Tuesday, 11 February 2025

कै. श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन pl share

  

कै. श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

 

मुंबई,दि. ११ : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखातर्फे आयोजित कै. श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२४- २०२५ या वर्षात निबंधस्पर्धेसाठी विकसित भारत- 'सन २०४७', उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्विमत्तेचा (AI) उपयोग विषयांवर निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध हा वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावयाचा आहे. निबंध ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावानिबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मकसंशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपणनांव लिहून चार प्रतीत सादर करावा.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नयेनिबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळया लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून)टोपणनावपत्तासंपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १० हजार रुपयेदुसरे बक्षिस  ७ हजार ५०० रुपयेतिसरे बक्षीस ५ हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षिस २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

संस्थेस प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या प्रादेशिक शाखेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास बक्षीस न देण्याचा किंवा बक्षिसाची रक्कम कमी करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे. बक्षीस देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार नाही.

टोपणनांव लिहिलेल्या निबंधाच्या चार प्रती व त्यासोबत वेगळया लिफाफ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव (इंग्रजी व मराठी)टोपणनावपत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस लिहिलेली माहिती एकत्रित एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर 'कै. श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा२०२४-२०२५असे नमूद करावे. आणि हा लिफाफा 'मानद अध्यक्षभारतीय लोक प्रशासन संस्थामहाराष्ट्र विभागीय शाखातळ मजलाबँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला मंत्रालयमादम कामा मार्गमुंबई- ४०००३२या पत्त्यावर दिनांक २८/२/२०२५ पर्यंत पाठवावा. स्पर्धकांच्या काही शंका असल्यासमाहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९ ३४३० किंवा ईमेल: jsmrb-iipa@egov.in द्वारे संपर्क साधावा.

०००००००००

दिव्यांगांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी

 दिव्यांगांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता

जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची माहिती

 

         मुंबई  दि.११ :  सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २.६३  टक्के इतकी आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेतात्यांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल १ टक्का निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहितीउपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.

         जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनाशाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एन्ट्री यासाठीच्या एकंदरीत ५ टक्के निधी वगळून नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या ९५ टक्के निधीमधून १९ टक्के निधी विविध प्रशासकीय विभागांच्या नियमित योजनांसाठी राखून ठेवण्यात येतो.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री.पवार यांनी  ०५ फेब्रुवारी२०२५ च्या राज्यस्तर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ आराखडा बैठकीत राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत कमाल १ टक्का पर्यंत निधी राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने नियोजन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

             "जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)" अंतर्गत "दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व कल्याण" या करीता राखून ठेवावयाच्या एक टक्का निधीचा सुयोग्य विनियोग होण्याकरीता त्यासंबंधीच्या योजनेचे सुस्पष्ट आदेश नियोजन विभागवित्त विभाग यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येतील अशी माहितीहीउपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिली.

००००० 

कल्पना करा! आजपासून ४०० वर्षांपूर्वी

 आज आपणा सर्वांकडे स्मार्ट फोन्स आहेत. संपर्काची अत्यंत शक्तीशाली माध्यमं आहेत! आज रस्ते उत्तम आहेत! रेल्वेचे जाळे आहे, विमाने आहेत! जीपीएस आहे! नकाशे आहेत! आपण खूप पर्यटन देखील करतो.

तरी आपण ज्या ज्या ठिकाणी भेट दिली तिथे तिथे मागे काय उरते? 


कल्पना करा! आजपासून ४०० वर्षांपूर्वी वरील पैकी काहीही नसताना समर्थ रामदास स्वामींनी भारतभर फ़िरून जी ११०० हून अधीक मठांची स्थापना केली

त्यातील बहुतांश मठ आजही शिल्लक आहेत! इतकेच नव्हे तर त्या त्या प्रांतात मराठी लिहिता-वाचता-बोलता येणारे मठपतीही आजही वंशपरंपरेने शिल्लक आहेत! 


तिबेटच्या सीमेपासून केवळ ३० किमी वर बद्रीनाथ येथे समर्थांचे २ मठ आजही आहेत. तमिळनाडू मध्ये आजही १४ मठ जिवंत आहेत. आंध्रात ६५, कर्नाटकात ३६, राजस्थान, मध्यप्रदेश इ. अनेक ठिकाणी समर्थांचे माठ आजही राष्ट्रभक्ती जागविण्याचे कार्य करत आहेत!


आग्र्याहून सुटून केवळ २३ दिवसात राजगडावर पोहोचणे शिवाजी महाराजांना शक्य झाले कारण त्यांना दर ठराविक अंतरावर घोडे बदलून मिळाले! सर्वत्र मुघलांचे राज्य असताना कुणी घेतली असेल ही जबाबदारी? विचार करा! त्या काळातच काय आजही इतके भक्कम जाळे विणलेला संप्रदाय अस्तित्वात नाही!

सर्वांना कळावे यासाठी अवश्य शेअर करा हा नकाशा!


प्रदर्शन दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

 प्रदर्शन   दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला दि. ११ ते २३ फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येणार आहे.

या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तूहातमागावर तयार केलेले कपडेवुडन क्राफ्टबंजारा आर्टवारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरीलहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या ठिकाणी  प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे  यांच्या नेतृत्वात  ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिवएकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे  भव्य आयोजन करण्यात येत  आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान pl share

 उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

उमेद  हे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिकसामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियानामार्फत या महिलांना अनेक प्रकारची कौशल्ये व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे दिली जातात. आज अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत.  त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन आयोजित केले जाते. आतापर्यंत मुंबईनवी मुंबईनागपूर या ठिकाणी महालक्ष्मी सरस चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

****

करंजा - उरण येथील जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे

 करंजा - उरण येथील जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे

-  मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 10 – रायगड जिल्ह्यातील करंजा – उरण येथील मच्छिमार बंदराचे काम वेळेत पूर्ण करत असतानाच दर्जेदारही असावे असे आदेश मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

            मंत्रालयात आज उरण जेट्टीच्या कामाविषयी झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदीमत्स्य आयुक्त  किशोर तावडेमहाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उरण येथील जेट्टीचे काम करत असताना करण्यात येणाऱ्या कामांची प्राथमिकता ठरवावी, असे आदेश देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले कीसर्वात प्रथम पाणीवीजरस्ते आणि लिलाव शेडचे काम करावे. तसेच एकूण राहिलेल्या कामांचे नियोजन करावे. यासाठी एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार कामे करण्यात यावीत. एकूण 151 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असला तरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन आणखी काही कामे घ्यावयाची असल्यास त्याचा समावेश करावा आणि सविस्तर सुधारित आराखडा सादर करावा. बंदरातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य द्यावे आणि पुन्हा गाळ भरू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा सादर करावा. या कामाच्या प्राशाकीय मान्यतेसाठी पाठपुरवा करावा.

या जेट्टीच्या ठिकाणी एकूण 20 कामे हाती घेण्यात आली आहेत. 151 कोटी रुपयांच्या या कामांमध्ये क्यू वॉलजोड कालवापार्किंगमच्छी लिलाव हॉलप्रशासकीय कार्यालय, 2 फिशिंग गिअर शेड, 2 जाळी विणण्याची शेडमच्छिमारांसाठी निवारा शेडरेस्टॉरंटरेडिओ कम्युनिकेशन स्टेशनगार्ड हाऊससंरक्षक भिंतसुशोभिकरण, 1 एमएलडीचा सेवेज ट्रिटमेंड प्लांट, 200 टन क्षमतेचा आईस प्लांट, 100 टन क्षमतेचे फिश कोल्ड स्टोरेजआरओ प्लांटविुद्युतीकरणपिण्याच्या पाण्याची सोयअग्निसुरक्षा आणि फ्युएल पंप यांचा समावेश आहे.

दरम्यान मंत्री श्री. राणे यांनी रेवस ते रेड्डी या किनारी महामार्गाच्या कामाचाही आढावा घेतला. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील कामाचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. या कामाचे भूसंपादन योग्यरित्या करण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणालेहे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावे. या कामाविषयी स्थानिकांना माहिती देण्यासाठी येत्या 12 फेब्रुवारी रोजी अधिकारी यांनी कुणकेश्वर येथे जाऊन ग्रामस्थांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करावी व कामाची सविस्तर माहिती संबंधितांना द्यावी. तसेच संबंधित विभागांच्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या.

कुणकेश्वर येथील हा पूल केबल स्टड प्रकारातील असणार आहे. एकूण 181 कोटी रुपयांचा हा पूल असणार आहे. त्याची लांबी 330 मीटर असून रुंदी 1.8 मीटर असणार आहे. तर जोड रस्तामिळून या संपूर्ण कामाची लांबी 1.580 कि.मी. इतकी आहे. या कामामुळे कुणकेश्वर आणि देवगड परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

00000

आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे pl share

 आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे

- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

 

मुंबई, दि. 10 : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावेअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंदरेवित्तीय सल्लागार प्रमोद पेटकरमहाव्यवस्थापक (प्रशासन) सुनील सोवितकरमहा व्यवस्थापक (ऑपरेशन) रामेश्वर कुंभार उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या कीमोफत आरोग्य सुविधेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. यासाठी प्रभावी जनजागृतीआशा कार्यकर्त्याअंगणवाडी सेविकाआणि ग्रामसेवक यांच्या मदतीने घरगुती सर्वेक्षण व लाभार्थी सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात यावीअशा सूचना राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिल्या.

प्रधाननमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ  जास्तीत जास्त रुग्णांना होण्यासाठी व तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावीअसेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी आरोग्य सुविधामनुष्यबळ आदीबाबींचा आढावा घेतला.

0000

Featured post

Lakshvedhi