Friday, 7 February 2025

सामाजिक न्याय विभागाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 वृत्त क्र.545

सामाजिक न्याय विभागाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबईदि. ०७ : सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालयपुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कॉम्प्युटरबेस ऑनलाइन परीक्षा दि. 4 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली आहे.

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकगृहपाल/अधिक्षकसमाज कल्याण निरीक्षकउच्च श्रेणी लघुलेखकनिम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गासाठी ही ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना दि. 25 फेब्रुवारी 2025 पासून प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने या https://sjsa.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या सूचनांसंदर्भात माहितीचा समावेश असेल.

 भरती प्रक्रियेबाबत अधिकृत माहितीकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या  https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी तसेच भरती प्रक्रियाच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी व ई-मेल ने वेळोवेळी पाठविण्यात येणाऱ्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे.

ही भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचण असल्यास संबंधित उमेदवारांनी 91-9986638901 या क्रमांकावर संपर्क करावा,  हा क्रमांक सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत सुरू राहील.

ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने या भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे/परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावाअसे आवाहन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी

 महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी

-         पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 7 : महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. दि. 06 फेब्रुवारी 2025 अखेर 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 मे.टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती श्री. रावल यांनी दिली.

खरेदी केलेला सोयाबीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या 345 गोदामात तसेच भाडेतत्वावरील 252 खासगी गोदामात साठवणूक करण्यात आला आहे. मात्र या हंगामात सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सदर गोदामांची साठवणूक क्षमता देखील पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने सन 2024-25 करिता सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 4892 रुपये इतका हमीभाव घोषित केला असून तो मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा 292 रुपये प्रति क्विंटल इतका जास्त आहे. नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सीअंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीमार्फत शेतकरी नोंदणी व खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यासाठी नाफेडद्वारे 403 व एनसीसीएफद्वारे 159 अशी एकूण 562 केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आली.

सोयाबीन खरेदीसाठी दि. 1 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात येऊन दि.15 ऑक्टोबर 2024 पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 90 दिवसांची मुदत दि.12 जानेवारी 2025 पर्यंत होती. मात्र शेतकरी नोंदणीचे प्रमाण विचारात घेऊन खरेदी प्रक्रियेस केंद्र शासनाच्या मान्यतेने प्रथम दि.31 जानेवारी 2025 पर्यंत आणि नंतर दि.06 फेब्रुवारी 2025 पर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती पणन विभागामार्फत देण्यात आली.

00000 

सर्व रुग्णालयातील औषधांची नवीन नियमावलीप्रमाणे गुणवत्ता तपासणी

 सर्व रुग्णालयातील औषधांची नवीन नियमावलीप्रमाणे गुणवत्ता तपासणी


- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर


 


मुंबई, दि.7: राज्यातील सर्व आरोग्य संस्था मधील औषधाचा उपलब्ध साठा व गुणवत्ता याची नवीन नियमावलीप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले.


आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले आहेत. जिल्हास्तरापासून राज्य स्तरापर्यंत सर्वत्र तातडीने ही मोहीम हाती घेण्यात येणाऱ आहे.


औषधांचा पुरेसा साठा ठेवावा


            राज्यातील सर्व रुग्णालयांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमावलीनुसार करावी. सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्यानुसार औषधाच्या नोंदी ई-औषधी प्रणालीमध्‍ये 24 ते 48 तासांच्‍या आत घ्याव्यात, औषध साठ्याच्या समूह क्रमांकनिहाय नोंदी बिनचूक असाव्यात. खरेदी केलेल्या सर्व औषधींचे batch निहाय नमुने NABL प्रयोगशाळेत तपासणी करावी. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पुरवठादार कंपनी व प्रयोगशाळा यांचा संपर्क होणार नाही (Double Blinding) अशी व्यवस्था करावी. प्रत्येक औषधाचा प्रत्येक समूह क्रमांक तपासणी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, याकरिता त्रयस्थ NABL प्रयोगशाळा, अथवा खरेदी प्राधिकरणामार्फत निर्धारित झालेल्या मानांकित प्रयोगशाळे मार्फत तपासणी करावी. औषध साठा प्राप्त झाल्यापासून तपासणी अहवाल विहित कालावधीत प्राप्‍त होईपर्यंत औषधसाठा स्वतंत्र ठेवण्यात यावा. अहवालानुसार प्रमाणित केलेल्या औषधांचा वापर करण्‍यास यावा. तसेच औषधे अप्रमाणित आढळून आल्‍याचा अहवाल प्रयोगशाळेने दिल्‍यास त्‍या औषधाचा तात्‍काळ वापर थांबवण्यात यावा या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. 


महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने आरोग्य विभागांतर्गत जिल्‍हास्‍तरावरील औषध भांडाराकडून एकूण 86 औषधी नमूने NABL प्रयोगशाळांना पाठवले होते. त्यापैकी 32 नमुन्यांच्या अहवाल वापरण्यास योग्य असून 54 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण औषध भांडाराकडून मागविण्यात आलेले 69 औषधी नमूने NABL प्रयोगशाळांना पाठविण्यात आले होते. त्यापैकी 14 नमुने वापरण्यास योग्य आहेत. तसेच 55 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  


 राज्यात सर्व जिल्ह्यात मिळून सन 2023-24 मध्ये 12 हजार 767 प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली हेाती. त्यापैकी 1 हजार 884 नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 772 नमुने वापरण्यास योग्य असून 03 नमुने वापरण्यास अयोग्य आहेत. अद्याप 109 नमुन्याचा अहवाल अप्राप्त आहे. तसेच सन 2024-25 मध्ये 9 हजार 600 प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली. त्यातील 4 हजार 691 नमुन्यांपैकी 3 हजार 179 नमुने वापरण्यास योग्य असून 5 नमुने वापरण्यास अयोग्य आहेत. तसेच 1 हजार 507 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवालानुसार वापरण्यास अयोग्य असलेल्या batches सर्व संबंधितांना कळविण्यात आले असून त्यांचा वापर थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती उपस्थित अधिकार्‍यानी यावेळी दिली.  


 राज्यातील आरोग्य संस्थात पुरवठा होत असलेली औषधे प्रयोगशाळेत काटेकोर तपासून घ्यावीत. तसेच रूग्णाची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.


00000000

§ महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - 2025 ला दि. 11 फेब्रुवारी पासून सुरुवात

 ग्रामीण कला-संस्कृती अनुभवण्यासाठी 'महालक्षमी सरसला आवर्जून भेट द्यावी

-   ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

§  महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - 2025 ला

दि. 11 फेब्रुवारी पासून सुरुवात

मुंबई दि. 7 :ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचतगटांच्या उत्पादनांची विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वैविध्यपूर्ण उत्पादनेग्रामीण कलासंस्कृतीचा अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन ग्राम विकास व पंचायत राज विभागचे  मंत्री  जयकुमार गोरे यांनी केले आहे. 

ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५  उद्घाटन सोहळा दि. ११ फेब्रुवारी२०२५ रोजी बांद्रा कुर्ला संकुल येथे होत आहे.

या   राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये ५०० पेक्षा स्टॉल असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४०० आणि इतर राज्यातून १०० स्टॉल असणार आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणीचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ८० स्टॉलचे भव्य असे फूड कोर्ट असणार आहे.

मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे असलेल्या या  भव्य प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना होणार आहे. हे प्रदर्शन प्रशस्त मोकळ्या पटांगणात असून वातानुकूलित असल्याने मुंबईठाणेनवी मुंबई आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता येणार आहे. हा अनुभव घेण्यासाठी मुंबईठाणे आणि जवळच्या सर्व महानगरातील नागरिकांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे  यांनी केले आहे.  

प्रदर्शन   दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला दि. ११ ते २३ फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येणार आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तूहातमागावर तयार केलेले कपडेवुडन क्राफ्टबंजारा आर्टवारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरीलहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या ठिकाणी  प्रमाणित सेंद्रिय पदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे  यांच्या नेतृत्वात  ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिवएकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत  आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिकसामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियानामार्फत या महिलांना अनेक प्रकारची कौशल्य व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे दिली जातात. अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन आयोजित केले जाते. आतापर्यंत मुंबईनवी मुंबईनागपूर या ठिकाणी महालक्ष्मी सरस चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती ग्रामविकास विभागाने दिली आहे.

व्यापारासोबत विद्यापीठ, संशोधन, संस्कृती व स्टार्टअप क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास इटली उत्सुक

 व्यापारासोबत विद्यापीठसंशोधनसंस्कृती व स्टार्टअप क्षेत्रात

सहकार्य वाढविण्यास इटली उत्सुक

-         राजदूत अँटोनियो बार्टोली

 

मुंबई, दि.7 : भारत व इटली देशांमधील राजकीय संबंध अतिशय दृढ असून उभय देशांमध्ये विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक तसेच संशोधन सहकार्य वाढविणेतसेच सांस्कृतिक संबंध, पर्यटन व इटालियन भाषा शिक्षणाला भारतात चालना देण्यास इटली उत्सुक असल्याचे इटलीचे भारतातील राजदूत  अँटोनियो एन्रिको बार्टोली यांनी आज येथे सांगितले.

राजदूत अँटोनियो बार्टोली यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवनमुंबई येथे सदिच्छा भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते. 

भारत व इटलीचे पंतप्रधान यांच्यामध्ये राजकीय स्तरावर घनिष्ट संबंध असून आज भारत आणि इटलीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानदळणवळणनाविन्यता व स्टार्टअपअवकाश विज्ञान व संरक्षणसुरक्षा व सायबर सुरक्षापर्यटन व सिनेमा आदी क्षेत्रात सहकार्य सुरु आहे असे राजदूतांनी सांगितले.

इटलीचे उपपंतप्रधान तथा संरक्षण मंत्री एका मोठ्या उद्योग व्यापार शिष्टमंडळासह एप्रिल महिन्यात भारत भेटीवर येत असून महाराष्ट्रातील मोठ्या कंपन्याउद्योग व स्टार्टअपस्मार्ट कृषीविज्ञानहरित तंत्रज्ञान व जैवइंधन तसेच घनकचऱ्यावर प्रक्रिया आदी क्षेत्रात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इटलीमध्ये 85 टक्के कचऱ्याचे पुनर्चक्रण होत असल्याचे सांगताना या क्षेत्रात इटली भारताला सहकार्य करू शकेल असे त्यांनी सांगितले. उभय देशांमधील स्टार्टअपमध्ये सहकार्य वाढवण्यास आपण उत्सुक असून यासंदर्भात आयआयटी मुंबईशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजदूतांचे स्वागत करताना राज्यपालांनी उभय देशांना वस्त्रोद्योग क्षेत्रात देखील सहकार्य करण्यास वाव असल्याचे सांगितले. व्यापार संबंध वाढविण्यासाठी आपण राज्याच्या उद्योग मंत्र्यांशी चर्चा करू तसेच राजभवन येथे उद्योजक व चेंबर ऑफ कॉमर्स सदस्यांना बोलावून चर्चा करू असे राज्यपालांनी सांगितले. राज्यातील विद्यापीठांमध्ये इटली भाषेचे केंद्र सुरु करण्याबद्दल देखील आपण सूचना करू असे राज्यपालांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळ कार्यरत झाल्यानंतर मुंबईतून इटलीतील शहरांशी थेट विमान वाहतूक सुरु करण्याबद्दल आपण व्यक्तिशः लक्ष घालू असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी इटलीचे मुंबईतील वाणिज्यदूत वॉल्टर फेरारा व उपवाणिज्यदूत लुइगी कॅस्कोन उपस्थित होते.

००००

मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे शानदार उदघाटन मध्यवर्ती संग्रहालयात

 मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे शानदार उदघाटन

मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे,  मनपा आयुक्त डॅा. अभिजित चौधरीजिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकरमुधोजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार होण्याची नागपूरकरांना ही अपूर्व संधी मिळाली आहे. वाघनखे ही महाराष्ट्राच्या शौर्याचा मनबिंदू आहे. स्वराजाच्या रक्षणासाठी वाघनखांचा चपखल वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी प्रयत्नपूर्वक ही वाघनखे महाराष्ट्रात आणली आहेत. महाराष्ट्रातील हजारो युवक या शिवशस्त्र शौर्य प्रदर्शनातून प्रेरणा घेतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मराठाकालीन शस्त्रास्त्रेवाघनखे याची त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी साहसी मर्दानीखेळचर्चासत्र,  व्याख्याने यानिमित्ताने आयोजित केले जातील असे त्यांनी सांगितले.

0000


 


आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला

 आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

§  मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन

§  विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन

लेझीमढोल-ताशेदिंडी पथकाच्या मिरवणुकीतून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

 

नागपूरदि. 7 : जलव्यवस्थापनपर्यावरण रक्षणकायदा व सुव्यवस्थामहिलांचे संरक्षणसर्व जातीधर्माचा सन्मान असा आदर्श वस्तुपाठ छत्रपती  शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून दिला आहे.  हा समृद्ध वारसा जपण्यासह तो नव्या पिढीपर्यंत प्रवाहित होण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित  मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार,  मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे,  मनपा आयुक्त डॅा. अभिजित चौधरीजिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकरपोस्ट मास्टर जनरल (नागपूर परिक्षेत्र) शोभा मधाळे,  मुधोजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी ज्या वाघनखाचा वापर केला होता ती वाघनखे मोठ्या प्रयत्नानंतर आपण आणली आहेत. सुरुवातीला साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये ही वाघनखे ठेवण्यात आली. महाराष्ट्राला मिळालेल्या या शौर्याच्या वारशाची अनुभूती पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांनीविद्यार्थ्यांनीनागरिकांनी घेतली. ही अनुभूती घेण्याची संधी विदर्भातील युवकांनाजनतेला मिळाली असून याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी संबधित विभागाने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महाराष्ट्रावर ज्यावेळी आक्रमणे झाली त्याकाळी आपले संस्कारआपली संस्कृतीस्वभाषास्वधर्म हा जिवंत राहील की नाही अशा प्रकारची अवस्था होती. मात्र शिवरायांनी हे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्या स्वातंत्र्याची पायाभरणी छत्रपती शिवरायांनी केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, राज्याचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यावर सांस्कृतिक कार्य विभागाचा भर आहे. त्यातीलच वाघनखांचे प्रदर्शन हा एक भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'विरासत से विकासहे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

या कार्यक्रमात शिवकालीन शस्त्रे या माहिती पुस्तिकेचे तसेच वाघनखावर आधारित विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

प्रास्ताविक मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद ओक यांनी केले तर आभार पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी मानले

Featured post

Lakshvedhi