Sunday, 1 June 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त

पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. ३० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यविचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ३१ मे २०२५ रोजी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक तेजस्वीकर्तबगार व दूरदृष्टी असणाऱ्या स्त्रीशक्तीचे प्रतिक आहेत. त्यांनी धार्मिक सहिष्णुतासमाजकल्याणसार्वजनिक बांधकामन्यायप्रविष्ट प्रशासन आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजसेवाधर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक असूनते महाराष्ट्र राज्याच्या प्रगत व उन्नत वाटचालीसाठी नेहमीच पथदर्शी ठरले आहे. यास अनुसरुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत अधिनस्त संस्थांमध्ये कार्यालय/ दवाखाना परिसर स्वच्छता व सुशोभिकरण करणेगाव पातळीवर वंधत्व / सर्वोपचार शिबिरांचे आयोजन करणेफिरस्ती मेंढपाळांची भेट घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणेमेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांचे मान्सून पूर्व लसीकरण करणेपशुधनाचे जंतनिर्मूलनगोचीड निर्मूलनकरडे / कोकरे मरतूक कमी करणेबाबत उपाययोजना करणेमेंढपाळांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर / परिसंवादाचे आयोजन करणेवृक्ष लागवड करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात यावेतअशा सूचना मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिल्या आहेत.

पशुसंवर्धन आयुक्त रामस्वामी एन आणि पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त विभागाच्या मुख्यालयातही अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमांमुळे मेंढी-शेळी पालकांशी थेट संवाद साधत शासनाचे विविध उपक्रमयोजना तसेच शेळी-मेंढी तांत्रिक व्यवस्थापनाविषयी माहिती पशुपालकांना देणे शक्य होईल. तसेच शेळी-मेंढीपालनाला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून अधिक किफायतशीर करण्यासाठी विभागाला आवश्यक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी करणे सुलभ होईलअसा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

कोकणातील निवारा केंद्राच्या कामांचा वेग वाढवावा

 कोकणातील निवारा केंद्राच्या कामांचा वेग वाढवावा

कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय व्हावी. यासाठी एमएसआरडीसीच्या वतीने ८६ निवारा केंद्रे उभारण्यात येणार होती. यातील ३७ निवारा केंद्राचे काम प्रगतीपथावर असून या कामांना वेग देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. तसेच शक्यतो शाळांच्या जवळ ही निवारा केंद्र उभारावीत जेणेकरून पावसाळ्यानंतर शाळांना त्यांचे उपक्रम राबवण्यासाठीही निवारा केंद्रे वापरता येतील असे त्यांनी सांगितले.

सुप्रभात

 *"बरं चाललंय आयुष्यात" हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण...  "खरं काय चाललंय  आयुष्यात" हे सांगायला "जवळचा माणूस" लागतो...!!*

 *एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु पन्नास वर्ष एकाच मित्राशी घट्ट* *मैत्री ठेवणे* *ही महत्त्वाची बाब* *आहे.*  

 *सुप्रभात* 🌹

नवीन एक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट,रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे

 नवीन एक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट

कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजारेवदंडाआगरदांडाकेळशीकाळबादेवीदाभोळजयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच कोकणात प्रस्तावित असलेल्या कोकण द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या कामाला गती देण्यात यावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या महामार्गामुळे मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अधिक जवळ येतील तसेच कोकणात जलद पोहोचणे शक्य होईल.


पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या 10 हजार झाडांचे पुनर्रोपण करणार

 पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या 10 हजार  झाडांचे पुनर्रोपण करणार

पुणे रिंगरोडचे कामही सुरू झाले असूनयात एकूण १२ पेकेजेस आहेत. यातील  नऊ पेकेजेसची कामे सुरू झाली आहेत. या रिंग रोडच्या कामात बाधित होणाऱ्या दहा हजार झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. यातील चार हजार झाडांचे पुनर्रोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक डिसेंबर अखेर होणार पूर्ण

 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक डिसेंबर अखेर होणार पूर्ण

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. तसेच हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग सहा ऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असून फिरायला जाणाऱ्या  लोकांना दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एमएसआरडीसीकडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवा मुंबई- नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती द्यावी

 एमएसआरडीसीकडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवा

मुंबई- नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती द्यावी

कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवातसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीस एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि अधिकारी उपस्थित होते.

मुंबई - नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावाया मार्गावरील 31 किलोमीटरचे काँक्रीटीकरण होणे अद्यापही बाकी आहेतसेच पिंपळास चारोटीरेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे या कामांना तत्काळ गती द्यावीकंत्राटदार ही कामे वेळेत पूर्ण करण्यास हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करावे. या महामार्गावरील कशेळी येथील खाडीवरील पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत तर कळवा येथील खाडी पुलाचे काम जून महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Featured post

Lakshvedhi