लोकनाट्य कला केंद्रांसाठी नवी नियमावली करणार
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 10 : महाराष्ट्रातील लोककला जगली पाहिजे, लोकनाट्य केंद्रांवरील सादरीकरणातील पारंपरिक बाज जपला पाहिजे. तसेच सादरीकरणात पारंपरिक वाद्यांचा वापर झाला पाहिजे. या तसेच अनुषंगिक बाबींसाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून लवकरच नियमावली तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
लोककलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले, लोकनाट्य केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. लोकनाट्य व पारंपरिक लावणी कला जपणे गरजेचे असून ही कला व हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्व.पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.
लोकनाट्य केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. यासंदर्भात नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment