Thursday, 2 October 2025

गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पात सुरक्षा व नागरिक जागृतीसाठी उपाययोजना

 गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पात सुरक्षा व नागरिक जागृतीसाठी उपाययोजना*

मंत्री ॲड. शेलार यांनी गोल्डन डेटा महासमन्वय प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले कीराज्यातील सुमारे १५ कोटी नागरिकांचा डेटा एकत्रित करण्यात आला असून त्यापैकी सुमारे ६ कोटी डेटा प्रमाणित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी खालील उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

1. नागरिकांसाठी सिटिझन अवेअरनेस सिस्टिमच्या माध्यमातून महाआयटीकडून संदेशवहनाची यंत्रणा उभारावी.

2. डेटाच्या सुरक्षिततेसाठी फायरवॉल व सेफ्टी वॉल प्रणाली महासमन्वय पोर्टलमध्ये विकसित करावी.

3. वाढीव नागरिक वापर लक्षात घेऊन लोड टेस्टिंग अद्ययावत पद्धतीने करावी.

4. हा प्रकल्प डीजी यात्रा प्रणालीशी एकत्रित करावा.

5. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्च इंजिनचा वापर करून डेटा विश्लेषणासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करावी

मंत्रालयातील सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक

  मंत्रालयातील सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत

पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक

 - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. १ : राज्य शासनाच्या मंत्रालयीन तसेच विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मनुष्यबळ व्यवस्थापनात शिस्तबद्धता राखण्यासाठी शासन निर्णयात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यातअसे निर्देश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध कार्यक्रमधोरणेशासन निर्णय आणि बळकटीकरण आदी विषयांवरील पुनर्विलोकन बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियामहाआयटीचे संचालक संजय काटकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीमंत्रालयात विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले सल्लागार  माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत एम्पॅनेल्ड एजन्सीजद्वारे नियुक्त केलेले असले तरी त्यांच्या कामांचा तपशीलमानधन वा इतर माहिती महाआयटीकडे सादर केली जात नाही. त्यामुळे अशा सर्व नियुक्तींची माहिती अनिवार्यपणे महाआयटीकडे पाठविणे बंधनकारक करावीयासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यात यावी.

राज्यातील विविध विभागांमध्ये सध्या सहा एम्पॅनेल्ड एजन्सीजमार्फत २४६ व्यक्ती सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या प्रक्रियेमध्ये काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त मानधन व प्रशासकीय खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सल्लागार संस्थेच्या पारदर्शकतेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी दिले आहेत. या पोर्टलवर सर्व विभागांनी त्यांच्या सल्लागारांची सविस्तर माहिती सादर करणे अनिवार्य असेल.

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

 ८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

 

मुंबईदि. १ : २९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहेजो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीतअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईलआणि सुमारे ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

०००

भगवानगड विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र शासनाची मान्यता

 भगवानगड विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र शासनाची मान्यता

·         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार

 

मुंबईदि 1 : खरवंडी येथील श्री क्षेत्र भगवानगड  ट्रस्टच्या  विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा  देण्यास केंद्र शासनाने  मान्यता दिली असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

केंद्रीय पर्यावरणवन आणि वातावरणीय बदल विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. खरवंडी येथील ही  4 हेक्टर जागा  भक्तगणांच्या सेवासुविधांसाठीरुग्णालयप्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक  विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

"केंद्र शासनाकडे या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता त्याला यश आले आहे . श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि  विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती भाविकांना देताना अतिशय आनंद होतो आहे"असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आभार व्यक्त करताना म्हटले आहे.

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया

 आव्हानांवर मात करूयाआपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयादशमीधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केला निर्धार

 

मुंबईदि. १ :  विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हानांवरसंकटावर मात करुयाअसे आवाहन करतानाचविजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येवोअशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.

 

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाचराज्यात पावसामुळे अनेक भागात अभुतपूर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरीकष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूयाअसे आवाहन केले.

विजयादशमीचा सण हा असत्यावर सत्याच्या विजयाचा संदेश घेऊन येतो. या सणाकडून सकारात्मक अशी ऊर्जा घेऊया. बिकट परिस्थितीवर मात करूनअडचणीतून मार्ग काढण्यात महाराष्ट्र नेहमीच पुढे राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक अग्रणींनी आपल्याला हाच वारसा-वसा दिला आहे. ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज होऊया. आपल्या सर्वांच्या एकजूटीतून महाराष्ट्र विकासाची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी निर्धार करूयाअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात म्हटले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनातून विश्वाला सामाजिक समतेची दिशा दिली. हा दिवस अखंड विश्वासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरोअशी मनोकामनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

००००


पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर शाळा जागतिक क्रमवारीत प्रथम

  

पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर शाळा जागतिक क्रमवारीत प्रथम

शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

 

मुंबईदि. 1 - भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी कलाटणी देणारा क्षण आहेअसे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काढले.

 

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा, एज्युकेशन या इंग्लंड येथे मुख्यालय असणाऱ्या जागतिक संस्थेने आयोजित केलेल्या वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’ स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली. लोकसहभागातून विकसित जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. या शाळेला एक कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दादाजी भुसे यांनी आज मालेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

 

मंत्री दादाजी भुसे यांनी या शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्यासह मुख्याध्यापकसर्व शिक्षकव्यवस्थापन समितीविद्यार्थी व ग्रामस्थांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. ते म्हणालेआपण केवळ एका शाळेला जिंकवण्यासाठी प्रयत्न केला नसून संपूर्ण शासकीय शाळा व भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्य व सक्षम करण्याचे काम केले आहे. आपल्याला समाजाचे आणि देशाचे गतवैभव परत आणायचे असेलतर भारतातील एका शासकीय शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी हे घडणे गरजेचे होते. त्यासाठी आपण सर्वांनी आपले कर्तव्य समजून या चळवळीचे नेतृत्व केले व एका भारतीय व शासकीय शाळेला जगात सर्वोत्तम बनवले.

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिवहन मंत्र्यांना निर्देश

 राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिवहन मंत्र्यांना निर्देश

 

मुंबईदि.१ :- राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले कीएस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

००

Featured post

Lakshvedhi