Tuesday, 11 February 2025

हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदार करावे

 हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे काम

नियोजित वेळेत आणि दर्जेदार करावे

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 10 : राज्य शासनाच्या पुनर्विकसित करण्यात येत असलेल्या हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावेअसे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

देशातील विविध महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती यांच्या बैठक आणि निवासस्थानाच्या व्यवस्थेसाठी मुंबईमध्ये असलेल्या अतिथीगृहांपैकी एक असलेल्या हायमाउंट अतिथीगृहाच्या पुनर्विकासाचे काम पूर्णत्वास आले असून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्याची पाहणी केली. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हायमाऊंट येथे महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असणार असल्याने या इमारतीचे सुरू असलेले काम मुंबई आणि महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसे असे व दर्जेदाररित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरउपसचिव हेमंत डांगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणेमुख्य वास्तूशास्त्रज्ञ चेतन आकेवरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ मि.दी.जाधवबृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील तावडेसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वि.अ. पाटसकरडॉ. प्रसन्ना कुलकर्णी उपस्थित होते.

मुंबईत येणाऱ्या महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी असलेले अतिथीगृह हे सर्व सुविधांनी युक्त असावे. त्यादृष्टीने हाय माउंट अतिथीगृहात एक्झिक्यूटिव्ह कक्षांसोबतच महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी आवश्यक सर्व सुविधा असणारे कक्ष असावेतअसेही श्री.रावल यांनी सांगितले.

हाय माउंट अतिथीगृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेल्या सह्याद्री अतिथीगृहाची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घ्यावीतअसे निर्देशही श्री. रावल त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे मुंबई विमानतळानजिकच्या नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावाअशी सूचनाही त्यांनी केली.

0000

लोकनाट्य कला केंद्रांसाठी नवी नियमावली करणार

 लोकनाट्य कला केंद्रांसाठी नवी नियमावली करणार

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. 10 : महाराष्ट्रातील लोककला जगली पाहिजे, लोकनाट्य केंद्रांवरील सादरीकरणातील पारंपरिक बाज जपला पाहिजे. तसेच सादरीकरणात पारंपरिक वाद्यांचा वापर झाला पाहिजे. या तसेच अनुषंगिक बाबींसाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून लवकरच नियमावली तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

लोककलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले, लोकनाट्य केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. लोकनाट्य व पारंपरिक लावणी कला जपणे गरजेचे असून ही कला व हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्व.पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.

लोकनाट्य केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. यासंदर्भात नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

0000

कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना

 कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. 10 :  कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावेयासाठी कोल्हापूर चित्रनगरीत  लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवजजुने चित्रपटचित्रपटांचे पोस्टर्सकॅमेरेवेशभूषास्क्रिप्ट्स अशा विविध स्मृतींचे जतन करण्यात येईलअसे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

 

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेउपसचिव नंदा राऊतसांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरेपुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

 

 कोल्हापूर चित्रनगरी येथे नवीन वस्तुसंग्रहालयात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचा ठेवा जपला जाणार असूनजुन्या तसेच नव्या पिढीला चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली परंपरेची माहिती मिळेल असे सांगून ॲड.शेलार म्हणाले कीसांस्कृतिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने चित्रफिती तयार करून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित कराव्या.

 

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे काम सुरळीत चालविले जावे यासाठी यंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामे सुरू असल्याने या विकासकामांकरिता चित्रपट क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या वास्तुविशारद यांची बाह्य स्रोतांद्वारे नियुक्ती करावी. ही पदे भरताना ‘एम एस आय डी सी’ ची मदत घेण्याची सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी केली.


सिंगापूरसोबत व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र उत्सुक

 सिंगापूरसोबत व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र उत्सुक

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 10 : भारत हा सर्वांगाने पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण असलेला देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील समुद्रकिनारेपर्वतरांगाअभयारण्ये अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण फळेफुलेभाजीपाला अशी मुबलक कृषी संपदा असून सिंगापूरने व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढे यावेमहाराष्ट्र आपले स्वागत करेलअसे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

सिंगापूरचे महावाणिज्य दूत चिओंग मिंग फुंग यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्याबाबत चर्चा झाली.

राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री.फुंग यांना माहिती दिली. जगप्रसिद्ध हापूस आंबास्ट्रॉबेरीसह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळफळेभाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. सिंगापूरला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावामहाराष्ट्राच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

सिंगापूरच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी सिंगापूर करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

0000

उपराष्ट्रपती तसेच उपसभापती यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट

 उपराष्ट्रपती तसेच उपसभापती यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट

उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती  जगदीश धनकड यांची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ आणि राज्यसभेतील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.

उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासोबतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चर्चा केली. असंघटित  कामगारसामाजिक न्याय यावेळी यासंदर्भात चर्चा झाली.

0000

संसदीय प्रक्रियेतील सक्रीय सहभाग गरजेचा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

 संसदीय प्रक्रियेतील सक्रीय सहभाग गरजेचा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक दिवसांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळ सदस्यांनी शून्य तासप्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रिय सहभाग घ्यावाअसा आग्रह त्यांनी व्यक्त केला.

सभागृहातील उपस्थिती शंभर टक्के असावीसंसद व विधीमंडळाच्या जुन्या चर्चांचा अभ्यास करावातसेच विषयाचा सखोल अभ्यास करून प्रभावी लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करावाअसे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील आमदार उपस्थित होते. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे जितेंद्र भोळे (सचिव-१) आणि विलास आठवले (सचिव-२) हेदेखील उपस्थित होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी 'विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण' कार्यक्रमाचा समारोप

 उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

11 फेब्रुवारी रोजी 'विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षणकार्यक्रमाचा समारोप

 

नवी दिल्ली दि.10 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (प्राइड) च्यावतीने करण्यात आले. प्रशिक्षणाचा समारोप महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे

कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते.

राज्यातील नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्यासाठी प्रशिक्षण संस्थान प्राइड (PRIDE) च्या द्वारे आयोजित या कार्यक्रमात विधीमंडळीय मसुदा लेखन (लेजिस्लेटिव ड्राफ्टिंग) कौशल्य आणि संसदीय समित्यांच्या कार्यकुशलतेचे महत्त्व प्रशिक्षण कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi