Sunday, 7 September 2025

उद्योग स्थापण्यास भूखंडांची तातडीने

 या सुधारणा होणार

उद्योग स्थापण्यास भूखंडांची तातडीने व्यवस्था करण्यासाठी लँड बँकेची निर्मितीभूखंड वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान करणारपर्यावरणीय परवानगी ६० दिवसांमध्ये देण्याची व्यवस्था करणारजिल्हास्तरावर गुंतवणूक वाढविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करून सक्षम करणारनिर्यात वाढविण्यासाठी 'डेडिकेटेड एक्सपोर्ट पोर्टलतयार करणारसमूह विकासातून उद्योगांच्या निर्माणासाठी एक तालुका एक समूह विकास उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


इज ऑफ डूइंग बिजनेस' साठी

 'इज ऑफ डूइंग बिजनेससाठी राज्याने केलेल्या सुधारणा

उद्योग सुरू करण्यासाठी अग्निशमन परवाना बारमाही कालावधीसाठी देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्यउद्योगाच्या सुसूत्रीकरणासाठी मैत्री कायदा २०२३ पारितउद्योगांच्या वीज जोडणी साठी मैत्री सिंगल विंडो सिस्टीम कार्यान्वितकेवळ दोन कागदपत्रे नवीन वीज जोडणीसाठी आवश्यकउद्योगांना बांधकामासाठी बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वितएमआयडीसीकडून भूखंड मिळवण्यासाठी मिलाप (इंडस्ट्रियल लँड अप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल) पोर्टल कार्यान्वित.

उद्योगांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. परवानग्या मिळण्याचा कालावधी

 शहराजवळ स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. परवानग्या मिळण्याचा कालावधी कमीत कमी करून परवानग्या सुलभरित्या मिळतील याची व्यवस्था करावी. उद्योगासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया वेगाने करण्यात यावी. पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या उद्योगांच्या प्रदूषणासंदर्भात अतिरिक्त दंड आकारला जात नाहीयाची काळजी घ्यावीअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

नवीन उद्योगांबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या

 नवीन उद्योगांबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन निश्चितच सकारात्मक आहे. उद्योगांच्या परवानग्यांसाठी असलेल्या सिंगल विंडो पोर्टलला अधिक सक्षम करण्यात यावे. जेणेकरून परवानग्यांना वेळ लागणार नाही. राज्यात पाच हेक्टर क्षेत्रावरील कृषी प्रक्रिया किंवा कृषीवर आधारित उद्योगांसाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता असू नयेयासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. इज ऑफ डूइंग बिजनेस'साठी वेळोवेळी कायद्यात सुधारणा करण्यात येतात. या सुधारणांबाबत संबंधित यंत्रणांना अवगत करावे. उद्योग येण्यासाठी व सद्यस्थितीत असलेले उद्योग विकसित होण्यासाठी प्रत्यक्षात बदल होतीलअसेच रिफॉर्मकरण्यात यावेअसे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

'इज ऑफ डूईंग बिझनेस'साठी स्वतंत्र 'वॉर रूम

 'इज ऑफ डूईंग बिझनेस'साठी स्वतंत्र 'वॉर रूम'

या आपत्तीला संधी मानून राज्याच्या इज ऑफ डूईंग बिझनेसमध्ये जास्तीत जास्त बदल करण्यात यावेत. 'इज ऑफ डूइंग बिजनेसधोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूमची निर्मिती करण्यात यावीअसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 'इज ऑफ डूईंग बिझनेससाठी निर्माण करण्यात येणाऱ्या वॉर रूमचा दर महिन्याला आढावाही घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेराज्यामध्ये खासगी औद्योगिक पार्कसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक वसाहतींच्या बाहेर असे औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी स्पष्ट धोरण आणावे. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा प्राधान्याने अंतर्भाव असावा. त्यातून उद्योजकांना उद्योगासाठी लागणारे परवाने तातडीने मिळतीलअशी व्यवस्था असावी. यामुळे राज्यात निश्चितच उद्योगांच्या माध्यमातून समृद्धी येऊन रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल.

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा

 अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत बैठक

 

मुंबईदि. २१ : अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरीफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता आपली पावले टाकत आहे. आपल्या मालासाठी पर्यायी बाजारपेठ शोधून अमेरिकेने लादलेल्या टॅरीफ आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक आयात - निर्यात धोरणाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमारसंरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार (निवृत्त) अपूर्व चंद्रामित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंग परदेशीमुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ताराज्य करवस्तू आणि सेवा कर आयुक्त आशिष शर्मावस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अंशू सिन्हाकामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनउद्योग विभागाचे सचिव डॉ . पी. अन्बलगनपर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोजमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासुविकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाहआयआयटी मुंबईचे अध्यक्ष डॉ. शरद कुमार सराफ आदी उपस्थित होते.

आयडीबीआयच्या व्यवसायात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा

 आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा म्हणाले कीआयडीबीआयच्या व्यवसायात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. व्हीएसटीएफच्या सहकार्याने पाच जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. तसेच शासकीय रुग्णालयांच्या मदतीसाठी निधी देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक ब्रँच गावातील एक शाळा व विभागीय कार्यालये ही प्रत्येकी एक रुग्णालय दत्तक घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहे.

Featured post

Lakshvedhi