Saturday, 8 February 2025

महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन

 महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबईदि. 5  : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागपर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  दि. 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळेस्थानिक कला – संस्कृती खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या तीन दिवसीय पर्यटन महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईकपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी,सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन

या महोत्सवात कला-संस्कृतीहस्तकलापाककृती तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी व स्थानिक पर्यटन स्थळांना पर्यटनात्मक प्रसिध्दी देण्यात येईल. यासह महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्याचप्रमाणेस्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजनमहाबळेश्वर परिसरातील पाचगणीकास पठारकोयनानगरतापोळागड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ दर्शन सहलीचे आयोजन पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणीपॅराग्लाडींगपॅरामोटरींगजलक्रिडाट्रेकींगरॉक क्लायबींगघोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणेस्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणीस्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणीमहाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारकप्रवासी संस्थांचे प्रतिनिधीट्रॅव्हल एजेंटटूर ऑपरेटर्ससोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.

तीन दिवसीय महोत्सवाची वैशिष्ट्ये :-

स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग,स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी,पॅराग्लायडींगपॅरामोटरींगजलक्रीडाट्रेकींगरॉक क्लायबिंगघोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे,स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन,स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन,महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

महाबळेश्वरनजिक अन्य पर्यटन स्थळे :-

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रासपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारी दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतीची आठवण करुन देतात. हे ठिकाण स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्याभव्य कॅस्केडभव्य शिखरेप्राचीन मंदीरेबोर्डींग स्कूलसुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगलधबधबेटेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे.

निवासव्यवस्था आणि उपक्रम

पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंगरॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेचस्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटकासांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे. 

परिचय सहली आणि परिसंवाद कार्यक्रम

भागधारकट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधीटूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणेपर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारकव्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेल्या परिसंवाद कार्यक्रमही पार पडेल. महाबळेश्वरची संस्कृतीसौंदर्य आणि साहस अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव हा परिपूर्ण उपक्रम आहे. 

****

संध्या गरवारे/विसंअ/

जीबीएस'संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये,

 जीबीएस'संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये,

आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे!

साताऱ्यात संशयित रुग्ण आढळल्यानंतर

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

 

मुंबईदि. 5 : ‘जीबीएस’ आजाराचे संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोम या आजाराचे सात संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनखनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आरोग्य यंत्रणेची व्हीसीद्वारे बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 या बैठकीला सातारचे जिल्हा अधिकारी संतोष पाटीलजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजनजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलपे आदी व्हीसीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले कीसातारा जिल्ह्यात जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावेजिल्हा रुग्णालयात जीबीएस संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र १० बेड आरक्षित करावेप्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास डॉक्टर उपस्थित राहतील अशी खबरदारी घ्यावीजिल्ह्यात कुठेही दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.

आतापर्यंत एकूण सात रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलविले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकानी दिली.

MSIDC द्वारे महाराष्ट्रतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ३७,००० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु जिल्ह्यांची नावे पहा

 MSIDC द्वारे महाराष्ट्रतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ३७,००० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु.

मुंबईदि. 5 : राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ६,००० किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ३७,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहेहा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

"राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला असूनयामध्ये राज्य महामार्ग आणि उच्च वाहतूक असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहेया रस्त्यांचा विकास आर्थिक वृद्धी आणि जलद वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे," असे MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

.क्र.

प्रदेश

जिल्हा

लांबी

(कि.मी.)

प्रकल्प किंमत

(रुकोटी)

1

नाशिक

नाशिकअहिल्यानगर

517.92

3217.14

2

नाशिक – 2

धुळेनंदुरबारपालघररायगडरत्नागिरी,सिंधूदुर्ग

552.53

3448.57

3

कोंकण

538.25

4450.00

4

नागपूर

नागपूरभंडारागोंदीयाचंद्रपूरवर्धागडचिरोली

606.15

3387.14

5

पुणे

पुणेसातारासांगलीकोल्हापूरसोलापूर

1330.75

8684.29

6

नांदेड

नांदेडहिंगोलीपरभणीलातूर

548.02

3207.14

7

छत्रपती संभाजीनगर

.संभाजीनगरजालनाधाराशीवबीड

680.16

3395.71

8

अमरावती

अमरावतीअकोलावाशिमबुलढाणायवतमाळ

1175.41

7174.00

एकूण

5949.19

36964.00

या संदर्भात MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक श्रीब्रिजेश दीक्षित म्हणालेहा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ज्यायोगे राज्य महामार्ग आणि ग्रामीण जिल्ह्यांतील रस्ते वर्षभर योग्य स्थितीत राहून वाहनांच्या जलद चालनासाठी सक्षम होतीलविविध रस्ते जोडून राज्याच्या विकासाला आणि आर्थिक समृद्धीस प्रचंड चालना देईल. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि MSIDC चे अध्यक्ष आणि मंत्रीसा.बां. (सा.वगळून), श्रीशिवेंद्रसिंह अभयसिंहराजे भोंसले यांनी MSIDC द्वारे रस्ता सुधारणा कामांना निर्धारित कालावधीत गुणवत्तेमध्ये तडजोड न करता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

श्रीब्रिजेश दीक्षितव्यवस्थापकीय संचालक MSIDC यांनी सांगितले कीहा प्रकल्प हायब्रिड ऍन्युटी मॉडेल (HAM) अंतर्गत राबविला जाईलजो केंद्रीय सरकारने देशातील रस्ता बांधकामाचा वेग वाढवण्यासाठी स्वीकारलेले मॉडेल आहेराज्य सरकार प्रकल्प खर्चाचा ३०हिस्सा समभाग म्हणून प्रदान करेलतर उर्वरित रक्कम MSIDC द्वारे राज्य स्वामित्व असलेल्या बँकांकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध करणार आहे.


Friday, 7 February 2025

सुरवात कुठून करता यापेक्षा शेवट कसा होतो ते महत्त्वाचे आहे.

 सुरवात कुठून करता यापेक्षा शेवट कसा होतो ते महत्त्वाचे आहे.


नक्षलवाद, गरिबी, बेरोजगारी दूर करण्याच्या दिशेने कामाला सुरूवात

 नक्षलवादगरिबीबेरोजगारी दूर करण्याच्या दिशेने कामाला सुरूवात

केंद्रीय परिवहन मंत्री श्री. गडकरी म्हणालेराज्याच्या एकूण खनिज संपत्तीच्या 75 टक्के खनिज विदर्भात आहे. एकूण वनक्षेत्राच्या 80 टक्के वन विदर्भात आहे. ही जमेची बाब असून येथे पर्यटन व उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे यासाठी दशकांपासून कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेत या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले. येथे उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक ओढून आणत येथील नक्षलवादगरिबीबेरोजगारी दूर करण्याच्या दिशेने कामाला सुरूवात झाली आहे. ॲडव्हांटेज विदर्भच्या आयोजनातून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग वाढीसाठी पुरक वातावरण निर्माण करण्याचे उद्दीष्ट असून येत्या 4 वर्षात यास गती देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणालेदावोसमध्ये राज्यातील समतोल औद्योगिक विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आले. राज्य शासन उद्योगपूरक सोयी-सुविधा व वातावरण निर्माण करीत आहे. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. यास अधिक गती देवून भविष्यात हा आलेख वाढविण्यात येईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या स्थानी घेवून जाण्याच्या उद्दीष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र महत्वाचे योगदान देईल यासाठी ॲडव्हांन्टेज विदर्भ सारखे आयोजन महत्वाची भूमिका पार पाडेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यभर असे आयोजन व्हावेअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   

जे.एस.डब्ल्यू उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल म्हणालेगडचिरोलीसह विदर्भात 3 लाख कोटींची गुंतवणूक होत आहे. याचा फायदा स्थानिकांना होवून विदर्भ जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल. एचसीएल कंपनीच्या प्रमुख रोषणी मल्होत्रा म्हणाल्यानागपूरातील मिहानमध्ये 2018 पासून एचसीएल कार्यरत असून 5 हजार 500 बेरोजगारांना रोजगार देण्यात आला आहे.  यात 40 टक्के महिलांचा समावेश आहे. लॉईड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्णन प्रभाकरन यांनी गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षात 10 हजार रोजगार निर्माण करणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक ॲडव्हांटेज विदर्भ महोत्सवाचे संयोजक तथा असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी केले.

या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहु-क्षेत्रीय उद्योगांचे 320 हून अधिक दालन उभारण्यात आली आहेत. यात सार्वजनिक उपक्रमस्टील आणि खाण मंत्रालयभारतीय विमानतळ प्राधिकरणसेबीकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळजीएसटी विभागपोस्ट विभागइत्यादिंचे दालनही आहेत. येत्या 9 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत  हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे.

00000


 


वस्त्रोद्योग क्षेत्र अधिक सक्षम

 वस्त्रोद्योग क्षेत्र अधिक सक्षम


पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून येथे वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक सक्षम करण्यात येईल. विदर्भात होणारे कपाशीचे उत्पादन व कपाशीचा आयुध निर्माण क्षेत्रात होणारा उपयोग लक्षात घेता या भागात उद्योग उभारण्यासंदर्भात पूरक वातावरण निर्माण करण्यात येईल. अमरावती येथे आशिया खंडातील सर्वात मोठे विमानचालक प्रशिक्षण केंद्र उभारुन यातून दरवर्षी 25 हजार विमानचालक प्रशिक्षित करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यात ड्रायपोर्ट निर्मितीसोबतच इलेक्ट्रॉनिक बस हब निर्माण करण्यात येईल, येत्या 4 वर्षात चंद्रपूर येथे कोल गॅसिफीकेशन व्यवस्था निर्माण करण्यात येईल. नाशिकहून थेट वाढवण बंदरावर माल पोचविण्याचे नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


विदर्भातून काकिनाडापर्यंत दळण-वळणाची संपर्क व्यवस्था आंध्रप्रदेश व तेलंगण राज्यांच्या सहकार्याने करण्याचे नियोजन सुरू आहे. दुबई विमानतळ हबच्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळ हब करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यास समांतर व्यवस्था नागपूर विमानतळावर निर्माण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आशिया खंडातील सर्वात मोठे स्टिलहब

 आशिया खंडातील सर्वात मोठे स्टिलहब

गडचिरोलीत गुंतवणूक होत असल्याने नक्षलप्रभावित जिल्हा म्हणून ओळख पुसून आशिया खंडातील सर्वात मोठे स्टीलहब येथे उभारले जाणार आहे. लगतच्या चंद्रपूरभंडारागोंदियायवतमाळ या जिल्ह्यांमध्येही गडचिरोलीतील गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. गडचिरोलीत येत्या काळात विमानतळ उभारण्यात येणार आहे. अमरावती येथील टेक्सटाइल झोनमध्ये उद्योग सुरु झाले असून आता तिथे अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार आहोत. 

Featured post

Lakshvedhi