Thursday, 4 September 2025

महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

 महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम

  • गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

 

            नवी दिल्ली2 :- गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील मराठीबहुल भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. मराठी कलासंस्कृती आणि संगीताचा ठसा देशभर उमटवण्यासाठी तसेच कलाकारांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमांची संकल्पना मांडली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक सोहळ्यांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे. दिल्लीसह डेहराडूनबडोदाबेळगाव आणि गोवा येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

याचाच भाग म्हणून १ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे नागपूर येथील सूर-संगम या संस्थेने गणेशोत्सवानिमित्त संगीतमय प्रस्तुती दिली. सचिन ठोंबरे आणि सुरभी ठोंबर  यांनी संयोजित केलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात सुरभी ढोमणे (Zee सारेगम फेमआंतरराष्ट्रीय गायिका) आणि अंबरीश  जोगळेकर यांनी आपल्या मधुर गायनाने रसिकांची मने जिंकली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादक सचिन ढोमणे यांनी संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळली. तर परिमल जोशीमनोजसुभाष आणि नविन यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली. डॉ. मनोज साल्पेकर यांनी निवेदनाची धुरा सांभाळलीतर ऋषभ ढोमणे  यांनी ध्वनी व्यवस्था यशस्वीपणे हाताळली. विविध गाण्यांना प्रेक्षकांनी  दाद दिली.

याशिवायसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. २७ ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान वन संशोधन केंद्रडेहराडून येथे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. ३ सप्टेंबर २०२५ रोजी के. एम. गिरी सभागृहबेळगाव४ सप्टेंबर २०२५ रोजी सर सयाजीराव नगरवडोदरागुजरात आणि ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा येथे मराठी बांधवांसाठी सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार आ

चिपी - मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी

  

चिपी - मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 3 : मुंबई - चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडानच्या धर्तीवर आरसीएस’ फंडिंगचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

   मंत्रालयात चिपी - मुंबई विमानसेवा विषयी बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. राणे बोलत होते. बैठकीस विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

              चिपी - मुंबई विमानसेवा सुरू होणे ही सिंधुदुर्गसाठी भावनिक बाब असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले कीया विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळास वेगळे महत्व आहे. चिपी - मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एक महिन्यात घेण्यात याव्यात. विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनी यांनी समन्वयाने काम करावे. भविष्यात या विमानतळाला मोठे महत्त्व येणार असल्याने यासंदर्भातील कामे प्राधान्याने करावीतअसे निर्देशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.

0000

रिक्त भूखंडांसाठी अर्ज करण्याकरिता पर्याय : अ) औद्योगिक भूखंडांचे थेट वाटप

 मंत्री डॉ. सामंत यांनी उद्योग विभागाने लाँच केलेल्या मिलाप’ (Maharashtra Industrial Land Application and Allotment Platform) या ॲपची माहिती दिली. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल लॅंड अॅप्लीकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल (MILAAP) हे भूखंडांचे वाटप सुलभ करण्यासाठीआर्थिकवाढीला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विकसित केले आहे. एमआयडीसीने या पोर्टलचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याद्वारे उपलब्ध भूखंडांची यादीसहज-सोपी प्रक्रिया ऑनलाईन पेमेंटस्वयंचलितपारदर्शक आणि तत्काळ मंजुरीसह प्रक्रिया प्रदान करणार आहे.

रिक्त भूखंडांसाठी अर्ज करण्याकरिता पर्याय :

अ) औद्योगिक भूखंडांचे थेट वाटप

अति. विशाल प्रकल्प/विशाल प्रकल्प/सामंजस्य करारकेंद्र/राज्यस्तरीय सार्वजनिक उपक्रम इत्यादी अंतर्गत अटी पूर्ण करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी औद्योगिक भूखंडांचे थेट वाटप.

ब) ई-बिटिंग (औद्योगिक भूखंडांसाठी)

या प्रक्रियेद्वारे औद्योगिक भूखंडांसाठी गुंतवणूकदाराना ई-बिटिंग (ऑनलाईन पद्धतीने करण्याची मुभा मिळते.

क) ई-बिटिंग (निवासी आणि व्यावसायिक भूखंडांसाठी) या प्रक्रियेद्वारे निवासी आणि व्यावसायिक भूखंडांसाठी गुंतवणूकदारांना ई-बिटिंग (ऑनलाईन पद्धतीने) करण्याची मुभा मिळते.

गुंतवणूकदाराचा वापर :

1. www.midcindia.org या संकेतस्थळावर लॉग इन करा प्रक्रिया निवडा (सरळ किंवा ई-बिटिंग)

2. ई-बिडिंगसाठी इसारा रक्कम (EMD) भरून अर्ज पूर्ण करा आणि सबमिट करा

3. प्राप्त अर्जाची छाननी भूखंड वाटप समिती (LAC) बैठकीची तारीखरक्कम अदा केल्याची पोहच अर्जाचा संदर्भ क्रमांक ई-मेलद्वारे प्राप्त करा.

4. विस्तृत प्रकल्प अहवालाची (DPR) संबंधित अधिकाऱ्यांमार्फत छाननी केली जाईल. भूखंड बाट समितीची (LAC) बैठक नियोजित करून निर्णयानंतर सिस्टम जनरेटेड ऑफर लेटर जारी केले जाईल.

5. अंतिम इसारा रक्कम भरून भूखंड वाटप पत्र (Allotment Letter) ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करा. प्राथमिक करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी भूखंडाची शिल्लक रक्कम (BOP) भरा आणि भूखंडाचा ताबा घ्या.

000

लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय

 लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्याचा

ऐतिहासिक निर्णय

- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 3 : राज्य शासनाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी ओळख दृढ करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीला 99 वर्षांच्या करार तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असूनयासाठी शासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच कोटी रुपयांचा धनादेश महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथिगृह येथे सुपूर्द करण्यात आला आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार असूनया ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ स्थापन होणार असल्याची माहिती मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिली.

मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी मंत्रालयात घेतलेल्या  पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरेमहाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे उपस्थित होते.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले कीलंडनमध्ये महात्मा गांधींजी यांचे वैयक्तिक सचिव डॉ.एन.सी.केळकर यांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली होती. या मंडळाची इमारत लिलावाद्वारे महाराष्ट्र शासनाने पाच कोटी रुपयांना विकत घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनमराठी भाषा विभाग आणि बृहन महाराष्ट्र मंडळ लंडन यांच्यात लवकरच सामंजस्य करार (MoU) होणार आहे.

या इमारतीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र (CSMVK)’ असे ठेवले जाणार असूनहे केंद्र जगभरातील मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिकशैक्षणिक व सामाजिक कार्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या केंद्रामधून मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाची आखणीप्रशिक्षण केंद्रशिष्यवृत्ती योजनातसेच कलासंस्कृतीपर्यटनव्यापार आणि कौशल्य विकासाशी निगडीत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. शिवायजगभरातील विद्यापीठांशी सहयोग साधून मराठी भाषेचा प्रचार वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढील काळात लंडनमध्ये विश्व मराठी संमेलन घेण्याचा विचार देखील शासनाकडून करण्यात येत आहे.

या निर्णयामुळे लंडनमध्ये राहणाऱ्या सुमारे एक लाख मराठी बांधवांना मराठी शिकण्यासाठी आणि संस्कृतीशी जोडलेले राहण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.

जर्मनीच्या बिबिग वैद्यकीय समुहाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 जर्मनीच्या बिबिग वैद्यकीय समुहाच्या शिष्टमंडळाने घेतली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 

मुंबईदि.  : कर्करोगावरील उपचारामध्ये रेडिएशन उपचार पद्धतीत उत्पादने पुरविणारी जर्मनी येथील बिबिग जीएमबीएच वैद्यकीय समुहाच्या शिष्टमंडळाने आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

 

यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी कर्करोगावरील उपचारांमध्ये रेडिएशन उपचार पद्धतीचा प्रभावीपणाया उपचार पद्धतीसाठी लागणारी उत्पादनेयामधील पुरवठासाखळी आदींविषयी चर्चा केली. राज्यातील कर्करोगाच्या उपचार व्यवस्थेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली.

 

समुहाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज चानडान्जा हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मल्लासंचालक श्रीकांत मल्लामहाव्यवस्थापक सुजित कुमार उपस्थित होते.


पुणे, नागपूर, विदर्भ आणि मराठवाड्यात नवी औद्योगिक केंद्रे उभारत असल्याने राज्य संपूर्णपणे औद्योगिक नकाशावर

 औद्योगिक गुंतवणुकीबाबत मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रात देशातील 30% उत्पादन होते. आता पुणेनागपूर,  विदर्भ आणि मराठवाड्यात नवी औद्योगिक केंद्रे उभारत असल्याने राज्य संपूर्णपणे औद्योगिक नकाशावर अग्रगण्य ठरेल. नागपूरमध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि सोलर हबतर विदर्भात गडचिरोली येथे स्टील हब उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाश्वत विकासाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसन 2030 पर्यंत महाराष्ट्राच्या ऊर्जा वापरात 52 टक्के हरित ऊर्जा असेल. सौरपवनहायड्रोजन व पंप स्टोरेज यावरही भर देण्यात येत असून  सार्वजनिक वाहतूकही संपूर्णपणे नूतनीकरणीय ऊर्जेवर नेण्याचा प्रयत्न आहे. अध्यात्मिक पर्यटन (स्पिरिचुअल टुरिझम) आणि सागरीतटीय पर्यटन (कोस्टल टुरिझम) यांना चालना देण्यासाठी शक्तिपीठ महामार्गासारखे प्रकल्प हाती घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्या भारतीय विदेश सेवेतील श्रीमती योजना पटेल (डीपीआरपीएमआय न्यूयॉर्क)श्रीमती प्रतिभा पारकर-राजारामसंयुक्त सचिव (संसद व समन्वय)श्रीमती परमिता त्रिपाठीसंयुक्त सचिव (ओशेनिया व आयपी)अंकन बॅनर्जीसंयुक्त सचिव (डीई)श्रीमती स्मिता पंतराजदूतएल सॅल्वाडोरबिष्वदीप डेउच्चायुक्तटांझानिया आणि सी. सुगंध राजारामसंयुक्त सचिव (बिम्सटेक व सार्क) यांचा समावेश होता.

महाराष्ट्रात 10 लाख कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. यात महामार्ग, बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्प

 महाराष्ट्रात 10 लाख कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. यात महामार्गबंदरेविमानतळवीज प्रकल्पशहरी विकास आणि पाणीपुरवठा यांचा समावेश आहे.

वाढवण बंदर व समृद्धी महामार्ग यामुळे महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीत क्रांतिकारी बदल घडवणार आहे. जेएनपीटी’ बंदराची क्षमता संपत आल्याने वाढवण बंदर देशासाठी मोठा पर्याय ठरणार आहे. समृद्धी महामार्गाद्वारे राज्यातील 26 जिल्हे या बंदराशी जोडले जातीलज्यामुळे लॉजिस्टिक्स खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेवाढवण येथील  परिसरात देशातील पहिले मल्टी-मोडल हब उभे राहणार आहे. येथे पोर्टएअरपोर्टबुलेट ट्रेन आणि महामार्गाचे संपूर्ण जाळे उपलब्ध असेल. या भागात चौथी मुंबई तयार होत आहे. त्याचबरोबर नवी मुंबईत युनिव्हर्सिटी टाउनशिपस्पोर्ट्स सिटीमेडिसिटी आणि इनोव्हेशन सिटी विकसित करण्यात येत आहेत.


Featured post

Lakshvedhi