उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे १८ दशलक्ष लोक हृदयरोगामुळे मृत्यू पावतात. भारतातही ही समस्या गंभीर आहे. वाढती व्यसनाधीनता, तणाव, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे आणि त्याला जीवनदान देणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज लोकार्पण झालेल्या या उपकरणांचे विशेष महत्व आहे. मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या ४ हजार कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाल्यास या उपकरणामुळे निश्चितच जीवनदान मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्रालयातील दवाखान्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. ईसीजी व रक्त तपासणीसाठी रुग्णांना मंत्रालयाबाहेर जाण्याची गरज भासू नये, यासाठी आरोग्य विभागाने व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराज यांनी यावेळी स्टेमी उपकरणासंदर्भात सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांनी केले.
००००
No comments:
Post a Comment