Thursday, 6 February 2025

लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!

 लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!


                     गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे ... संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा ... 

 

  लसणाचे उपयोग : १. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .

 २. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .

 ३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.

 ४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .

 ५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .

 ६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफअसूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .

 ७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे , अजीर्ण, पोटात वेदना , जंत , अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .

 ८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .

 ९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .

 १०. लसूण घालून उकळलेले दुध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .

 ११. लसूण मनाची मरगळ घालवतो .

 १२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .

 १३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .

 १४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ....

 काळजी :

 लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती . गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे .....

 जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे ...


आयुर्वेद अभ्यासक...  सुनिता सहस्रबुद्धे

निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार 

 ..

मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन

 मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन

जेव्हा 53 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणूतेव्हा जायकवाडीत इतके पाणी असेल की ते सहज वितरित करता येईल. त्यामुळे मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. माणदेशातील दुष्काळ संपवला आहेघरात पाणी पोहोचले आहे तेच चित्र मराठवाड्यामध्ये निर्माण करायचे आहेत्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-धर्मांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले. त्याचप्रमाणेआपणही एकत्र राहून विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन करतानाच बीडचा इतिहास समृद्ध आहे आणि आपल्याला तो पुढे न्यायचा आहेत्यासाठी आपल्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केला.

मराठवाडा व अहिल्यानगरच्या भागाची स्थिती लक्षात घेऊन या भागात सिंचन प्रकल्पांना गती देण्यात येईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केले. बीड जिल्ह्यात सर्व प्रकारच्या विकासकामांवर लक्ष देऊन शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले.

२००७ पासून या प्रकल्पासाठी प्रयत्न करत असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री असताना केलेली मदत व आता मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार सुरेश धस यांनी आभार मानले.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रास्ताविक केले.  प्रकल्पाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या प्रकल्पामुळे पहिल्या टप्प्यात 33 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांग़ितले.

नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा - पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे एल अँड टी कंपनीला निर्देश

 नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा

पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे एल अँड टी कंपनीला निर्देश

• शासनाकडे हस्तांतरण करा

देखभालदुरुस्तीसाठी १० कोटी

 

मुंबईता. 5 : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित करावेतअसे सक्त निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

            नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. नागपूर शहरात एल अँड टी कंपनीकडून ३६०० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील २००० कॅमेरे हे बंद आहेत. यापैकी ११०० कॅमेरे हे विविध प्रकारची कामे सुरू असल्याने बंद असल्याचे एल अँड टी कंपनीकडून सांगण्यात आले.

माहिती तंत्रज्ञान विषयक टीमने पाहणी करावी

एल अँड टी कंपनीने दुरुस्त करून सुरू केलेले कॅमेरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील माहिती तंत्रज्ञान या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या टीमने याची पाहणी करावीअसेही आदेश महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांनी  दिले.

गुन्ह्यांचा शोधासाठी कॅमेरे उपयोगी

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे होईल. चोरीखूनदरोडा तसेच अपघातातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे उपयोगी ठरणार असूनत्यामुळे बंद असलेले कॅमेरे 15 दिवसांत दुरुस्त करून ते कार्यान्वित करावेतअसे स्पष्ट निर्देश श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेचहे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची कार्यवाही कशी करायची याच्या देखील सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलारमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव  पराग जैन नैनुटियानागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आंचल गोयल आदी उपस्थित 

स्वतंत्र कला विद्यापीठासंदर्भात समितीची बैठक

 स्वतंत्र कला विद्यापीठासंदर्भात समितीची बैठक

सविस्तर अहवाल सादर करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

 

मुंबईदि. ५: महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावेअशी मागणी कला क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डीडि नोव्हो अभिमत विद्यापीठ कुलगुरू तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. रजनीश कामंतसर जे.जे. उपयोगिता कला महाविद्यालयाचे अधिव्याख्याता तथा प्रभारी संचालक संतोष क्षीरसागरतसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने शासनास सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींच्या अनुषंगाने गठीत समितीने सखोल अभ्यास करून तातडीने सविस्तर अहवाल शासनाला सादर करावाअशा स्पष्ट सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

 राज्यातील कला महाविद्यालयांना अनुदान  देण्यासंदर्भात वर्गवारी करून सविस्तर प्रस्ताव तयार  करावाप्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर  वित्त विभागाकडे सादर करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

सध्या शासकीय किंवा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना "पदवीधर" असा दर्जा दिला जातोतर इतर कला महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना "पदविका धारक" मानले जाते. या असमानतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान होते. त्यामुळे कला महाविद्यालयांचे विद्यापीठात रूपांतर करावेअशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने केली आहे.

बैठकीत राज्यात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यामुळे कला शिक्षण अधिक दर्जेदार आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त ठरू शकेलअसा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी विकास आराखडा महत्वाचा

 राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी 

विकास आराखडा महत्वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी

 

मुंबईदि. ५ : विकसीत भारत २०४७ यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

              या भेटीवेळी श्री. सुब्रह्मण्यम यांनी निती आयोगाच्या संकल्पना आणि राज्याने कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे याविषयी माहिती दिली.

   मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, 'राज्याच्या विकासाचा वेग इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. भविष्यात त्यात वाढ करण्यासाठी काम करत आहोत. तसेच राज्यात अनेक मोठे प्रकल्प आणि विकासकामे सुरू आहेत. त्यांना गती दिली जात आहे. नवीन गुंतवणूक येत आहे.'

   श्री सुब्रह्मण्यम म्हणाले कीमुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. २ ट्रिलियन क्षमतेचे मुंबई हे देशातील एकमेव राज्य आहे. महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्ताजैव तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणक क्षेत्रात काम करावे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात संधी आणि क्षमता दोन्ही आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेले काम देशात सर्वोत्कृष्ट आहे. राज्याचे हे काम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरावे. महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा तयार आहे. त्यास आणखी वेग देण्यात यावा. सुरू असलेल्या विकासकामांचा वॉर रुमच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जावा''अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिकबृह्नमुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीमुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायरनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरामुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित 

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

 राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. 5 : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

राज्यातील  पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ही बैठक एचएसबीएसफोर्टमुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीला प्रधान सचिव संजीव खंदारे,  संचालक ई. रवींद्रनसहसचिव बी. जी. पवारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग तसेच मुख्य अभियंता व विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे - बोर्डीकर म्हणाल्याग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक दर्जेदार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. राज्यात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी नवीन धोरणांवर विचारविनिमय करण्यात आला. याबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीसाठीच्या उपाययोजना करण्यावर भर देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

पावसाळ्यात अधिक पाणी साठवण करण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांचे नियोजन करण्यात यावे. गावागावांत रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लागू करण्याचा यावेपाणी टंचाईग्रस्त भागांसाठी तातडीच्या उपाययोजना ज्या भागांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न उद्भवतोअशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठानवीन विहिरी खोदणेजलस्त्रोत वाढवणे यासारख्या उपाययोजना हाती घेण्याचे यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामस्तरावरील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन व अंमलबजावणीग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच पाणी पुरवठा योजनेची प्रगती आणि उर्वरित गावांमध्ये जलवाहिन्या पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन

महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबईदि. 5  : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागपर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  दि. 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळेस्थानिक कला – संस्कृती खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या तीन दिवसीय पर्यटन महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईकपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी,सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन

या महोत्सवात कला-संस्कृतीहस्तकलापाककृती तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी व स्थानिक पर्यटन स्थळांना पर्यटनात्मक प्रसिध्दी देण्यात येईल. यासह महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्याचप्रमाणेस्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजनमहाबळेश्वर परिसरातील पाचगणीकास पठारकोयनानगरतापोळागड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ दर्शन सहलीचे आयोजन पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणीपॅराग्लाडींगपॅरामोटरींगजलक्रिडाट्रेकींगरॉक क्लायबींगघोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणेस्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणीस्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणीमहाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारकप्रवासी संस्थांचे प्रतिनिधीट्रॅव्हल एजेंटटूर ऑपरेटर्ससोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.

तीन दिवसीय महोत्सवाची वैशिष्ट्ये :-

स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग,स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी,पॅराग्लायडींगपॅरामोटरींगजलक्रीडाट्रेकींगरॉक क्लायबिंगघोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे,स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन,स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन,महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

महाबळेश्वरनजिक अन्य पर्यटन स्थळे :-

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रासपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारी दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतीची आठवण करुन देतात. हे ठिकाण स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्याभव्य कॅस्केडभव्य शिखरेप्राचीन मंदीरेबोर्डींग स्कूलसुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगलधबधबेटेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे.

निवासव्यवस्था आणि उपक्रम

पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंगरॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेचस्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटकासांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे. 

परिचय सहली आणि परिसंवाद कार्यक्रम

भागधारकट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधीटूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणेपर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारकव्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेल्या परिसंवाद कार्यक्रमही पार पडेल. महाबळेश्वरची संस्कृतीसौंदर्य आणि साहस अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव हा परिपूर्ण उपक्रम आहे. 

****स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

महाबळेश्वरनजिक अन्य पर्यटन स्थळे :-

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रासपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारी दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतीची आठवण करुन देतात. हे ठिकाण स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्याभव्य कॅस्केडभव्य शिखरेप्राचीन मंदीरेबोर्डींग स्कूलसुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगलधबधबेटेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे.

निवासव्यवस्था आणि उपक्रम

पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंगरॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेचस्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटकासांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे. 

परिचय सहली आणि परिसंवाद कार्यक्रम

भागधारकट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधीटूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणेपर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारकव्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेल्या परिसंवाद कार्यक्रमही पार पडेल. महाबळेश्वरची संस्कृतीसौंदर्य आणि साहस अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव हा परिपूर्ण उपक्रम आहे. 

****

Featured post

Lakshvedhi