Wednesday, 5 March 2025

महिला कला महोत्सवात लावणी आणि शास्त्रीय युगलगायनाने रंगत*

 *महिला कला महोत्सवात लावणी आणि शास्त्रीय युगलगायनाने रंगत*

4 मार्च 2025 रोजी महिला कला महोत्सवात रेश्मा मुसळे परितेकरयोगिता मुसळेअश्विनी मुसळे आणि त्यांच्या संचाने लावणी नृत्य सादर केली. या कार्यक्रमाला आशाताई मुसळे आणि सुलोचना जावळकर यांच्या गायनाने रंगत आणलीतर कृष्णा मुसळे (ढोलकी)विठ्ठल कुडाळकर (तबला) आणि सुधीर जावळकर (हार्मोनियम) यांनी संगत दिली. त्यानंतरविदुषी अपूर्वा गोखले आणि विदुषी पल्लवी जोशी यांच्या शास्त्रीय युगलगायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अनंत जोशी (पेटी) आणि अभय दातार (तबला) यांनी त्यांना साथ दिली.

यावेळी आपली भावना व्यक्त करताना लावणी नृत्यांगना श्रीमती रेश्मा मुसळे म्हणाल्या की, लोककलेला आणि लोककलांवतांना रसिकांकडून मिळणारी दाद ही नक्कीच सुखावणारी आणि लाखमोलाची असते.

चित्रप्रदर्शनाचेही आयोजन*रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे 2 मार्च ते 15 मार्च

 *चित्रप्रदर्शनाचेही आयोजन*

रवींद्र नाट्यमंदिरप्रभादेवी येथे 2 मार्च ते 15 मार्च 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नामांकित चित्रकारसुलेखनकार आणि शिल्पकार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन खुले असणार असूनमुंबईकरांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.


दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी कायदा पदवीधरांनी पुढे यावे,pl share

 दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी कायदा पदवीधरांनी पुढे यावे

- न्यायमूर्ती भूषण गवई

 

मुंबईदि. 04 : यशासाठी सातत्यपरिश्रम व प्रामाणिक प्रयत्न यांची आवश्यकता आहे.  कायदा क्षेत्र सर्वस्पर्शी असून समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर सल्ला व मदत देण्यासाठी कायदा क्षेत्रातील पदवीधरांनी पुढे यावेअसे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधी विद्यापिठाचे कुलपती भूषण गवई  यांनी केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा द्वितीय पदवी प्रदान सोहळा एनसीपीए झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलपती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरेन्यायमूर्ती संदीप मारणेविधि व न्याय विभाग प्रधान सचिव सुवर्णा केवळेयासह मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सर्वश्री अतुल चांदुरकरनितीन सांबरेअनिल किल्लोरअभय आहुजापृथ्वीराज चव्हाण (निवृत्त) तसेच कायदा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात पदवी व पदव्युत्तर अशा 350 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.  विविध अभ्यासक्रमांमध्ये सुवर्णरौप्य व कांस्य पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात कुलगुरू प्रा. डॉ  उके यांनी  विद्यापीठाने शैक्षणिकसांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचा आढावा घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत केलेल्या सामंजस्य करारांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाचे पुढील 20 वर्षाचे  व्हिजन डॉक्युमेंट 2040 प्रकाशित करण्याते आले. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी विद्यापीठ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. संचालक समरेंद्र निंबाळकर व सदस्य सचिव शेखर मूनगटे यांनी करारावर स्वाक्षरी केली.

0000

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन Pl share

 सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून  ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणेसायबर पोलीस ठाणेकेंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावीअसे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींगसोसायटी मिटींगजेष्ठ नागरिकांचे क्लबझोपडपट्ट्या तसेच शाळामहाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धतीसुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

 मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्रामट्विटरव्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेतअसे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

००००

करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा ६ मार्च रोजी

 करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा ६ मार्च रोजी

 

मुंबईदि.४ मार्च : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यांकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरण  कार्यालयामार्फत ६ मार्च२०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीविद्यालंकार मार्ग वडाळा, (पू.) मुंबई-३७ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावाअसे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरणमुंबईच्या प्राचार्य मनिषा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

या मेळाव्यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थांना त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, व्यक्तिमत्व, वैशिष्ट्ये याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकांमार्फत समुपदेहान (करिअर टॉक) देण्यात यंणार आहे. तसेच वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी करिअर व रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांना करिअर मार्गदर्शन आणि वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी जिल्ह्यातील नियोक्त्यामार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र (Appointment Letter) देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावाअसेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

000


 

Tuesday, 4 March 2025

खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील २ हजार कि.मी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाहीयासाठी काळजी घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

हाजीअली येथे २ हजार वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारा –

 हाजीअली येथे २ हजार वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारा – मुख्यमंत्री

            छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे दोन हजार वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावेअसे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत. प्रस्तावित प्रकल्पांसाठीच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

भविष्यात मुंबईला पाणीपुरवठ्यासाठीच्या गारगाई प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुनर्वसन प्रक्रिया व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

Featured post

Lakshvedhi