खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील २ हजार कि.मी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment