Wednesday, 2 July 2025

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'जल जीवन मिशन'च्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते यांची मुलाखत

 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'जल जीवन मिशन'च्या

अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते यांची मुलाखत

 

मुंबईदि. २ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'जल जीवन मिशनची कार्यपद्धती व अंमलबजावणीया विषयावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जल जीवन मिशनच्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ४ जुलै, २०२५ रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुकएक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर रात्री ८.०० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

पिण्यासाठीसिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. समाजाला सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी पुरविणे हाच भूजल सर्वेक्षण आणि विकास योजनेचा मुख्य हेतू आहे. यासाठी शासन स्तरावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच जल जीवन मिशनसारखे अनेक महत्वाचे प्रकल्प पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत राज्यात कोणते उपक्रम सुरू आहेतत्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहेयाबाबत अतिरिक्त अभियान संचालक श्रीमती सातपुते यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचित धूरत यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात

त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचित धूरत यांची मुलाखत

 

मुंबईदि.  : बदलत्या जीवनशैलीमुळे व वातावरणातील बदलांमुळे त्वचेचे विकारकेस गळती यांसारख्या समस्या वाढीस लागल्या आहेत. यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयातील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचित धूरत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

त्वचा विकास व उपचार पद्धती’ या विषयावर आधारित ही मुलाखत शुक्रवार दि. ४, शनिवार दि. ५, सोमवार दि. ७, मंगळवार दि.  आणि बुधवार दि. जुलै २०२५ रोजी सकाळी .२५ ते .४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित केली जाईल. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वातावरणातील बदलमानसिक ताणतणाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा विकारकेस गळती यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये त्वचेशी निगडीत आजारांमध्ये अनेक संसर्गजन्य तसेच कर्क रोगांसारखे गंभीर आजारांचा देखील समावेश आहे. ही बाब विचारात घेवून आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. याअनुषंगाने दिलखुलास’ कार्यक्रमात त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. धूरत यांनी त्वचाविकारांचे प्रकारकारणेप्रतिबंध आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत याबाबत सखोल माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं/

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे pl share

 पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी

३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

 

            मुंबई‍‍दि. २ : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दि. ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावेतअसे आवाहन प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

             जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या निवडीनुसार व्यवसाय करण्यास अर्थ सहाय्य करण्यात येते.  जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी अनुदान उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० ऑगस्ट, २०२५ पर्यंत प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. २कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉलतळमजलाबोरिवली पूर्वमुंबई या पत्त्यावर अर्ज करावेतअसे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज सुरू करावेत

 राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी

३१ जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज सुरू करावेत

 

मुंबईदि. २ : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी आपले सरकारपोर्टलवर ३१ जुलैपूर्वी अर्ज दाखल करावाअसे आवाहन संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयमुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

योजनेसाठी लाभार्थ्याचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असावे आणि दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे करण्यात आली आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षाचे योगदान आवश्यक आहे. विधवापरितक्त्यादिव्यांग व वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्यांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून आहेअशा कलाकारांनाच प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही नियमित पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. तसेचमहाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक असणे या पात्रतेच्या अटी आहेत.

 

विधान परिषद प्रश्नोत्तरे एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही

 वृत्त क्र. २१

विधान परिषद प्रश्नोत्तरे

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या

विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबईदि. २ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू आहे. या योजनेत गुरुकृपा हॉस्पिटल अथवा अन्य कोणत्याही विशिष्ट हॉस्पिटल अथवा संस्थेमार्फत वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी सक्ती करण्यात आलेली नाही. कुणी असा दबाव आणत असल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल आणि त्यात कुणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईलअसे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या अनुषंगाने प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगतापप्रवीण दरेकरॲड. अनिल परब आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. सरनाईक म्हणालेराज्यात ९० हजार हजार एसटी कर्मचारी असून त्यांच्या पगारासाठी वेगळी वेतनश्रेणी आहे. त्यांच्यासाठी महामंडळाने धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना जाहीर केली आहे. या माध्यमातून ४० वर्षावरील कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा आणि ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा आरोग्याच्या ११ तपासण्या करण्यासाठी तीन हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या चाचण्या ठराविक ठिकाणीच करण्यात याव्यात अशी सक्ती करण्यात आली नसून या योजनेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उ र्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार


 

.

विधानसभा प्रश्नोत्तरे

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उ

र्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार

- मृद व  जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबईदि. २ : चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम करण्यात आले आहे. या नाल्यावरील उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करून या भिंतीचे कामही पूर्ण करण्यात येईलअशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

चंद्रपूर शहरातील नालावरील संरक्षक भिंती बाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. राठोड म्हणालेनाल्याची नैसर्गिक रुंदी आणि प्रवाह कायम  ठेवण्याबाबत तपासून घेऊनच नाल्यावरील उर्वरित संरक्षण भिंतीचे काम करण्यात येईल.  याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीही करण्यात येईल. नाला संपूर्ण चंद्रपूर शहरातून जात असल्याने संपूर्ण नाल्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात घेऊनच जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

नाल्यावरील संरक्षक भिंतीला जिल्हा नियोजन निधीतून ५ जुलै २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. नाल्यावरील १२७ मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम १५ डिसेंबर २०२४  पूर्ण करण्यात आलेअशी माहितीही मंत्री श्री. राठोड यांनी दिली. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य विजय वडेट्टीवारकिशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला

विधानसभा प्रश्नोत्तरे परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी pl share

 विधानसभा प्रश्नोत्तरे

परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी

- पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. २ : बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार  राज्यात निदर्शनास येत आहेत.  त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच  संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात  बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येईलअसे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य दौलत दरोडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. रावल म्हणालेअकोला जिल्ह्यातील अंदुरा ॲग्रो प्रोडूसर कंपनीने (ता. बाळापूर) शेतकऱ्यांचा सोयाबीन शेतमाल खरेदी केला.  खरेदी केलेला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आला. वखार महामंडळाच्या गोदामातील पावत्या आणि खरेदी केलेल्या शेतमालामध्ये १,२९७ क्विंटलची तफावत आढळून आली आहे. याबाबत कंपनीचे मालक व अन्य ११ लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तफावतीचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी कंपनीचा बाजार समितीकडून देय असलेला ३६ लाख रुपयांचा निधी अडकविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यासाठी वसुलीची कार्यवाही करण्यात येत आहे.

शेतीशी संबंधित शेतकऱ्यांचे फसवणुकीचे गुन्हे कमी करण्यासाठी 'कृषी गुन्हे शाखाआणि कृषी न्यायालय स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. यावर्षीच्या हंगामासाठी सोयाबीन खरेदी केंद्र वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मागील वर्षात राज्यामध्ये देशातील सर्वाधिक  ११ लाख २१ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीचा उच्चांक करण्यात आला.  या वर्षी सुद्धा हाच प्रयत्न राहणार आहे असेही पणन मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य भास्कर जाधवनाना पटोलेकैलास पाटीलसुधीर मुनगंटीवाररोहित पवाररणधीर सावरकरअसलम शेखश्रीमती सुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.


Featured post

Lakshvedhi