Thursday, 2 October 2025

सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी

 सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी

 

मुंबईदि. ०१ : सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त मुलांमध्ये कलाकार,  शिक्षक,  वैज्ञानिक असे विविध पैलू दडलेले असतात. त्यांच्या अंगी असलेली अपार क्षमता योग्य उपचारशिक्षण आणि समाजाच्या सहकार्याने फुलवता आलीतर ही मुले केवळ चालूच शकतात असे नाहीतर जगालाही दिशा देऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच विश्वासामुळे या मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागफिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या या उपक्रमाने अनेक घरांमध्ये आशेचा नवा दीप प्रज्वलित केला आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन गेली दहा वर्षं सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी कार्य करत आहेत. त्यांनी केवळ साहित्य पुरवले नाहीतर वैद्यकीय उपचारांपासून ते भावनिक आधारापर्यंत या मुलांना व त्यांच्या पालकांना सर्वंकष साथ दिली आहे. या कार्यासाठी त्यांना BT-CSR एक्सेलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

या फाउंडेशनने आजवर एक हजाराहून अधिक आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून आवश्यक त्या विशेष सेवा गरज असलेल्या मुलांपर्यंत पोहोचवली आहे. अनेक मुले जी आतापर्यंत चार भिंतींत अडकून पडली होतीत्यांना आता घरबसल्या उपचार व सुश्रुषा मिळत आहेत.

सातारावाईपाचगणीपाटणतळे आणि खंडाळा येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्रांमुळे फिजिओथेरपीस्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसारख्या सेवा आज शेकडो मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. आतापर्यंत ९८६ सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांची नोंदणी होऊन त्यांना आवश्यक सेवा पुरवली गेली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कीहा फक्त उपक्रम नाही तर समाजाच्या प्रत्येक दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे माझे ही व्यक्तिगत स्वप्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पुढाकारामुळे हजारो कुटुंबांना एकटे नसल्याची जाणीव निर्माण झाली आहे.

0000

पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी

 पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी :-

नागपूर ते चंद्रपूर चार पदरी सिमेंट काँक्रिटीकरण महामार्गलांबी २०४ किलोमीटरचंद्रपूर शहराला जोड रस्ता ११ किलोमीटरभूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटी.

नागपूर ते गोंदिया १६२ किलोमीटर लांबीचा चार पदरी द्रुतगती महामार्गभूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवाने घेण्याची प्रक्रिया सुरू. अंदाजित किंमत १८,५३९ कोटी.

भंडारा ते गडचिरोली चार पदरी द्रुतगती महामार्गलांबी ९४ किलोमीटरअंदाजित रक्कम दहा हजार २९८ कोटी.भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवाने घेण्याची प्रक्रिया सुरू.


, समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था उभारण्यात येत

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था उभारण्यात येत आहे. तसेच पेट्रोल पंप, फूड मॉलची सुविधा असावी. स्वच्छतागृहांच्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सल्लागार नियुक्त करावा. महामार्गावर १६ पैकी किमान चार ठिकाणी तरी एमएसआरडीसीने पर्यटनाच्या दृष्टीने केंद्र निर्माण करावीत. राज्यात पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांकरिता निधी उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांच्या निधीतून भूसंपादनासह विकास प्रक्रिया राबवावी. पुढील विकासात त्यांचा सहभाग घेऊन निश्चित मोबदला त्यांना मिळण्याची व्यवस्था करावी. निधी उभारणीचे नवीन मॉडेल विकसित करावे.


बैठकीस अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, प्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

सध्या राज्यात १० लाख कोटींच्या पायाभूत सोयी - सुविधा प्रकल्पांची कामे सुरू

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेविकासाचे प्रकल्प पूर्ण करताना कालमर्यादेचे बंधन असावे. प्रकल्प रेंगाळला किंवा विलंब झाल्यास किंमत वाढीमुळे विनाकारण राज्यावर आर्थिक भुर्दंड बसत असतो. सध्या राज्यात १० लाख कोटींच्या पायाभूत सोयी - सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांच्या प्रगतीची गती कुठेही कमी पडू देऊ नये. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यामुळे ही सर्व कामे नियोजनबद्ध विहित कालमर्यादेत पूर्ण करावी.

राज्यामध्ये यापुढे पायाभूत सुविधांची कामे घेताना ती आधी गतिशक्ती पोर्टलवर आणावी. गतिशक्ती पोर्टलवर घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू नये. यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेसिंचन प्रकल्पांची कामे घेतानाही भविष्यात येणाऱ्या अडचणी बघून सुरुवातीपासूनच नियोजन करावे. या प्रकल्पांचे भूसंपादन आधीच करून नंतर कामाला सुरुवात करावी.

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' निर्माण करा

 नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता

भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची 'इकोसिस्टीमनिर्माण करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. १ : नागपूर ते चंद्रपूर या २०४ किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यामध्ये कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची इकोसिस्टीमनिर्माण करण्यात यावी. त्यासाठी आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करण्याचे निर्देशही दिले. नागपूर ते चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत करण्यात येत असल्याने पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत या महामार्गाची लांबी वाढवण्यात यावीअशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.


कांदिवली पूर्व विधानसभेतील 'ब्लिस कंपाउंड' मालाड पूर्व येथील डीपी रोडचे उदघाटन

 कांदिवली पूर्व विधानसभेतील 'ब्लिस कंपाउंड' मालाड पूर्व येथील डीपी रोडचे उदघाटन आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या १०-१२ वर्षात मालाड पूर्व येथे विविध विकास कामं हाती घेण्यात आली. त्याच प्रमाणे अशा अनेक डीपी रोड वर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं होती, अशा अनेक समस्या दूर करून लोकांच्या यातायातीसाठी आपण डीपी रोड साकारले आहेत, असे भातखळकर यांनी सांगितले.


मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात २०१४ पासून देशभरात अनेक विकास प्रकल्प आणि जनहिताच्या योजना राबवण्यात आल्या. प्रत्येक योजना आज थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात मेट्रोचं जाळं विण्यात आले. आज आपण बघू शकता नागरिकांना ह्या सुविधेचा लाभ मिळाला आहे असे उद्गार भातखळकर यांनी काढले.

नागरिकांच्या मागणी दाखल घेऊन डीपी रोडच्या समस्येचे निरसन करून आज उदघाटन करण्यात आले. नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सोयीसाठी डीपी रोडची भेट देण्यात आली आहे असे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.  


Wednesday, 1 October 2025

मोटार अपघात दावे निकाली, 40 कोटींची भरपाई

 मोटार अपघात दावे निकाली, 40 कोटींची भरपाई


मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२५ : मोटार अपघात दावे न्यायाधिकरण, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला. या लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या ६९९ प्रकरणांपैकी ५४७ दाव्यांचा समेट झाला असून, दावेदारांना एकूण ₹४०,१५,४१,१२८/- इतकी भरपाई मंजूर करण्यात आली. ही लोकअदालत पालक न्यायमूर्ती श्री. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्षा सौ. मोनिका आरलेंड यांच्या देखरेखीखाली पार पडली. अपघातग्रस्तांच्या दाव्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी पात्र पॅनल्सची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रक्रियेत अनुभवी न्यायिक अधिकारी, सलोखाकर्ते तसेच संबंधित पक्षांच्या परस्पर संमतीने दावे निकाली काढण्यात आले. यामुळे अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घकाळचा ताण, वेळेचा अपव्यय आणि खटल्याचा खर्च टाळून जलद मदत मिळाली. या यशस्वी लोकअदालतीसाठी कोर्टातील न्यायाधीश, वकील संघटना, विमा कंपनी प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. माननीय पालक न्यायमूर्ती श्री. मोडक आणि अध्यक्षा मोनिका आरलेंड यांनी सर्व संबंधितांचे सहकार्य व वचनबद्धतेबद्दल विशेष कौतुक केले. या लोकअदालतीच्या यशामुळे पुन्हा एकदा पर्यायी वाद निवारण यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, विशेषतः मोटार अपघात दावे यांसारख्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये न्याय मिळविण्याचा हा एक प्रभावी मार्ग ठरल्याचे नमूद करण्यात आले. असे मुंबई मोटार अपघात दावे न्यायाधिकरण बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. एस.बी.गाडगे व सचिव ॲड.सुशील परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

--

Featured post

Lakshvedhi