Sunday, 9 February 2025

आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर

 आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर


 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


आनंदवनला आर्थिक पाठबळ देणाची ग्वाही


 


चंद्रपूर, दि. 09 : अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज 75 वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.


बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या 75 व्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभाग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी उपस्थित होते.


मानवी संवेदनाची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी विविध उपक्रमातून संपूर्ण समाजासाठी संवेदना तयार केली आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. 75 वर्षाची वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्या काळात हा भाग अतिशय मागासलेला असताना बाबांनी हा प्रकल्प हाती घेतला. केवळ कुष्ठरोगांची सेवा नव्हे तर समाजसेवेची विविध क्षेत्रे जलसंधारण, पर्यावरण रक्षण असे अनेक प्रयोग येथे सुरू आहेत. आनंदवनच्या सकारात्मक कामातून हजारो तरुणांना समाजासाठी उत्तरदायित्व केले आहे. आपले संपूर्ण जीवन आमटे कुटुंबियांनी या प्रकल्पासाठी समर्पित केले आहे.


अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहे. यात कला, संगीत, फिल्म, उद्योग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.


कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा प्रधानमंत्री यांचा संकल्प :


प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी शासनाला आनंदवन सारख्या संस्थांची मोलाची मदत घ्यावी लागणार आहे. सन 2015 मध्ये भारतात प्रती लक्ष 9.73 कुष्ठरुग्ण सापडायचे. आज प्रती लक्ष 5.52 रुग्ण आढळतात. त्यामुळे आपल्याला मोठे काम करावे लागेल. यात आनंदवनचा मोठा सहभाग राहील.


आनंदवनच्या अनुदानात वाढ :


आनंदवन येथे कौशल्य विकास केंद्र, निवासी 500 लोकांचे केंद्र सुद्धा येथे सुरू होणार आहे. सन 2012 पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रती रुग्ण 2200 ऐवजी आता सहा हजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रती रुग्ण दोन हजार वरून सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. आनंदवनला 10 कोटी रुपये कॉर्पस फंड लगेच देण्यात येईल. उर्वरित 65 कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याकरीता शासन पुढाकार घेईल. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी 10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

 महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी

10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

मुंबई दि 9 – महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. 1013 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यात 45 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून, https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.

संरक्षण अधिकारी गट-ब (अराजपत्रित)  दोन पदेपरिविक्षा अधिकारी गट-क 72 पदेलघुलेखक (उच्चश्रेणी) गट -क एक पदलघुलेखक (निम्नश्रेणी) गट -क दोन पदेवरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहाय्यक गट-क 56 पदेसंरक्षण अधिकारी (कनिष्ठ)गट- क  57 पदेवरिष्ठ काळजी वाहक गट -ड चार पदेकनिष्ठ काळजी वाहक गट -ड 36 पदेस्वयंपाकी गट -ड सहा पदे या संवर्गातील सरळसेवा कोट्यातील 236 रिक्त पदे भरण्याकरीता कॉम्पुटरबेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परिक्षा टीसीएस मार्फत घेण्यात येणार आहे.

परिक्षार्थी यांचे स्थानिक व जिल्ह्यात व लगतच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर टीसीएस कंपनीमार्फत केंद्र समवेक्षक व पर्यवेक्षकतर आयुक्तालयामार्फत निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व केंद्रांवर सिग्नल जॅमर बसविण्यात येणार असून यामुळे गैरप्रकाराला आळा बसणार आहे. तसेचकेंद्रांवर बायोमेट्रीक व आय स्कॅनिंग व फेस रिडींग केले जाणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तपोलीस अधिक्षक यांना पुरेसा बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत.

उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला अथवा अफवांना बळी पडू नयेकुणीही गैरमार्गाने नोकरी देण्याचे अथवा परीक्षा पास करून देण्याचे आमिष दाखवित असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त श्री. मोरे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालय कार्यालय अथवा 020-26333812 या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

 

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुलाखत

 जय महाराष्ट्रकार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

लोकेश चंद्र यांची मुलाखत


मुंबई दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. यामध्ये ऊर्जा विभागाचे देखील सादरीकरण करण्यात आले.  राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णयसौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्पमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडायाविषयी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्र यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

000

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घघाटन

 मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार


यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घघाटन


 


१२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री,


चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन


 


      मुंबई, दि. ९ : मुंबई उपनगर ग्रंथोत्सव २०२४चे पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड्. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुलूंड पश्चीम येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उद्धघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तर प्रमुख उपस्थिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची असणार आहे.


उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व शासन मान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ग्रंथदिडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ विक्री व विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


ग्रंथदिडी


           दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम ९ ते १०.३० या वेळेत आहे. ग्रंथदिंडीचे उद्धघाटन आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते व मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, प्रशासकीय अधिकारी, टी वॉर्ड, कैलास चंद्र आर्य, सहायक डॉ. विजयकुमार जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.


                                     उद्घाटन कार्यक्रम


          या ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथालय इमारत मुलुंड (पश्चीम) येथे उद्धघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य वर्षा गायकवाड, संजय दीना पाटील, विधानसभा सदस्य राम कदम, सुनिल राऊत, मंगेश कुडाळकर, मिहिर कोटेचा, पराग शहा, अशोक पाटील तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महापालिकेच्या उपायुक्त्‍ शिक्षण डॉ. प्राची जांभेकर, पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुजाता खरे, कार्यकारी अभियंता सचिन धात्रक, प्र. ग्रंथपाल शालिनी इंगोले हे उपस्थित राहणार आहेत.


 


 


                                   चर्चासत्र व मार्गदर्शन


          १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात 'मराठीतील पहिले ज्ञानपीठ' या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांचे दुपारी १२.३० ते १.१५ या विषयावर मार्गदर्शन. दुपारी २ ते २.३० यावेळेत कुमारी सई विकास खंडाळे यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र' या विषयावर व्याख्यान, तर दुपारी २.३० ते ३.१५ या वेळेत 'राज्य सेवा आयोग व लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन' या विषयावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, उषा प्रविण गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी ३.३० ते ४.३० 'अभिजात मराठीतील शब्द वैभव' या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच लहान मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


 


            दि. १३ फेब्रुवारी रोजी 'कथा कवितेच्या राज्यात' या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. 'भारतीय संविधान माझा अभिमान' या विषयावर संविधानाचे लेखक आणि अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे 'लोककला समुजन घेताना' या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी २ ते २.४५ या वेळेत 'आधुनिक शेती' या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर यांचे 'कोवळ्या पालेभाज्या' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत 'संत साहित्य गाण्यामधून' या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे. तर कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.


            या कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.


०००

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या 'स्क्रॅपिंग'साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

 जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या 'स्क्रॅपिंग'साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

 

मुंबईदि. ७: केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे स्क्रॅपिंग 'अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.

 

वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकुण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.

 

 वाहनांचे प्रदुषण कमी करणेरस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणेवाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणेवाहनांवरील देखभाल खर्च कमी करणेजुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम२०२१ अंमलात आणला आहेअसे परिवहन विभागाने कळविले आहे.

००००

१ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' बसवावी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

  

१ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटबसवावी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

 

मुंबईदि. ७ केंद्रीय मोटार वाहन नियम१९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणेरस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पुर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावीअसे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.

 वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसलातरी काही कामा निमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.

             प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरणपत्ता बदलवित्त बोजा उतरविणे चढविणे दुय्यम आरसी विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी. हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नसलेली वाहनेबनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर या कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईलयाची नोंद घेण्यात यावीअसेही परिवहन कार्यालयाने कळविले आहे.


 

वृत्त क्र.552

 

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात

परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 7 : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलित करण्यात येत आहे. या पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीची प्रक्रियासर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी आयुक्त व अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खासगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्चकुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चसर्व वयोगटातील लसीकरणगर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब’ आणि मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती’ यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावेयासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

त्या अनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे प्रशिक्षित कर्मचारी फेब्रुवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती संकलित करतीलअसे आयुक्तअर्थ व सांख्यिकी व संचालकअर्थ व सांख्यिकी संचालनालयमुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले  आहे.

0000.

Featured post

Lakshvedhi