Thursday, 4 September 2025

रिक्त भूखंडांसाठी अर्ज करण्याकरिता पर्याय : अ) औद्योगिक भूखंडांचे थेट वाटप

 मंत्री डॉ. सामंत यांनी उद्योग विभागाने लाँच केलेल्या मिलाप’ (Maharashtra Industrial Land Application and Allotment Platform) या ॲपची माहिती दिली. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल लॅंड अॅप्लीकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल (MILAAP) हे भूखंडांचे वाटप सुलभ करण्यासाठीआर्थिकवाढीला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विकसित केले आहे. एमआयडीसीने या पोर्टलचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याद्वारे उपलब्ध भूखंडांची यादीसहज-सोपी प्रक्रिया ऑनलाईन पेमेंटस्वयंचलितपारदर्शक आणि तत्काळ मंजुरीसह प्रक्रिया प्रदान करणार आहे.

रिक्त भूखंडांसाठी अर्ज करण्याकरिता पर्याय :

अ) औद्योगिक भूखंडांचे थेट वाटप

अति. विशाल प्रकल्प/विशाल प्रकल्प/सामंजस्य करारकेंद्र/राज्यस्तरीय सार्वजनिक उपक्रम इत्यादी अंतर्गत अटी पूर्ण करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी औद्योगिक भूखंडांचे थेट वाटप.

ब) ई-बिटिंग (औद्योगिक भूखंडांसाठी)

या प्रक्रियेद्वारे औद्योगिक भूखंडांसाठी गुंतवणूकदाराना ई-बिटिंग (ऑनलाईन पद्धतीने करण्याची मुभा मिळते.

क) ई-बिटिंग (निवासी आणि व्यावसायिक भूखंडांसाठी) या प्रक्रियेद्वारे निवासी आणि व्यावसायिक भूखंडांसाठी गुंतवणूकदारांना ई-बिटिंग (ऑनलाईन पद्धतीने) करण्याची मुभा मिळते.

गुंतवणूकदाराचा वापर :

1. www.midcindia.org या संकेतस्थळावर लॉग इन करा प्रक्रिया निवडा (सरळ किंवा ई-बिटिंग)

2. ई-बिडिंगसाठी इसारा रक्कम (EMD) भरून अर्ज पूर्ण करा आणि सबमिट करा

3. प्राप्त अर्जाची छाननी भूखंड वाटप समिती (LAC) बैठकीची तारीखरक्कम अदा केल्याची पोहच अर्जाचा संदर्भ क्रमांक ई-मेलद्वारे प्राप्त करा.

4. विस्तृत प्रकल्प अहवालाची (DPR) संबंधित अधिकाऱ्यांमार्फत छाननी केली जाईल. भूखंड बाट समितीची (LAC) बैठक नियोजित करून निर्णयानंतर सिस्टम जनरेटेड ऑफर लेटर जारी केले जाईल.

5. अंतिम इसारा रक्कम भरून भूखंड वाटप पत्र (Allotment Letter) ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करा. प्राथमिक करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी भूखंडाची शिल्लक रक्कम (BOP) भरा आणि भूखंडाचा ताबा घ्या.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi