी स्टेमी उपकरणासंदर्भात सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांनी केले.

००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्सस्टेमी उपकरणांचे लोकार्पण

जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम

 

            मुंबई दि. ३० :- आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे. नियमित व्यायामसंतुलित आहारतणाव कमी करणे आणि नियमित तपासण्याद्वारे आपण हृदयरोगापासून आपला बचाव करु शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती कक्षात ट्रायकॉग हेल्थ इंडिया या संस्थेच्या वतीने मंत्रालयातील दवाखान्यासाठी देण्यात आलेल्या ५ एईडी डीफ्रेबिलिटर्स आणि स्टेमी उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंहउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखट्रायकॉग हेल्थ इंडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराजवैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारीआरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेट्रायकॉग हेल्थ इंडियाचे परेश शिंदेराजीव दासउपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसलेमंत्रालयातील क्लिनिकचे डॉ. प्रमोद निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi